×

‘लोकराजा’ला अभिवादन

Published On :    26 Jun 2018
शेयर करा:


-



गुलामगिरीच्या जोखडात पिचलेल्या बहुजन समाजाला ज्यांनी आत्मभान दिले. बंड करण्यासाठी चेतना निर्माण केली आणि ज्यांनी या देशात पर्याप्त प्रतिनिधीत्व (आरक्षण) म्हणजे काय याची भारताला जाणीव करून दिली, फक्त जाणीव करून दिली नाही तर राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४४ वी जयंती. त्यानिमित्त शाहू महाराजांच्या क्रांतीकारी विचारांना त्रिवार अभिवादन करतो. 


२६ जून १८७४ ला शाहू महाराजांचा जन्म झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत होते. लोक त्यांना बाबासाहेब म्हणायचे. त्यांचा विवाह १ एप्रिल १८९१ ला बडोद्याचे गुणाजीराव खाणवीलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी संपन्न झाला. 


त्यांचे दत्तक विधान १७ मार्च १८८४ ला म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी शाहू छत्रपती महाराज या नावाने करण्यात आले. त्यांचा राज्याभिषेक २ एप्रिल १८९४ ला वयाच्या २० व्या वर्षी झाला. १८९४ ते १९२२ असे २८ वर्षे राज्य कारभार केला. राज्य कारभारात त्यांनी जगभर ठसा उमटविला. 


भारतातील ६६४ संस्थांपैकी केवळ बोटावर मोजता येणारी काही संस्थाने होती. ज्यांनी ऐशआरामाचे जीवन जगण्यापेक्षा पीडित समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला. त्यामध्ये करवीर अर्थात कोल्हापूरचे संस्थान, बडोदा संस्थान, इंदोर संस्थान यापैकी बडोदा संस्थानचे संस्थानिक होते बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड तसेच इंदोर संस्थांचे संस्थानिक होते राजे मल्हारराव होळकर! आणि करवीर अर्थात कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक होते राजर्षी शाहू महाराज! राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे फुले-आंबेडकरांना जोडणारा दुवा होय. 


ते ब्राह्मणेत्तर चळवळीचे वाहक होते. सामाजिक, शैक्षणिक कला व धार्मिक या सर्वच क्षेत्रातील क्रांतीकारक होते. त्यांनी रचनात्मक काम करुन केवळ भारतालाच नव्हे तर जगालाही एक आदर्श निर्माण करुन दिला. राज्यभिषेकापूर्वी करवीर संस्थानाला अशा प्रकारचा राजा मिळाला नव्हता. भारताच्या इतिहासात स्त्रीया आणि शूद्र अतिशूद्रांना अर्थात एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी त्यातून धर्म परावर्तीत झालेले लोक व महिलांना सर्व प्रकारचे अधिकार देणारा यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेशी संघर्ष करणारा एकमेवा राजा अशी नोंद करावी लागेल. 


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मानवी मुल्यांसाठी संघर्ष केला. खरे तर आपल्या सर्व मूलनिवासी महापुरुषांचा संघर्ष हा न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या चार मानवी मूल्यांसाठी होता. अर्थात ब्राह्मणेतरांसाठी होता. वर्धमान महावीरांचा संघर्षही बहुजनांसाठी होता. संतांचा संघर्ष वारकर्‍यांसाठी होता. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचा संघर्ष रयतेसाठी होता. 


राष्ट्रपिता जोतिराव फुलेंचा संघर्ष ब्राह्मणेतर लोकांसाठी होता. त्यांनाच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ मध्ये करवीर संस्थांनात पर्याप्त प्रतिनिधित्व (आरक्षण) दिले. तोच कित्ता विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून गिरवला. एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी आणि धर्म परावर्तीत व महिलांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले. 


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राज्याचा पदभार स्विकारल्यानंतर राज्याची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी संपूर्ण राज्यभर दौरा केला. त्यावेळी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य, नाट्यकला, शिल्पकला, शासन-प्रशासनातील स्थिती, सिंचन व्यवस्था याची पाहणी केली. सर्व बाबींचा अभ्यास केला आणि सर्वच क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना केल्या. 


वेदोक्त प्रकरणात शूद्र म्हणून शाहू महाराजांचा अपमान करण्यात आला. खरे तर हा संघर्ष ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेत्तर असा आहे. तो गेली हजारो वर्षापासून चालू आहे. सर्व ब्राह्मण छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात एकत्र आले. अगदी बाळगंगाधर टिळकांनी देखील भ्रष्ट राजपुरोहित नारायण भटाची बाजू घेतली. शेवटी पाच वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांच्याच बाजूने निकाल लागला. 


परंतु छत्रपती शाहू महाराज यातून खूप काही खिकले. या प्रकरणातून त्यांना सर्व ब्राह्मणांचे चारित्र्य आणि चरित्र समजले. मूलनिवासी बांधवांचा अपमान करणारी ही ब्राह्मणी व्यवस्था मूळापासून उखडून काढण्याचा निर्णय घेतला. ते करवीर संस्थानात राजे होते. म्हणून त्यांनी आपल्या संस्थानातून ही ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करण्याची चळवळ उभारली. 


राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक आंदोलनाला पुनर्जिवित केले. केवळ शाहू महाराजांचा नव्हे तर सर्वच मूलनिवासी महापुरुषांचा युरेशियन ब्राह्मण वेळोवेळी अपमान केला. केवळ अपमानच केला नाही तर काहींच्या हत्याही केल्या. म्हणून सर्वच मूलनिवासी महापुरुषांनी ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करण्यासाठी व्यवस्था परिवर्तन करण्याचा जीवनाच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न केला. 


देशात आज फार मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याला कारण या देशात फोफावलेला ब्राह्मणवाद! राजकीय व्यवस्था पूर्णतः ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे. कॉंग्रेस, भाजपा, भाकप, माकप, तृणमूल कॉंग्रेस या सर्वच राजकीय पार्ट्या या ब्राह्मणांच्या आहेत. त्यामुळे कुठल्याही समस्याचे समाधान होत नाही. छत्रपती शाहू महाराजांकडे राजकीय प्रगल्भता होती. 


म्हणून त्यांनी बहुजनांची राजकीय पार्टी असावी या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली होती. या राजकीय पक्षाच्या माध्यमातून बहुजनातील शिकलेल्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायचे असा त्यांचा निर्धार होता. परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांची हत्या केल्याने छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष उदयास आला नाही. 


जर का शाहू महाराजांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष आज अस्तित्वात असता तर मूलनिवासी बहुजन समाजाला ब्राह्मणांच्या पक्षांकडे उमेदवारीसाठी हात पसरावे लागले नसते. स्वाभिमान जागृत करणरा, गुलामीची जाणीव करुन देणारा आणि आत्मभान जागवणारा अशा या लोकराजाला कोटी-कोटी अभिवादन!

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कर्जबाजारीपणामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांची सामूहिक आत्
RSS आणि मराठा सेवा संघ यांनी एकत्र येऊन काम करण्याचे पुरुष
राम मंदिर अजेंड्यावरून भाजपाची कोलांटी
मुंबईत वायुप्रदूषणाने १०,५०० जणांचा अकाली मृत्यू
जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा ठोठावला दंड
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नका
मुलं चोरीच्या अफवांमुळे गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून
श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात!
२२ शेतकरी आत्महत्या ठरविल्या अपात्र
खड्ड्यांनी घेतले ३ हजार ५९७ जणांचे नाहक बळी
गौरी लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ सुजित उर्फ दादा वेदां
एकत्रित निवडणुका मोदींना हुकूमशाहीचे दार खुले करतील!
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावला हार्दिक पटेल
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, ७० ठार
‘व्हिक्टोरिया स्मारक चालते, जीनांचा फोटो का नाही’?
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे राज्यांची वित्तीय स्थिती
विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना
‘मेक इन महाराष्ट्र’तून रोजगाराचे आश्‍वासन फोल
नापास विद्यार्थ्यांनाही पदव्या वाटप
शिक्षणमंत्री तावडे अधिवेशन सोडून गेले मुलीच्या ऍडमिशनल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper