×

तेली समाजाला आश्‍वासनांचे गाजर

Published On :    3 Jun 2018
शेयर करा:


-




तेली समाजाने दिल्लीतील तालकोटारा स्टेडीयममध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावर विचार केला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र फडणवीस हे पेशवे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍नच आहे. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आश्‍वासनांचे गाजर चाखायला देण्यात आले आहे, म्हणजेच बोळवण करण्यात आली आहे. 


इतर मागासवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय व स्वतंत्र बजेट हवे, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण हवे, क्रीमीलेअरची मर्यादा वाढवावी, तेली समाजाचा अतिमागास प्रवर्गात समावेश करावा,२०११ ची जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, तेली समाजाला लोकसंख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व मिळावे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु कुठल्या सरकारने मागण्यांचा विचार केला याची माहिती घेतल्यास सर्वच सरकार फक्त मतांसाठी वापर करताना दिसतात. त्याचे ताजे उदाहरण द्यायचे असल्यास मराठा समाजाचे देता येईल. उभ्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठ्यांनी मोर्चे काढले. परंतु त्यांच्या पदरात काही पडलेच नाही. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार केला जाईल असेच आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याचा विचार केलेला नाही. 


अनेक जातींनी एककट्याने मोर्चा काढल्यामुळे सत्ताधारी ब्राम्हणांचे फावते. कारण आधीच आपल्याला जाती-जातीत ब्राम्हणांनी विभागली असल्याने कुणीही एकत्र येऊ नये यासाठी त्यांची कटकारस्थाने असतात. त्यातच या देशाचा शासक वर्ग हा ब्राम्हण असल्याने त्यांनी सर्वच मूलनिवासी बहुजन समाजाला गुलामगिरीच्या खाईत लोटले. त्यामुळेे आपला जाज्वल्य असा इतिहास आपण गमावून बसलो. आपण मागणी कुणाकडे करतो तर ब्राम्हणाकडे. ब्राम्हण हा घ्यायला बसलाय द्यायला नाही. खर्‍या अर्थाने या देशात अल्पसंख्य ब्राम्हण आहे. परंतु अल्पसंख्य ठरवतो कुणाला मुस्लिमांना. या देशात १५ टक्के मुस्लिमांची संख्या आहे, ब्राम्हण केवळ ३.५ टक्के आहेत. परंतु तेच देशावर राज्य करत आहेत. 


फोडा आणि झोडा ही नीती वापरून ब्राम्हण कपट नीतीने शासकवर्ग झाला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सर्व कटकारस्थाने सुरू आहेत. या देशाचा खरा मालक येथील मूलनिवासी बहुजन समाज असताना त्यांना गुलाम करून ठेवण्यात आले आहे. त्यातच आपले लोक त्यांचे पाय चाटताना दिसतात. त्यामुळेच त्यांची व्यवस्था मजबूत होताना दिसत आहे. साधा ओरखडाही पडत नाही त्यांच्या व्यवस्थेला. याचा अर्थ आपल्यालाही गुलामीत जगून घ्यायची सवय झाली आहे, त्यातच आपण आनंद मानताना दिसत आहोत.

खर्‍या अर्थाने कमांडर असायला हवा तो मूलनिवासी बहुजन बांधव व डिमांडर असायला हवा ब्राम्हण. मात्र आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. ब्राम्हण कमांडर तर मूलनिवासी बहुजन बांधव डिमांडर झाला आहे. ही खरी शोकांतिका आहे. जर ब्राम्हणाला तुम्हांला द्यायचे आहे तर अनेक प्रश्‍न निर्माण झाले नसते. सुटलेल्या समस्या पुन्हा ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच या देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतीमालाला भाव नाही, त्यातच कर्जबाजारीपणामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. अशा सर्व परिस्थितीला सामोरे जाताना आपण सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी एकत्रित लढले पाहिजे. 


विभाजित केलेल्या विविध जातीच्या तुकड्यांना जोडले पाहिजे. कारण एककट्याने लढून उपयोगाचे नाही, कारण मग कुठल्याही जातीच्या व समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जात नाही. ओबीसींची जातनिहाय जनगणना ब्राम्हण करणारच नाहीत, केली तर या देशाची सत्ताच ओबीसींच्या ताब्यात येईल. कुणीही कितीही अडाणी असलेला व्यक्ती स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार नाही. तेली समाजाने मोर्चा काढला, हे चांगलेच आहे. परंतु देशाचे प्रधानमंत्री याच तेली जातीतून आल्याचे सांगतात, याचा अर्थ तेसुध्दा ओबीसी आहेत. प्रधानमंत्री ओबीसी असेल तर ओबीसींच्याविरोधात निर्णय कसे काय घेतो याचा तेली समाजाने विचार करायला हवा. 


सत्तेवर आल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही, ३१४ ओबीसींना आयएएस नियुक्त्या नाकारल्या, मागासवर्गीय आयोग गुंडाळला, शिष्यवृत्ती बंद केली यासारख्या अनेक चुकीचे निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. याचा अर्थ निर्णय घेणारे मोदी नाहीत तर ब्राम्हण आहेत. हे सर्व निर्णय मोदींच्या नावे खपवले जातात. म्हणून केवळ तेलीच नव्हे तर सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी ब्राम्हणांची ही हातचलाखी समजून घ्यावी, त्यांच्या कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. म्हणून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करताना सर्वांनी एकीने लढू या असे यानिमित्ताने आवाहन करावेसे वाटते.



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper