×

जगतगुरू क्रांतीकारी संत तुकारामांना अभिवादन...!

Published On :    4 Jul 2018
शेयर करा:


-



‘अभद्र ब्राम्हण जळो त्याचे तोंड काय त्यास रांड प्रसवली’ अशा कठोर शब्दात ज्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेचे वाभाडे काढले व कोरडे ओढले त्या जगतगुरू क्रांतीकारी संत तुकाराम यांच्या कार्याला अभिवादन...! त्यांची आज ४१० वी जयंती. ४ जुलै १६०८ रोजी त्यांचा देहू या ठिकाणी जन्म झाला.


जगतगुरू संत तुकाराम यांनी अनेक अभंगाची रचना केली. त्यांचे अभंग भक्तीचे नव्हते तर क्रांतीचे होते. क्रांती म्हणजे समग्र परिवर्तन. संत तुकारामांनी माणसांच्या सोंगा-ढोंगावर, रागा-लोभांवर तसेच दंभावर आपल्या अभंगाच्या माध्यमातून शब्दांचा आसूड ओढला. मूलनिवासी बहूजन समाज हा अज्ञानी होता त्याच्या अज्ञानाचे कारण ब्राम्हणवर्ग होता. अज्ञानी माणूस राग-लोभ करील परंतु सोंग-ढोंग करण्याचा प्रयत्न करणार नाही. ब्राम्हणी व्यवस्थेने मूलनिवासी बहुजन समाजाचे जीवन एवढे कंगाल करून टाकले होते की, जीवन जगणेच त्यांना मुश्कील होऊन बसले होते. त्यांना ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती जमवण्याचा अधिकार नव्हता, सत्तेवर जाण्याचाही अधिकार नव्हता. म्हणून सर्वप्रथम संत तुकाराम महाराजांनी ब्राम्हरी व्यवस्थेवर प्रहार केले. त्यांनी स्वतंत्र दिशेने जाणे पसंत केले. ते आपल्या अभंगात म्हणतात, ‘आजवर होतो तुझ्या सत्तेखाली, तोवरी केली विटंबना’ ‘बहुत सोसिले मागे न कळता, आता पुढे काय अंध व्हावे’ तुकाराम महाराज म्हणतात की, मागे आम्हांला काही कळत नव्हते,म्हणून तुमचा अन्याय-अत्याचार सहन केला पण आता यापुढे आम्ही अंध होणार नाहीत. तुमचा अन्याय-अत्याचार सहन करणार नाही, असे तुकाराम महाराज निर्भिडपणे ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान देतात. 


‘काय करू आता धरूनिया भीड

नि:शंक हे तोंड वाजविले

नाही जगी कोणी मूकयाचा जाण

सार्थक लाजूनी नव्हे हित

तुकाराम महाराज म्हणतात, मूलनिवासी बहुजन समाज म्हणजे शुद्रातिशुद्र व स्त्रिया तोंड असून मुक्या आहेत. कान असून बहिर्‍या आहेत. डोळे असून आंधळ्या आहेत. यांचा कोणीही वाली नाही. म्हणून मी नि:शंकपणे व्यवसथेच्याविरोधात आवाज उठविणार. आता लाजून भिऊन आपले सार्थक होणार नाही. या ठिकाणी त्यांचे क्रांतीकारीतत्व दिसून येते. तथागत बुध्दांचे ते सच्चे पाईक होते. बुध्दी सम्यक आजविका तुकारामांनी आपल्या जीवनात उतरवली. ते म्हणतात, ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी’ 


ब्राम्हणांनी तुकारामांची संपत्ती हिरावून घेतली आणि त्यांना बहिष्कृत केले. यासंदर्भात त्यांचा अभंग आहे. ‘आता काय खाऊ कोणीकडे जाऊ, गावात राहू कोण्याबळे, कोपला पाटील गावातील लोक, आता कोण भीकं घाली मज’ हा त्यांचा अभंग फार अर्थपूर्ण आहे. तुकारामांची संपत्ती  हिरावून घेतली आणि त्यांना बहिष्कृत केले. रिकाम्या हाताने आपल्या मुलाबाळांना बायकोसह ते बाहेर पडले. धर्मसत्ता आणि राजसत्तेची युती असल्यामुळे लोकांनाही भीती आहे की आपण तुकारामांना भीक घातली कर आपली गत तुकारामांसारखी होईल. परंतु तुकाराम महाराज डगमगत नाहीत. कारण ते क्रांतीकारी होते. क्रांतीकारी हा पेटत्या मशालीसारखा असतो. मशाल उलटी धरली तरी तिच्या ज्वाळा वर भडकतात. संत तुकाराम बुध्द विचारांचे पाईक होते. तुकारामांनी आपले क्रांतीकारकत्व नष्ट होऊ दिले नाही. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. कारण ते ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान निर्माण झाले होते. 


संत तुकारामांची हत्या त्यांच्या क्रांतीकारकत्वामुळे झाली. या निर्विवाद सत्याला आमची माणसे स्विकारत नाहीत. सत्य बोलणे, सत्य वागणे तर सोडाच पण सत्य स्विकारण्याची आमच्यात हिंमत नाही. आम्ही ब्राम्हणांच्या दहशतीखाली वावरतो.संत तुकारामांना धमक्याही येत असाव्यात. म्हणून ते म्हणतात, ‘भीत नाही आता आपुल्या मरणा’ असे ठामपणे सांगतात. क्रांती करताना भिणे-मरणे याचा काही सबंधच नाही. ते भक्तीचे आंदोलन चालवत नव्हते तर मूलनिवासी बहुजन समाजाच्या मुक्तीचे आंदोलन होते. परंतु आताच्या वारकर्‍यांनी केवळ त्यांचे भक्तीचे आंदोलन होते असे सांगण्यास सुरूवात केली आहे. यामध्येही आताच्या वारकर्‍यांनी ब्राम्हणवाद घुसवला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे आंदोलन आता लोप पावले आहे. तुकाराम गाथा या मुलनिवासी बहुजन समाजासाठी प्रेरक होत्या. या गाथेतील अभंग मेंदूला झिणझिण्या आणत असत. ते ब्राम्हणांसाडी धोकादायक होेते. म्हणून त्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्या. अशा या क्रांतीकारी तुकाराम महाराजांना अभिवादन करताना त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केल्यास निश्‍चितच एक नवा किरण सापडेल. महान क्रांतीकारी संताला विनम्र अभिवादन, सॅल्युट आणि सलाम...!



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
...आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे २०१९ मध्ये भाजपाला मदत करतील
अनु.जातीच्या महिलेने शिजवलेल्या माध्यान्ह भोजनावर ब्रा
भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्यांने ‘तेच’ पाणी के
...अखेर रामदास आठवले बर्‍याच वर्षानंतर खरे बोलले
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल
महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली
फटकळ बोलण्यानेच मी नको!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper