×

सोशल मीडिया चांगला की घातक

Published On :    5 Jun 2018
शेयर करा:


-



व्हॉट्सऍप ग्रुपचा ‘डीपी’ बदलल्याने गु्रपमधील सदस्यांनीच युवकाची हत्या केल्याची घटना हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात एकाच कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लव जौहर असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.


यावरून आजची पिढी कुठल्या दिशेला चालली आहे, याचे वास्तव चित्रण समोर आले आहे. ज्या वयात संस्काराचे व शिक्षणाचे धडे गिरवायचे त्याच वयात अशा प्रकारचे कृत्य करून कारावासात जायचे याला काय म्हणावे? 


डिजीटल क्रांती झाल्यापासून जगातील प्रत्येक कोपर्‍यातील एखादी घटना तत्काळ आपल्याला समजते. सोशल मीडियाने तर कमालच केली आहे. परंतु डिजीटल क्रांतीला अशा प्रकारच्या घटना काळिमा फासतात. कारण डिजीटल क्रांतीमधून आपण काय शिकलो याचे उत्तर नकारार्थी येते. 


नाहीतर हत्येसारख्या घटना घडल्याच नसत्या. कुठलीही क्रांती ही चांगली असते. त्यातून चांगल्या गोष्टी घेण्याऐवजी नको त्या गोष्टीकडे युवक आकर्षित होताना दिसत आहेत. व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्ट्राग्राम, गुगल, ट्विटर यासारखी सोशल मीडिया आपल्याला नवीन संकल्पनांना जन्म देते. 


त्यातून चांगल्या बाबी घ्यायला हव्यात. आज जगभरात चीननंतर भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. इतक्या जलदगतीने हे वाढताना दिसत आहे. पूर्वी एखादा संदेश पाठवायचा झाला तर तार पाठवावी लागत असे. ती तार पोहचण्यासाठी किमान चार दिवस लागत असत. परंतु आजच्या जमान्यात येथे घडलेल्या एखादी घटना क्षणात जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचते. 


याचा अर्थ डिजीटल माध्यमांची ही क्रांती आहे. परंतु याच माध्यमांचा आज गैरवापर होताना दिसत आहे.फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नको ते मेसेज पाठवले जात आहेत. मुलींना अश्‍लील मेसेज पाठवून त्यांची छेड काढण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. याचा अर्थ आपले आई-वडील आपल्यावर संस्कार करायला विसरले असा होतो का? तर याचे उत्तर नाही. 


आई-वडीलांना दोष देण्यात उपयोगाचे नाही. तर आपल्या विकृत मेंदूतून आलेल्या चुकीच्या कल्पनांमुळे दिवसेंदिवस अत्याचार वाढताना दिसत आहेत. फेसुबक, व्हॉट्सऍपवर वाद होतात. ते वाद वैचारिक नसतात. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे वाद उथळ असतात. त्या वादांना ना बूड ना शेंडा...! 


घटनेत कलम क्र. १९ नुसार आपले विचार मांडण्याचा व त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु काही लोक समोरच्या व्यक्तीचा न ऐकता दहपशाही करताना दिसतात. जशी आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, तसा दुसर्‍यालाही त्याचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. 


कुणीही कुणाच्या विचारांची पायमल्ली करता कामा नये. परंतु याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येतात आणि अरेला कारे होते आणि हरियाणासारखी घटना घडते. आपल्याला अभिव्यक्त व्हायचे असेल तर सोशल मीडियासारखा प्रभावी माध्यम नाही. याचा अर्थ कुठल्याही प्रकारे अभिव्यक्त होता कामा नये. 


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्यालाच आपण स्वैराचार समजतो तिथेच घात होतो. प्रत्येकाचे मत सारखे असेलच असे नाही. कारण प्रत्येकाची विचारक्षमता त्याचा मेंदू आदेश देईल त्याप्रमाणे काम करते. शरीरावर विचारांचे नियंत्रण असते. विचार हे मेंदूतून येतात. 


परंतु विचार येण्यासाठी वाचन करावे लागते. वाचनासाठी पुस्तके असावी लागतात. आपले विचार सकस आणि सकारात्मक बनवायचे असतील तर वाचन फारच गरजेचे आहे. मात्र आजचे युवक वाचतात कमी, त्यामुळे त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ होताना दिसत नाही. 


परिणामी सोशल मीडियाचा गैरवापर करून हत्येसारख्या घटना वाढीस लागताना दिसतात. आजच्या युवकांची विचारशक्ती निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी वाचनालये उभारावी लागतील. वाचनालयात कुठली पुस्तके ठेवता यावरही सारे अवलंबून आहे. 


नाहीतर ज्या पुस्तकातून वैचारिक भूक भागू शकणार नाही अशी पुस्तके वाचायला दिलीत तर बट्टयाबोळ झाला म्हणून समजा. ब्राम्हणी विचारधारेची असलेल्या पुस्तकांना टाळली पाहिजे. कारण त्यामध्ये दिशाहीन लेखन असते आणि ब्राम्हणांच्या गुलामगिरीचे जोखड आणखी मजबूत बनते. 


म्हणून बहुजन महापुरूषांच्या प्रभाव असलेली पुस्तके वाचायला द्यायला हवीत. या पुस्तकांमध्येच शिक्षण कशाला म्हणतात, याची चर्चा असते. मार्मिक विश्‍लेषण केले जाते. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतात ते शिक्षण...! अशी व्याख्या राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी केली आहे. 


मग आजचे शिक्षण फुलेंच्या कसोटीवर टिकणार आहे का? तर याचे उत्तर आपल्याला नकारार्थी मिळेल. ब्राम्हणी शिक्षणामुळेच देशाची वाट लागली आहे. त्यामुळेच अश्‍लीलतेने कळस गाठला आहे. याला थोपवायचे असेल तर ही ब्राम्हणी व्यवस्थाच उखडून फेकण्याची गरज निर्माण झाली आहे. 


सोशल मीडिया चांगला की घातक याचा विचार केल्यास तो चांगला आहे. परंतु त्याचा वापर कसा करतो, आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर सारे अवलंबून आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper