×

केंद्राचे धोरण आणि विजय मल्ल्याचा कांगावा

Published On :    28 Jun 2018
शेयर करा:


-



गेल्या काही वर्षात बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात अनेक उद्योगपती फरार झाले आहेत. या फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. 


सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या कंपन्यांना १३ हजार ९०० कोटी रुपयांची संपत्ती विकण्याची परवानगी देण्यात यावी अशी कर्नाटक उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल केली आहे अशी माहिती विजय मल्ल्याने दिली आहे. 


यावर विजय मल्ल्याला कर्ज फेडण्याची इच्छा असती तर त्याच्याकडे यासाठी खूप वेळ होता असे परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी म्हटले आहे. म्हणजे या प्रतिक्रिया पाहिली असता ‘तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो’ अशी अवस्था या दोघांची आहे.


विजय मल्ल्या याने जवळजवळ ९ हजार कोटींचे कर्ज घेऊन विदेशात पळाला. ही घटना मनमोहनसिंग सरकारच्या कालखंडातील.  त्याने इंग्लंडचा आश्रय घेतला आहे. केवळ विजय मल्ल्याच नव्हे तर ११ कोटींचा चुना लावलेला नीरव मोदी, मेहूल चोक्सी यासारखी मंडळीही या नामावलीत आहेत. 


बिनधास्तपणे कर्ज घ्यायचे आणि बॅकांना लुबाडायचे अशी परिस्थिती आहे. सरकारशिवाय एवढी मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. म्हणूनच राजरोसपणे बॅकांना लुटून परदेशात पलायन करण्याचे धोरण राबवले जात आहे. आज या उद्योगपतींनी लुटल्यामुळे बँकींग व्यवस्था अडचणीत आली आहे. या क्षेत्राला उतरती कळा लागली आहे. आपल्या रूपयाचे अवमूल्यन होताना दिसत आहे. 


विजय मल्ल्याप्रमाणेच नीरव मोदी, मेहूल चोक्सी सारखे आर्थिक गुन्हेगार आहेत. नीरव मोदी तर प्रधानमंत्री मोदी यांच्या दावोसमधील दौर्‍यात होता. याचा अर्थ या आर्थिक गुन्हेगारांचे लागेबांधे फार मोठ्या व्यक्तींशी आहेत. त्यामुळेच त्यांना कोणीही हात लावताना दिसत नाही.


देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. उद्योगधंदे बसले आहेत. एका बाजूला सर्वसामान्य जनता महागाईत भरडली असताना दुसर्‍या बाजूला श्रीमंताचे बंगले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. गरीबाला खायला अन्न नाही. अशी परिस्थिती असताना देशातील उद्योजक पळून जातात. आपल्या कनवटीला पैसा साठवून सर्वसामान्य जनता बँकेत पैसा ठेवते. 


तुटुपंची का होईना रक्कम जमा करते. परंतु त्याच रक्कमेवर बडे उद्योजक डल्ला मारतात. मग सर्वसामान्यांनी जगावे कसे? कारण बँकेत जमा करणारा जो व्यक्ती असतो तो सर्वसामान्य असतो. तो आपली कमाई बँका सुरक्षित आहेत म्हणून ठेवतो. परंतु अशातर्‍हेने लुटमार होत असेल तर त्याने पहायचे कुठे? याचा अर्थ कुंपणच शेत खाते आहे असा होतो. 


त्यामुळे हळूहळू बँकवरील विश्‍वासही उडायला लागला आहे. त्यातच खाजगी बँकाही लुटमारीत सहभागी होत आहेत. परिणामी नको ती परिस्थिती ओढवली आहे. याला आळा घालण्यासाठी ना सरकारकडे उपाय ना रिझर्व्ह बँकेकडे. दोन्ही जबाबदार संस्था नालायक ठरल्या आहेत.क कुठलाही निर्णय न घेता केवळ लोकांना त्रास देणे एवढेच त्यांना माहित आहे.


देशातील हजारो कोटींना चुना लावून पसार झालेल्या उद्योजकांविरोधात सरकारने काय कारवाई केली. याचे उत्तर नकारार्थीच आहे. केवळ त्याचा पासपोर्ट रद्द केला की आपले काम संपले अशी सरकारी यंत्रणेची रित आहे. त्याला इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर बजावले की झाले? मध्यंतरी विजय मल्ल्याच्या जातकुळीतला नीरव मोदी हा बनावट पासपोर्ट आधारे खुलेआम जगात फिरत होता. 


त्याला कुठलीही कोणी आडकठी आणली नाही. याचा अर्थ कुणीही किती लुटा आणि देशाबाहेर पळून जा असे लुटालुटीचा धंदा सुरू आहे. केवळ लुटमार करणे एकमेव या उद्योजकांचा धंदा झाला आहे. या थांबवणार कसे यावर सरकारने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. परिणामी या देशात घोटाळयामागे घोटाळे होत आहेत. त्याला काही पायबंद नाही. 


देशाची लुटमार करून अजूनही या उद्योजकांचे समाधान झालेले नाही. एखाद्या सर्वसामन्य लोकांकडे थोडीशी जरी थकबाकी राहिली तरी कर्जदाराच्या घरात जाणारे बँकांचे अधिकारी पाहिले तर निर्णय केवळ भांडवलधार्जिणे होत आहेत. सर्वसामान्यांना पिडणारे बँक अधिकारी पाहिले तर बडया लोकांना कसे वाचवले जाते याची प्रचिती येते. 


त्यामुळेच या उद्योजकांना बिनधास्तपणे करोडोंचा घोटाळा करून परदेशात पळून जाताना काहीही वाटत नाही. त्यांना माहित आहे की, या देशातील सरकारकडे हिंमतच नाही पावले उचलण्याची. म्हणून सरकारच्या डोळ्यात धूळफेक करत लुटमार सुरू आहे. मी कर्ज फेडायला तयार आहे असे विजय मल्ल्याने केलेला कांगावा आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र राज्यंमत्री एम.जे. अकबर यांची प्रतिक्रिया पाहिली असता तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशी अवस्था आज निर्माण झाली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कर्जबाजारीपणामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांची सामूहिक आत्
RSS आणि मराठा सेवा संघ यांनी एकत्र येऊन काम करण्याचे पुरुष
राम मंदिर अजेंड्यावरून भाजपाची कोलांटी
मुंबईत वायुप्रदूषणाने १०,५०० जणांचा अकाली मृत्यू
जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा ठोठावला दंड
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नका
मुलं चोरीच्या अफवांमुळे गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून
श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात!
२२ शेतकरी आत्महत्या ठरविल्या अपात्र
खड्ड्यांनी घेतले ३ हजार ५९७ जणांचे नाहक बळी
गौरी लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ सुजित उर्फ दादा वेदां
एकत्रित निवडणुका मोदींना हुकूमशाहीचे दार खुले करतील!
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावला हार्दिक पटेल
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, ७० ठार
‘व्हिक्टोरिया स्मारक चालते, जीनांचा फोटो का नाही’?
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे राज्यांची वित्तीय स्थिती
विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना
‘मेक इन महाराष्ट्र’तून रोजगाराचे आश्‍वासन फोल
नापास विद्यार्थ्यांनाही पदव्या वाटप
शिक्षणमंत्री तावडे अधिवेशन सोडून गेले मुलीच्या ऍडमिशनल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper