×

वारकर्‍यांनो...टाळकरी न बनता ‘वार’ करी बना...!

Published On :    5 Jul 2018
शेयर करा:


-



आषाढी कार्तिकी आली टाळकुट्या वारकर्‍यांच्या डोक्यात संचारते. मग झेंडे काय आणि गुलाल काया याची उधळणच. परंतु संतश्रेष्ठ नामदेव महाराज व जगतगुरू संत तुकोबारायांचा वारकरी हा टाळकुट्या टाळकरी नव्हता. तर खर्‍या अर्थाने अन्यायाविरोधात वार करणारा होता म्हणून त्याला ‘वार’ करी असा समर्पक शब्द वापरण्यात आला आहे. वारकर्‍यांनो...टाळकरी न बनता ‘वार’ करी बना असे आम्ही तुम्हांला आवाहन करीत आहोत. 


संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी विठ्ठलोपासक वारकरी पंथ संघटित करून आपल्या जीवन कार्यास प्रारंभ केला. खरे पाहिले तर विठ्ठलोपासक वारकरी संतांची चळवळ होती. वारकरी संतांचे आंदोलन होते. वारकरी संतांचा पंथ नव्हता. पंथ या शब्दामुळे वारकरी संतांच्या आंदोलनाच्या व्यापकतेला बाधा येते. संत नामदेव संघटित वारकरी संप्रदायात सर्व जाती धर्माचे संत होते. त्यात गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा महार असे संत होते. नामदेवांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी ‘काला’ सुरू केला. गाडग्यात भात, दही, पोहे, लाह्या एकत्र करून काला करायचे व सर्वांना वाटायचे. यातून स्पृश्यअस्पृश्य भेद नष्ट करण्याचा प्रयत्न होता. आजही वारकरी संप्रदायात काला करण्याची परंपरा आहे, परंतु परंपरा म्हणून करतात. नामदेव महाराजांच्या काल्यामागचा उद्देश ते विसरून गेले आहेत. जातीभेदविरहीत आंदोलन सुरू केल्याने बहुजन शोषक ब्राम्हणी व्यवस्था हादरून गेली. संत नामदेवांनी ब्राम्हणी व्यवस्था मोडीत काढण्यासाठी त्यांच्या साधनांचा वापर केला नाही. ते आपल्या अभंगात म्हणतात.


‘योग-यागदान व्रत उद्यापन

नव्हे साधन काय करू

जप तप होम स्वधर्मचरण

नव्हे तीर्थाटन काही मज

नव्हे तीर्थाटन पुराण श्रवण

नव्हे ब्रम्हज्ञान शास्त्रबोध’ 


नामदेवांनी ब्राम्हणी व्यवस्थेतील साधने व शास्त्रे नाकारलीच, पण त्यांचे मूलाधार असलेले देवसुध्दा नाकारले. ते अभंगात म्हणतात, ‘आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचेन पाहू तोंड’ समताप्रस्थापक मूलनिवासी भागवत संप्रदायाचा बहुजन समाजावर प्रभाव होता. त्याचा फायदा उठविण्यासाठी भागवत संप्रदायात ब्राम्हणांनी घुसपेठ केली आणि भागवत संप्रदायाचे मूळ बीज लोप करून त्याचे ब्राम्हणीकरण केले. विठ्ठलोपासक वारकरी अशा अब्राम्हणी संप्रदायात ज्ञानेश्‍वराच्या माध्यमातून ब्राम्हणी विचारांचे प्रदूषण झाले. अशा प्रदूषित ब्राम्हणी विचाराने पछाडलेल्या वारकर्‍यांना काय करावे ते सूचत नाही. कारण पायी जाणारा वारकरी नव्हता. तर अन्यायाविरोधात वार करणारा वारकरी होता. परंतु आताचा वारकरी हा टाळकुट्या टाळकरी झाला आहे. त्यामुळे मूळ उद्दीष्टापासून तो भटकला आहे. परिणामी ज्या गतीने या वारकरी संप्रदायाची पालखी बहुजनवाद घेऊन चालाला हवी होती तशी चालताना दिसत नाही. 


संतांचे आंदोलन हे भक्तीमार्गाचे नव्हते. तर भट व भयमुक्तीचे होते. परंतु आताचा वारकरी भटमुक्तीला प्राधान्य न देता भटांना पायघड्या अंथरताना दिसत आहे. यासंदर्भात संत कबीर म्हणतात, ‘ना दशरथ घरी अवतारी आवा, ना लंकाराव सतावा’ म्हणजे दशरथ राजाच्या घरी जन्म घेतलेला माझा राम नाही. ज्या रामाने लंकेच्या रावणाचा वध केला तो राम माझा नाही. मग कबीरांचा राम कोण? अर्थात विवेक अंत:प्रेरणा हाचा कबीरांचा राम आहे. आत्मतेजाच्या व आत्मभानाच्या स्वच्छ जाणीवेला वारकरी संतांनी रामकृष्ण म्हटले आहे. 


‘तुका म्हणे सत्य सांगो, येवोत रागे येतील ती’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे सत्याचा शोध घ्यावा लागतो आणि लोकांना सांगावे लागते. भक्त आपली बुध्दी गहाण ठेवतात. म्हणून ते कुठल्याही गोष्टीवर विश्‍वास ठेवतात. भक्त फक्त परिणामावर चर्चा करतात. कारणांचा शोध घेत नाहीत. म्हणून ब्राम्हणी  व्यवस्था फक्त भक्त निर्माण करतात. समतेचा संदेश देणारा नामदेवाचा नामधारक संप्रदायही सनातनी मताचे लोक विषमतेचे प्रदूषण करून टाकाऊ करीत आहेत. यासाठी नुसती भजने, किर्तने किंवा पारायणे करून हे ग्रहण सुटणार नाही.यासाठी वारकरी संप्रदायाचे मूलगामी संशोधन करून त्याचे मूळ उन्नत रूपाकडे जाणे हीच खरी विठ्ठल भक्ती होय. म्हणून आजच्या वारकर्‍यांनी केवळ टाळकुट्या टाळकरी न बनता खर्‍या अर्थाने वारकरी बनावे. कारण जो भेसळयुक्त ब्राम्हणी (कु)विचार येत आहेत त्यांना रोखण्यासाठी काम करावे लागेल. त्यासाठीच आपल्या जीवाची बाजी लावावी लागेल. म्हणून वारकर्‍यांना फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्या जबाबदारीला खरे उतराल अशी अपेक्षा आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कर्जबाजारीपणामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांची सामूहिक आत्
RSS आणि मराठा सेवा संघ यांनी एकत्र येऊन काम करण्याचे पुरुष
राम मंदिर अजेंड्यावरून भाजपाची कोलांटी
मुंबईत वायुप्रदूषणाने १०,५०० जणांचा अकाली मृत्यू
जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा ठोठावला दंड
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नका
मुलं चोरीच्या अफवांमुळे गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून
श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात!
२२ शेतकरी आत्महत्या ठरविल्या अपात्र
खड्ड्यांनी घेतले ३ हजार ५९७ जणांचे नाहक बळी
गौरी लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ सुजित उर्फ दादा वेदां
एकत्रित निवडणुका मोदींना हुकूमशाहीचे दार खुले करतील!
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावला हार्दिक पटेल
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, ७० ठार
‘व्हिक्टोरिया स्मारक चालते, जीनांचा फोटो का नाही’?
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे राज्यांची वित्तीय स्थिती
विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना
‘मेक इन महाराष्ट्र’तून रोजगाराचे आश्‍वासन फोल
नापास विद्यार्थ्यांनाही पदव्या वाटप
शिक्षणमंत्री तावडे अधिवेशन सोडून गेले मुलीच्या ऍडमिशनल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper