×

‘फेक इन इंडिया’

Published On :    14 Jun 2018
शेयर करा:


-



ग्राहकांकडून मागणी नसल्यानेच ‘मेक इन इंडिया’ हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा प्रकल्प अपेक्षेनुसार यशस्वी होऊ शकला नाही. उद्योग क्षेत्राकडे बँकांचे कर्ज थकीत, बुडीत राहण्यामागेही मागणीचा अभाव हेच कारण आहे, असे मत भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी येथे व्यक्त केले. 


अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी प्रथमच पश्चिम क्षेत्रातील उद्योजकांची बैठक घेतली. मोदींचा मेक इंडिया हा ‘फेक इन इंडिया’ आहे. कारण गेल्या चार वर्षात मोदी सरकारला विकासाची अपेक्षित गती साधता आलेली नाही. परिणामी फेक इन इंडियाने देशाचे वाटोळे मात्र जास्तच केले.


केंद्रात सत्तेवर आल्यापासून मोदींनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. त्याव्यतिरिक्त त्यांनी काही केलेच नाही. विदेशी गुंतवणूक आणण्याच्या गोंडस नावास अनेक देश त्यांनी पालथे घातले. परंतु परदेशातील किती गुंतवणूक झाली याची आकडेवारी सरकारकडे नाही. 


मेक इन इंडिया बरोबरच स्टार्ट अप इंडिया, आयुष्मान, जनधन योजना यासारख्या अनेक योजनांचा पाऊस पाडण्यात आला. जनधन योजना तर फसवीच. त्यावेळी लोकांना खाते काढण्यासाठी काहीच पैसे लागत नव्हते. त्यामुळे लोकांनी याची खाती उघडली. 


मात्र आता ही खाती बंद करताना ५०० रूपये चार्ज भरावे लागत आहे. म्हणजेच लोकांच्याच खिशाला कात्री लावण्यात आली. आयुष्मान योजना हीसुध्दा फसवीच. अनेक योजना फसव्या निघाल्या. नोटाबंदी करून तर मोदी सरकारने सर्वसामान्यांसमोर अडचण निर्माण केली. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल असे राणा भीमदेवी थाटात सांगितले गेले. 


किती काळा पैसा आजपर्यंत बाहेर आला याची आकडेवारी सरकार सादर करू शकलेले नाही.नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना काळा पैशांचा पुरवठा बंद होईल अशीही लोणकढी थाप ठोकण्यात आली होती. किती दहशतवाद्यांपर्यंत पैसा पोहचला नाही याची तरी माहिती सरकारकडे आहे का? नोटाबंदीमुळे केवळ धनदांडगे असलेले उद्योगपती यांचाच फायदा झाला. 


सर्वसामान्यांना तोटा होऊन बँकांच्या रांगेत उभे राहिल्याने अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. एक देश एक कर अशी करप्रणाली लावण्यात आली. जीएसटी असे त्याला गोंडस नाव देण्यात आले. परंतु जीएसटीमुळे व्यापारी वर्गही अडचणीत आला. त्यांना आपले विवरणपत्र कसे भरावेे यासाठी हेलपाटे मारावे लागले. 


जगामध्ये इंधनाच्या किंमती कमी असूनही भारतात मात्र इंधनाचे चढ्या दराने वाहतूकदार अडचणीत आले. त्यातच घरातील स्वयंपाकाचा गॅसही महागला. त्यामुळे गृहीणींच्या डोळ्यात पाणी आले. शेतीला भाव नाही, त्यातच कर्जाचा डोंगर म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागला. 


कुठेनाकुठेतरी देशात आज प्रत्येक दिवशी आत्महत्या होत आहे. ऊसाला भाव नाही म्हणून साखर कारखानदार अडचणीत आला. भाजीपाल्याला भाव नाही शेतकरी अडचणीत आला. त्यातच या सरकारने अनेक घोटाळे करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. 


त्यातच विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सीसारख्या उद्योगपतींनी हजारो कोटींचे घोटाळे करून बँक व्यवस्था डबघाईला आणली. ही लोकं केवळ घोटाळे करून थांबले नाहीत तर या देशातून सहीसलामत पलायनही केले. त्यासाठी सरकारच्या कुठल्यातरी यंत्रणेने त्यांना सहकार्य केले असावे. त्याशिवाय सहीसलामतपणे ते देशातून कसे काय पलायन करू शकतात. 


एकंदरीत मोदी सरकारचा विकास केवळ कागदावरच दिसतो. विकास नावाच्या पोराने अजूनतरी जन्म घेतलेला नाही. कोटीच्या कोटी उड्डाणे. पोकळ घोषणा हीच मोदींच्या कागदी विकासाची सूत्रे आहेत. सर्वसामान्य पिचला जात असताना त्यांना कुणीच वाली राहिलेला नाही. ‘अब की बार मोदी सरकार’ नव्हे तर या घोषणेची उलटी गिणती होऊन ‘फेकू मोदी सरकार’ अशी संभावना होऊ लागली आहे. 

 

मेक इन इंडियासह इतर औद्योगिक प्रकल्पांसाठी उद्योगांनी बँकांकडून कर्जे घेऊन गुंतवणूक केली. पण मधली तीन वर्षे देशात दुष्काळ परिस्थिती होती. त्याचा परिणाम ग्रामीण क्षेत्राच्या क्रयशक्तीवर झाला. दुष्काळावर मात करता आले नाही. 


सगळीकडे मागणीत घट झाल्याने उद्योग संकटात आले व त्यातूनच कर्जे बुडीत श्रेणीत गेली. स्टील आणि ऊर्जा क्षेत्रांना याची सर्वाधिक झळ बसली. रस्ते उभारणी क्षेत्रातील ६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व परवडणार्‍या घरांची होणारी उभारणी, यामुळे सिमेंटच्या मागणीत वाढ होईल. मात्र बांधकाम व्यवसायिकही अडचणीत आले. 


पेट्रोल, डिझेल व गॅसमुळे वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरात वाढ केली. यामुळे कर्जे महाग होऊन त्याचा फटका उद्योगांना बसला. महागाई नियंत्रणात येण्यासाठी पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणणे अत्यावश्यक आहे. इतर देशांप्रमाणे जीएसटीचा एकच दर ठेवणे अशक्य असले तरी दोन किंवा तीन दरश्रेणीच असाव्यात, असे आवाहन मित्तल यांनी केले आहे. 


त्यावर सरकार काय पावले उचलते यावर भाजपाचे भवितव्य अवलंबून आहे. नाहीतर ईव्हीएममध्ये घोटाळा न केल्यास या देशातील जनता तुम्हांला घरी बसवायला तयार आहे. कारण तुमच्या या सरकारचा लोकांना चार वर्षातच वीट आला, यावरून लक्षात येते की, तुम्ही कुठलेच काम केलेले नाही. मेक इंडियाच्या नावाखाली केवळ फेक इन इंडियाच केले असे दिसून येते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper