×

मोदीजी! आधी मन स्वच्छ करा!

Published On :    26 Mar 2018
शेयर करा:


-



२ ऑक्टोबर २०१४ मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या नावे आपण देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानाला ४ वर्षे झाली आहेत. स्वच्छता अभियानाचे आपल्या सरकारकडून ढोल पिटण्यात आले. परंतु हे स्वच्छता अभियानाचे ढोल केव्हाच फुटले आहेत. 


गेल्या ४ वर्षात देशभरात स्वच्छता अभियानासाठी १ हजार ६२८ कोटी खर्च करण्यात आले. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. देशभरात १८ टक्के कचर्‍याची वाढ झाली असून ७६ टक्के कचर्‍यांचे ढिग साचलेले आहेत. 


ज्यांच्या नावाने स्वच्छ भारत अभियान सुरु केले त्या गांधी यांच्या विचारातच बहुजन द्वेषाचे विष कालवलेले होते. मोदीजी! भारत स्वच्छ करण्याऐवजी आधी आपले मन स्वच्छ करा. कारण मन स्वच्छ असेल तर सर्वकाही स्वच्छ दिसते. परंतु तुम्हाला आरएसएसच्या विचारांची कावीळ झाली आहे. त्यामुळे सर्व जग तुम्हाला पिवळे झालेले दिसत आहे.


गेली ४ वर्ष स्वच्छता अभियानाचा गाजावाजा करण्यात आला. परंतु या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. रोज देशभरात १ लाख ५७ हजार ४७८ मेट्रिक टन कचरा काढला जातो. त्यातील २३.७ टक्के कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. 


दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकत्ता या प्रमुख शहरांमध्ये सफाईसाठी ४ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आले आहेत. परंतु कचरा काही कमी झालेला नाही. कचर्‍याची स्वच्छता होईलच परंतु आपल्या मनाची स्वच्छता कधी होईल हा मोठा प्रश्‍न आहे. 


दरम्यान, काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आर.आर.पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान सुरु केले. या अभियानाला महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद लाभला. परंतु अस्वच्छता का निर्माण होते याचे कारण विचारात अस्वच्छता असल्यामुळे. जसा विचार तसे आचरण. 


राष्ट्रसंत गाडगे महाराज उठसूठ गावेच्या गावे साफ करायचे का? नाही मूलनिवासी बहुजनांच्या डोक्यातील अस्वच्छता?म्हणजेच ब्राह्मणवाद साफ करण्याचे काम करायचे. भटमुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गावेही स्वच्छ होत नाही हा गाडगे महाराजांचा सिद्धांत! म्हणून गाडगे महाराजांच्या सिद्धांताला अनुसरुन दळभद्री आरएसएसच्या डोक्यातल्या किड्यांना वेळीच ठेचले पाहिजे, जेणेकरुन भटमुक्ती व भयमुक्तीच्या चळवळीला जोम येईल.


मोदीजी! राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा विचार जर आपल्या डोक्यात असता तर गांधींच्या नावे हे अभियान सुरु करण्यात आले नसते. परंतु गाडगे महाराजांचा विचार आपल्या डोक्यात येण्याचे कारणच नाही. कारण ज्या संगतीत तुम्ही वाढलात त्या पिलावळीचा विचार हा विध्वंसक आणि बहुजन विरोधी आहे. 


त्यामुळे अर्थातच बदमाश व पाखंडी असलेल्या गांधींचे नाव या स्वच्छता अभियानाला देण्यात आले. ज्या अर्थी गांधींचे नावे दिले गेले त्या अर्थी काम होणारच नाही. हे समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. कारण स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.


जगद्गुरु संत तुकोबारायांनी ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!’ असे स्वच्छतेचा मंत्र देताना म्हटले आहे.?म्हणून आधी मनामध्ये चांगले विचार आणा आणि मग स्वच्छता अभियान राबवा. मनात बहुजन द्वेष आणि वरवर ब्राह्मणांचे हित पाहण्याचे विचार असतील तर काय कामाचे?


आज सार्‍या देशात ब्राह्मणांच्या कुविचाराची गटारगंगा वाहत आहे. त्यामुळे भारतात अस्वच्छतेचे तण जागोजागी उगवले आहेत. मूलनिवासींची श्रमण संस्कृती नष्ट करुन ब्राह्मणांनी भ्रमण संस्कृती लादली. 


सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक या विविध क्षेत्रात घुसखोरी करुन विचारात भेसळ केली. ही एक प्रकारे ब्राह्मणांनी केलेली अस्वच्छताच आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बडव्यांनी तर कमालच केली. तिर्थामध्ये देव नाही हे बहुजनांपेक्षा ब्राह्मणांनाच जास्त ठाऊक आहे. 


सांडूनी पंढरी जासी आणिक तिर्था| लाज तुझ्या चिंता कैसी नये॥ असे नामदेव महाराजांनी सांगितले आहे. म्हणून तर पांडुरंगाच्या कुंडात पंढरपूरचे बडवे रात्रीच्या वेळी मुततात. १५ मे २००३ ला गोपाळ रामकृष्ण बडवा रुक्मीणी मातेच्या मंदीरासमोरील कुंडात लघवी करताना सापडला. तेव्हा त्याने उत्तर दिले हे मी एकटाच करीत नाही. 


त्याच्या म्हणण्यानुसार सगळेच बडवे रात्री पांडुरंगांच्या मंदीराच्या शेजारी मुततात. असे हे नीच वृत्तीचे ब्राह्मण बडवे आहेत. सर्व मंदीरांमध्ये याच बडव्यांची बडदास्त असते. बौद्ध विहारांवर अतिक्रमणे करुन त्यांना मंदीराचे स्वरुप देण्यात आले आहे. 


सर्व संपत्ती बहुजनांची असूनही ब्राह्मण मात्र तेल तूप खाऊन ‘लठ्ठ गोणी तठ्ठ झाली अन् बेंबी खालची गाठ गेली’ असे गलेलठ्ठ होताना दिसत आहेत. ही सुद्धा ब्राह्मणांनी केलेली अस्वच्छता आहे. त्यामुळे मोदीजी! आधी देशातील अस्वच्छता साफ करण्याऐवजी ब्राह्मणी विचारांचे जे मळभ मनामध्ये ठाण मांडून बसले आहे, त्याला चाप लावला तर बरे होईल. 


परंतु आपल्याकडून हा चाप लागेलच याची काहीच खात्री नाही. कारण तुमचा विचारच ब्राह्मणी विचारांना पोषक आहे. म्हणून देशात कचर्‍याचे ढिग साचले असताना आम्हीच या ब्राह्मणरुपी कचर्‍याच्या ढिगाला आग लावल्याशिवाय राहणार नाही. या आगीत ब्राह्मणरुपी कचर्‍याचा ढिग निश्‍चित होरपळणार याची आम्हाला खात्री आहे. हा आमचा एल्गार आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बाबा रामदेवला बीएसएफने दिला झटका
भाजप आमदाराने पत्रकारांना दिलेल्या धमकीवर अमित शहांनी
पाच दिवसात ७५० कोटी कसे काय मोजले?
बेपत्ता ८ मुलांना माओवादी बनविण्याचा पोलिसांचा डाव
कठुआ गँगरेप प्रकरण अधिक प्रमाणात झोपीच्या गोळ्या दिल्य
अमित शहांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार
न्यायालयीन भरती स्थगित करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मो
फेसबुकवर ‘अनोळखी’सोबत मैत्री करणे पडले महागात
विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन
प्लास्टिक बंदीमुळे एका रात्रीत ३ लाख लोकांनी गमावली नोक
अखेर तोडगा निघाला
इंदिरा गांधीं हिटलर, अरूण जेटली यांचा कॉंग्रेसवर निशाणा
बहूजन क्रांती मोर्चा द्वारे आयोजित
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper