×

संपादकीय: अधर्म राज

Published On :    27 Mar 2018
शेयर करा:


-



अधर्म राज

भाजपप्रणित हिंदुत्ववादी सरकार असलेल्या उत्तराखंडमध्ये आता धर्म बदलल्यास पाच वर्षाचा कारावास सोसावा लागेल, असा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. जर कोणत्याही व्यक्तीला धर्म परिवर्तन करायचे असेल तर त्यांना एक महिना अगोदर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करावा लागेल. 


जिल्हाधिकारी आणि पोलीस खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच धर्म परिवर्तन करता येईल, असा अजब फतवा काढण्यात आला आहे. आवाजी मतदानाने हा निर्णय पारित करण्यात आला आहे. संविधानातील कलम क्र.२५ नुसार प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यानुसार ज्या व्यक्तीला जो धर्म पसंत आहे त्या धर्मात तो जाऊ शकतो. असे असतानाही अशा प्रकारचा अजब फतवा काढणे म्हणजे संविधानालाच नख लावण्यासारखे आहे.


माणूस एक धर्म सोडून दुसर्‍या धर्मात का जातो यावर पहिल्यांदा चिंतन होण्याची गरज आहे. जेव्हा एखादा मनुष्य आजारी पडल्यास त्याला डॉक्टर सांगतो की, अमुक तमुक औषध घे. औषध घेऊनही आजार बरा होत नसेल तर त्याला इंजेक्शन देण्यात येते. 


इंजेक्शन देऊनही तो आजार आणखी वाढला तर शेवटी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण ऑपरेशन केल्यानेच तो मनुष्य आजारातून बरा होतो. तसेच धर्म परिवर्तनाचे आहे. एखादा धर्म हा बहुजन हिताय नसेल तर त्या धर्मात राहून काय उपयोग, असा विचार करणारी अनेक माणसे या जगात आहेत. 


म्हणूनच लोक जेथे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आहे अशा धर्मात प्रवेश करतात. एकाबाजूला लिंगायत समुदायाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळत असताना दुसर्‍या बाजूला धर्मांतर केल्यास शिक्षा करण्याचा निर्णय घेणे म्हणजे धर्म स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणल्यासारखे आहे.

 

दि. १४ ऑक्टोबर १९५६ ला विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म परिवर्तन केले. कारण त्यांना हिंदू धर्मामध्ये असमानता दिसली. भेदभाव, गैरबराबरी करण्यात येऊ लागल्याने हिंदू धर्म आपल्याला माणसाप्रमाणे जगू देत नसेल तर त्या धर्मात राहून उपयोग काय? म्हणूनच डॉ.आंबेडकरांनी हिंदू धर्माला सोडचिठ्ठी देत समतामूलक अशा बुद्ध धम्माचा स्वीकार केला. 


जेव्हा धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम नागपूर येथे झाला त्याचा मूळ उद्देश होता विचार परिवर्तन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मनुष्य धर्मासाठी नाही तर धर्म मनुष्यासाठी आहे. जो मनुष्य धर्मासाठी असतो तो धर्माला शरण जातो. जो शरणागत होतो तो भक्ती करतो. जे भक्ती करतात त्यांचा सत्यानाश होतो. 


धर्माला मनुष्याचे कल्याण करण्यासाठीच विचार करायला हवा. कल्याण होते अथवा नाही यासाठी धर्माला आपली स्वतःची समीक्षा करायला हवी. मनुष्याचे कल्याण होत असेल तर ठीक, होत नसेल तर तो कसला धर्म? असा सवालही केला होता. 


एक माणूस दुसर्‍या माणसासोबत जो व्यवहार करतो तो व्यवहार समतापूर्ण, स्वतंत्रतापूर्ण, न्यायसंगत आणि बंधुत्वाने प्रेरित आहे. जर असेल तर तो त्या व्यक्तीचे आचरण धम्मप्रणित आहे. एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्ती बरोबर जो व्यवहार करतो, जे आचरण करतो तोच धम्म आहे. ही एक सामाजिक कल्पना आहे.


तथागत बुद्धांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर आघात केला. बुद्धाने बहुजन समाजाच्या समस्यांचे प्रतिनिधित्व केले. बहुसंख्य लोकांच्या समस्यांसाठी लढाई लढली. आक्रमणकारी युरेशियन ब्राह्मणांसोबत संघर्ष केला. बहुसंख्य लोकांना आपल्याशी जोडण्याची पद्धत तथागत बुद्धाने वापरली होती. विषमतावादी व्यवस्थेविरोधात आंदोलन चालविले. म्हणूनच बहुसंख्य लोक बुद्धांचे अनुयायी झाले आणि बुद्ध धम्म स्विकारला.


उत्तराखंडमध्ये धर्म बदलल्यास पाच वर्षाचा कारावास अशी शिक्षा देण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे हिंदुत्वाची खुंटी अधिक बळकट करण्याचा प्रकार आहे. कारण या हिंदुत्वाच्या खुंटीवर अनेक डोमकावळे बसलेले आहेत. 


या डोमकावळ्यांमध्ये मोहन भागवत नामक पिलावळ मोठी आहे. त्यामुळे बहुजनांनी धर्म परिवर्तन करताना सावध असायला हवे. डोक्यात असलेला हिंदुत्वाचा ‘कु’ विचार आधी बाहेर काढायला हवा. गांधीसारखा पाखंडी विचार करणे उपयोगाचे नाही. कारण गांधींची रोग बरा करण्याची जी पद्धत होती ती सारासार खोटी होती. 


जो मनुष्य दुसर्‍या मनुष्यासोबत माणसासारखा व्यवहार करत नसेल तर ती व्यक्ती वाईट आहे. किंवा जी व्यक्ती त्या माणसासोबत माणसासारखा व्यवहार न केल्यामुळे तो दुःखी होईल ते चुकीचे आहे. गांधींच्या दृष्टीकोनातून प्रत्येक व्यक्ती चुकीचा आहे. चुकीचा व्यवहार करणारा चुकीचा नाही. जो मनुष्य अस्पृश्य मनुष्याला स्पर्श करण्यास नकार देतो तो अस्पृश्यतेचे पालन करतो. 


घाण तर त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये आहे ज्याच्या मेंदूमध्ये घाण आहे. गांधी त्या ठिकाणी झाडू मारण्याऐवजी सफाई करणार्‍या व्यक्तीच्या वस्तीमध्ये झाडू मारण्याासाठी येतात ही किती आश्‍चर्यजनक गोष्ट आहे. म्हणून गांधीसारखा पाखंडी विचार बाजूला सारुन आपण समतामूलक असा व्यवहार केला पाहिजे.


धर्मपरिवर्तन हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. असे असताना उत्तराखंडसारख्या सरकारने तुघलकी निर्णय देऊन आपली बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट केली आहे. काय खावे, काय खाऊ नये, कुठल्या धर्माचे आचरण करावे, कुठला धर्म सोडावा हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विचारातून आलेले वास्तव रुप समोर येते. त्यामुळे कुठल्याही सरकारने असा निर्णय लाटणे चुकीचे आहे. 


म्हणूनच जो माणसासारखा वागतो ज्याला अन्याय व विषमता सहन होत नाही तोच मनुष्य धर्मपरिवर्तनाच्या वाटेेकडे वळतो. म्हणून कुठल्याही सरकारने अशा प्रकारचा कायदा करुन मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करु नये. असा मुस्कटदाबीचा प्रयत्न झाल्यास त्या सरकारचे थोबाड फोडायला लोक मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशारा द्यावासा वाटतो. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बाबा रामदेवला बीएसएफने दिला झटका
भाजप आमदाराने पत्रकारांना दिलेल्या धमकीवर अमित शहांनी
पाच दिवसात ७५० कोटी कसे काय मोजले?
बेपत्ता ८ मुलांना माओवादी बनविण्याचा पोलिसांचा डाव
कठुआ गँगरेप प्रकरण अधिक प्रमाणात झोपीच्या गोळ्या दिल्य
अमित शहांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार
न्यायालयीन भरती स्थगित करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मो
फेसबुकवर ‘अनोळखी’सोबत मैत्री करणे पडले महागात
विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन
प्लास्टिक बंदीमुळे एका रात्रीत ३ लाख लोकांनी गमावली नोक
अखेर तोडगा निघाला
इंदिरा गांधीं हिटलर, अरूण जेटली यांचा कॉंग्रेसवर निशाणा
बहूजन क्रांती मोर्चा द्वारे आयोजित
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper