×

शरद पवारांचे अर्धसत्य

Published On :    21 Jun 2018
शेयर करा:


-



आरएसएस आणि भाजपाच्या मनात विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाबाबत एक प्रकारची असूया आहे. ते घटनेवर विश्‍वास असल्याचे बोलतात. पण ती विधाने धादांत असत्यावर आधारलेली आहेत, असा आरोपही त्यांनी करतानाच आरएसएस व भाजपापासून संविधानाला धोका आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 


पवार साहेब..! तुम्ही बरोबर बोललात. परंतु तुम्ही नाण्याची एकच बाजू मांडलीत, केवळ आरएसएस-भाजपाकडूनच नव्हे तर कॉंग्रेसकडूनही संविधानाला धोका आहे. हे मात्र तुम्ही सांगितले नाहीत. कारण आपला तो बाब्या दुसर्‍याचा तो कारटा... अशी तुमची भूमिका दिसते. 


आज भारतीय लोकशाहीसमोर केवळ भाजपाचेच नव्हे तर कॉंग्रेसचेही आव्हान निर्माण झाले आहे.कारण भाजपा हा आता सत्तेवर आहे, परंतु देशाच्या तथाकथित स्वातंत्र्यानंतर कॉंगेसच सत्तेवर आहे. त्यामुळे या कॉंग्रेसनेच संविधान संपवण्याचा पहिला घाट घातला. त्यानंतर आरएसएस-भाजपाने. 


संविधान संपवण्याचा घाट विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पणजोबा म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी घातला. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ३.५ टक्के ब्राम्हणांना त्यांनी ६० टक्के तिकीटे दिली आणि ४७ टक्के ब्राम्हण निवडून आणले. 


नेहरूंनी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायला हवे होते. परंतु त्यांनी तसे न करता केवळ ब्राम्हणांचे वर्चस्व कसे राहिल याकडे पाहिले आणि या देशात लोकतंत्राऐवजी ब्राम्हणतंत्र आहे. कॉंग्रेस शेतकर्‍यांची भाषा बोलत असला तरी  पाठीमागे शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुरू आहे. 


त्यामुळे दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा आत्महत्या वाढत आहेत. भूमी अधिग्रहण कायदा कॉंग्रेसनेच आणला आणि देशातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावले. सेझ सारखे प्रकल्प आणले, खाउजा हे धोरण राबवून लोकांना बेरोजगार कॉंग्रेसने केले. त्यामुळे बहुजन नायक कांशीराम साहेब बोलायचे एक नागनाथ तर दुसरा सापनाथ. 


दोन्ही चावणारच. तसेच कॉंग्रेस व भाजपाचे आहे. दोघेही डसायलाच बसले आहेत. केवळ बसले नाहीत तर डसत आहेत. त्यामुळे बहुजन समाज हा रक्तबंबाळ अवस्थेत पडून आह. त्याला कोणीही वाली नाही. ही झाली कॉंगेसची तर्‍हा...!  


आरएसएसप्रणित भाजपा सरकार काय धूतल्या तांदळासारखा नाही. तोदेखील बदमाश आहे. आम्ही घटना बदलण्यासाठीच सत्तेवर आलो आहोत, असे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले आहे. भाजपा हे खुल्लमखुल्ला  सांगते. 


त्यामुळे त्यांचा अजेंडा काय आहे हे लक्षात येते, परंतु कॉंगेसचे तसे नाही. कॉंगेस बहुजनांची भाषा बोलतो परंतु काम मात्र उलट करतो. म्हणून कॉंगेस जास्त खतरनाक आहे. 


गेली चार वर्षे सतत समाजातल्या उपेक्षित माणसावर, घटकांवर, तरुणांवर, अल्पसंख्याकांवर, भगिनींवर, एससी, आदिवासींवर कुठले ना कुठले अत्याचार होत आहेत. अशी शेकडो उदाहरणे सातत्याने देशात घडत आहेत. या संविधानाची चिंता राज्यकर्त्यांना वाटत नाही कारण त्यांचा संविधानावर विश्‍वासच नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केली. 


मूळ संघटना आरएसएस असलेल्या भाजपाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाबाबत एक प्रकारची असूया आहे. ते घटनेवर विश्वास असल्याचे बोलतात. पण ती विधाने धादांत असत्यावर आधारलेली आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला दिलेल्या मूलभूत अधिकारावर कुणी संधान साधण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला उध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पवार साहेब...! चांगला निर्णय आहे. संविधानाच्याविरोधात काम करणार्‍यांना तुम्ही इशारा दिला आहे बरे झाले. हा इशारा केवळ पोकळ धमकी असू नये एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे.


गोध्रा प्रकरण जगभरात गाजले. तिथे जे झाले त्याचा निषेध मी करतो. काही मूठभर लोकांनी तिथे कायदा हातात घेतला. त्यावर कडक शासन करण्याची भूमिका घेण्याचे सोडून सबंध गुजरात पेटवण्याचे काम करुन निष्पाप लोकांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली. हे सगळे घडतेय,घडत होते तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचे नेतृत्व होते. आज त्यांच्याकडेच देशाची सत्ता आहे. आज या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर परिवर्तनाचा विचार करावा लागेल.


कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो हा समज मागे पडला आहे. शेती, उद्योग, नागरिकीकरण, निवार्‍याच्या संबंधीचे प्रश्‍न आहेत. ज्या सगळ्यात सर्वांत जास्त किंमत घरातील महिलेला द्यावी लागते. त्यामुळे या संदर्भातील निर्णय महिलांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतले जायला हवेत. 


मात्र आजच्या कार्यकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. चिंता ही आहे की, ज्या घटनेने आपल्याला अधिकार दिले. त्या घटनेसंबंधी राज्यकर्त्यांच्या मनात किती आस्था आहे, याची खात्री देता येत नाही. असेही पवारसाहेब तुम्ही म्हणाला आहात. एवढा बदल पवारसाहेबांमध्ये झाला तर सोन्याहून पिवळे होईल.


आरएसएस प्रमुखांनी कायम सामान्य माणसाला दिलेल्या अधिकार्‍यांच्या संबंधीची एक आशंका समाजाच्या मनात निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचा घटनेवर विश्वासच नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांचे मार्गदर्शक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात घटनेच्या विरोधात विचार मांडले आहेत. 


या गोळवलकरांचे विचार मोंदीसकट सर्व मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारतात व त्याच मार्गाने जातात. यावरून त्यांची घटनेच्या संबंधीची मानसिकता स्पष्ट होते. जेव्हा घटनेवर आघात होईल तेव्हा तो समाजातील एससी, वंचित, उपेक्षित, गरीब, अल्पसंख्याक, आदिवासी आणि विशेषतः महिलावर्गावर तो आघात असेल. 


हा आघात करू पाहणारा पक्ष सत्ताधारी बनून आपल्यासमोर उभा ठाकला असता यांना कसे दूर करायचे याचा विचार आपल्याला करावा लागेल. ही लढाई सोपी नाही पण लढाई केल्याशिवाय गत्यंतर नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ही लढाई शेवटपर्यंत लढणार आणि सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणार, हा माझा विश्‍वास आहे.


असे पवारसाहेबांनी आश्‍वस्त केले आहे. मात्र ते आपल्या विचारांशी किती प्रामाणिक राहतात हा खरा मुद्दा आहे. कारण आजवरचा इतिहास पाहिला तर आज बोललेले पवार उद्या त्याच विधानावर कायम राहतील याची काय शाश्‍वती नाही. त्यामुळे पवारसाहेब... तुम्ही अर्धसत्य सांगून पुन्हा एकदा धोबीपछाड देण्याच्या तयारीत नाही ना? अशी शंका बळावते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
...आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे २०१९ मध्ये भाजपाला मदत करतील
अनु.जातीच्या महिलेने शिजवलेल्या माध्यान्ह भोजनावर ब्रा
भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्यांने ‘तेच’ पाणी के
...अखेर रामदास आठवले बर्‍याच वर्षानंतर खरे बोलले
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल
महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली
फटकळ बोलण्यानेच मी नको!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper