×

लक्ष विचलित करण्यासाठीच ‘आंबे पुराण’

Published On :    12 Jun 2018
शेयर करा:


-



केंद्रातील दहा मंत्रालयांसाठी खाजगी कंपन्यात असलेल्या लोकांना निवडून त्यांच्यावर संयुक्त सचिवपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यासाठी सरकारने जाहिरात काढली आहे. युपीएससी परीक्षा न होता ही निवड केली जाणार आहे. 


केवळ संघाच्या संबंधित असलेल्या लोकांना या पदांवर घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात वादळ उठले असतानाच हे वादळ शमविण्यासाठीच व लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे याच्यामार्फत ‘आंबे पुराण’ सांगितले गेल्याची शक्यता आहे. 


म्हणूनच गेल्या दोन दिवसापासून मीडियावर ‘आंबे पुराणा’ला पुर आला आहे. जाणीवपूर्वक ब्राह्मण-बनिया मीडिया या विषयाला गंभिरतेने सादर करत आहे. 


दरम्यान, युपीएससी परीक्षेविना सचिव निवडण्याच्या भूमिकेवर कॉंग्रेस, बसपाने सवाल केले आहेत. मंत्रालयातील मुख्य पदांवर संघाची लोक बसविण्याचा सरकारचा खटाटोप असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे. 


त्यामुळे देशाला कुठल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे, हे दिसून येत आहे. या प्रकरणी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी प्रशासनिक व्यवस्था कुचकामी असल्याचे केंद्र सरकारवर आरोप केले. 


सरकारी आस्थापनात खाजगी कंपन्यातील अधिकारी घेणे म्हणजे पुंजीवादाला प्राधान्य देण्यासारखे आहे. दरम्यान, मोदी सरकारमधील मंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी हाच फॉर्म्यूला शैक्षणिक संस्थांमध्ये लागू करावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनिक व्यवस्था सुधारण्यासाठी अशा प्रकारची पावले उचलण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 


संयुक्त सचिव पदासाठी केंद्र सरकारने ज्या मंत्रालयासाठी जाहिराती दिल्या आहेत ते दहा मंत्रालय पुढीलप्रमाणे आहेत. वित्त सेवा, अर्थनीती, कृषी, परिवहन, जहाज बांधणी, पर्यावरण, ऊर्जा, नागरी विमान वाहतूक आणि वाणिज्य या खात्यांमध्ये ही पदे भरली जातील. 


संयुक्त सचिव तीन वर्षासाठी असेल. चांगले काम केल्यास त्याला पाच वर्षापर्यंत बढती दिली जाईल. त्यासाठी वयाची अट नाही. कमीत कमी वय ४० वर्ष असावे. वेतन आणि इतर सुविधा त्याला मिळतील. म्हणजे १ लाख ४४ हजार २०० रुपयांपासून ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. 


संयुक्त सचिवसारख्या मुख्य पदांवर खाजगी कंपन्यातून व्यक्तींची नियुक्ती करणे म्हणजे संघाची माणसे बसविण्याचा हा खटाटोप आहे. त्यामुळे हे चुकीचे असून सरकारच्या कामकाजात ही माणसे दखल घेऊ लागतील. हे देशासाठी घातक असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी केली आहे.


संविधानाने युपीएससीच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस, आयएमएस यासारखी पदे भरावीत असे सुचविले आहे. कारण ही पदे देशाच्या धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. 


त्यासाठी युपीएससीच्या अभ्यासक्रमातून जो तावून सुलाखून निघेल व स्पर्धेमध्ये टिकेल अशाच बुद्धिमान व्यक्तीची या प्रशासनिक पदांवर नियुक्ती करण्याचा पायंडा आहे. मात्र मोदी सरकारने नको ते पाऊल उचलून पुन्हा एकदा ब्राह्मणांचे जोडे उचलण्याचे काम केले आहे. 


कारण प्रधानमंत्री मोदी हे ब्राह्मणांनी नामनिर्देशित केलेले आहेत. त्यामुळे आरएसएसचा कंपू जो निर्णय देईल तो निर्णय मोदींच्या माध्यंमातून खपवला जातो. जो नामनिर्देशित करतो त्याचीच पॉवर असते. म्हणूनच आरएसएच्या वर्चस्वाखाली मोदींना काम करावे लागत आहे. 


युपीएसएसीच्या माध्यमातून ही पदे भरा, असे संविधान सांगत असताना परीक्षा न घेताच एवढ्या महत्त्वाच्या पदांवर एखाद्या कार्पोरेट कंपन्यातील लोक, माणसे येत असतील तर ब्राह्मण या देशाला कुठे नेत आहेत. या विचारानेच मनात घालमेल सुरु होते. एका अर्थाने आम्ही संविधान मानतच नाही. इथे मनुस्मृतीचेच राज्य चालते. असा संदेश या कृतीतून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 


देशाच्या विकासावर परिणाम करणारा हा एवढा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी विरोधही दर्शविला. तर लोकांमध्येही या निर्णयाविरोधात पडसाद उमटले. मात्र या निर्णयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक भिडे नामक व्यक्तीला पुढे करुन ‘आंबे पुराणा’ची पेरणी करण्यात आल्याचा वास दिसून येत आहे. 


म्हणूनच गेल्या दोन दिवसापासून हे ‘आंबे पुराण’ जाणीवपूर्वक मीडियामध्ये चर्चेत ठेवले जात आहे. परीक्षेविना संयुक्त सचिव पदाच्या निवडीचा मुद्दा देशभरात चर्चीला गेला आणि त्या जागांवर आरएसएसची लोक येणार अशातर्‍हेच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 


यामुळे देशात असंतोष माजून भाजप आणि आरएसएस कंपूला जाब विचारला गेला असता आपल्या विरोधात तापणारे वातावरण शांत करण्यात सरकारला यश आले. म्हणूनच नको नको ती विधाने करण्यात वेळ वाया घालविला जात आहे. त्यामुळे बहुजन बांधवांनी हे ‘आंबे पुराण’ थांबवून लोकशाहीचा गळा घोटणार्‍या या मुद्यावर लक्ष केंद्रीत करुन देशात आवाज उठवावा, असे आम्ही आवाहन करत आहोत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper