×

ब्राह्मण-बनियांची ‘टॉयलेट’ पत्रकारिता

Published On :    29 Mar 2018
शेयर करा:


-



देशातील ब्राह्मण-बनिया मीडिया विकाऊ आहेच, त्याबरोबर यांची जी ‘टॉयलेट’ पत्रकारिता आहे त्याचे पितळ उघडे पडले आहे.  देशातील १६ मीडियांमधील अधिकारी पैसे घेऊन राजकीय धु्रवीकरण कसे होईल, अशातर्‍हेच्या बातम्या प्रसारित करत असल्याचा गौप्यस्फोट कोब्रा पोस्टने केला आहे. त्यामुळे ब्राह्मण-बनिया मीडियाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे. 


न्यायपालिका, संसद, कार्यपालिका आणि प्रसार माध्यमे ही लोकशाहीची चार खांबे आहेत. या चार खांबांना विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. परंतु या चारही स्तंभांवर आज ब्राह्मण-बनिया यांचे निरंकुश वर्चस्व आहे. 


त्यामुळे लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या प्रसार माध्यमांवर कब्जा करुन ब्राह्मण-बनियांनी आपल्याला हव्या तशा बातम्या प्रसारित करण्याचा सपाटा लावला आहे. खरं म्हणजे पत्रकारिता ही कुठल्याही समुदायाचे प्रश्‍न असतील त्यावर तोडगा काढून मार्गदर्शन करणारी हवी. परंतु आजची पत्रकारिता ही ‘टॉयलेट’ पत्रकारिता आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे समाजपूरक व समाजाला पोषक असलेले भाष्य आजची पत्रकारिता करीत नाही. 


दि.३१ जानेवारी १९२० रोजी विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुुरु केले होते. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सूचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरुपाची चर्चा करण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. तर दीनमित्र, जागरुक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजांच्या प्रश्‍नांची चर्चा वारंवार होते. 


परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्‍नांचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृतांच्या प्रश्‍नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही. हे देखील उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्‍नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे. हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे.


म्हणूनच स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यासाठी ‘मूकनायक’ पत्र सुरु करीत आहोत, असे त्यावेळी बाबासाहेब म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीला पोषक अशी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६) अशी वर्तमानपत्रे सुरु केली. बाबासाहेबांचे लेख विचार प्रवर्तक आणि बहिष्कृत समाजाच्या समस्यांचा सर्वांगिण विचार करणारे होते. तर्कशुद्ध खंडन, मंडन, युक्तीवाद, डौलदार व आवेशपूर्ण भाषा, समर्पक सुभाषिते, अवतरणे असा तो परिपूर्ण अंक असे. बाबासाहेबांची वर्तमानपत्रे व?त्यांची भाषा आजकालच्या पत्रकारांसाठी अभ्यासण्यासारखी आहेत.


ज्यांना खरच पत्रकारितेमध्ये एक वेगळा?ठसा उमटवायचा आहे त्यांनी बाबासाहेबांचे पत्रकारितेतील लिखाण जरुर वाचले पाहिजे. परंतु आजच्या ब्राह्मण-बनिया मीडियाला कुठल्याही प्रकारे वाचण्याची सवय नाही. बातमीची खातरजमा न करता उठसूठपणे ‘बे्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली ‘फेकींग न्यूज’चा जो धिंगाणा घातला जातो याला काही मर्यादाच नाही.


त्यामुळे आजकालची मीडिया एखाद्या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सररासपणे काम करताना दिसते. म्हणूनच आर्थिक हितसंबंध जोपासत खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यात आजची ब्राह्मण-बनिया मीडिया माहीर आहे. 


कोबरा पोस्टने केलेला खुलासा हा तर धक्कादायक आहे. देशातील प्रमुख १६ मीडिया कंपन्यांनी भाजपला अनुकूल ठरणार्‍या बातम्या प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रमुख मीडिया कंपन्यांमध्ये इंडिया टीव्ही, दैनिक जागरण, श्री अधिकारी बदर्स टेलिव्हीजन नेटवर्क, झी सिनर्जी अँड डीएनए, हिंदी खबर, नाईन एनएक्स, समाचार प्लस, एचएनएन लाईव्ह, पंजाब केसरी, स्वतंत्र भारत, स्कूपव्हूप, आज हिंदी डेली, साधना प्राईम न्यूज, अमर उजाला, युएनआययांचा समावेश आहे. ही ‘टॉयलेट’ पत्रकारिता तथाकथित स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि मिळाल्यानंतरही सुरु आहे. 


त्याचा प्रचार व प्रसार आज जोमाने होत आहे. खिसा गरम झाल्याशिवाय बातमीची झाकलेली मूठ सुटत नाही. त्यामुळे आजची पत्रकारिता ही उदात्त हेतूला बाजूला सारुन विकाऊ झाली आहे. कारण मीडियाच ब्राह्मण-बनियांच्या ताब्यात आहे. त्यांच्या रक्तातच विकाऊपणा आहे. 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून मीडिया त्यांची लाचार बनली आहे. याबाबतचा सनसनसाटी खुलासा टीव्ही अँकर प्रसून वाजपेयी यांनी केला आहे. मोदींच्या कालखंडात पत्रकारितेची भाषाच बदलली आहे. संपादकालाही कळत नाही की, कुठून आणि केव्हा फोन आला आहे. संपादकांना थेट पीएमओकडून अथवा माहिती व प्रसारण खात्याकडून फोन येतो. 


धक्कादायक बाब म्हणजे फोन करणारी व्यक्ती आजची बातमी कुठली आहे आणि कुठली लावली पाहिजे. याचे निर्देश दिले जातात. सरकारचा एकप्रकारे दबाव वाढत आहे. ही बातमी आता लावू नका तेथून हटवा असे थेट सांगितले जाते. सूचना करणारा व्यक्ती येणार्‍या माहितीचे स्रोत काय आहेत असे विचारतो. राजकीय पक्षांबरोबर काळाधंदा करणारे बाबा देखील यामध्ये सामील आहेत. या घटनेवरुन असे दिसून येते की, ब्राह्मण-बनिया मीडिया बदमाश आहेच, परंतु ब्राह्मणवाद कसा मजबूत होईल याकडे काटेकोरपणे लक्ष देताना दिसत आहे. 


म्हणूनच ज्या प्रश्‍नांना प्रसिद्धी हवी त्याला?टाळून नको ती प्रकरणे पुढे आणली जातात. एकंदरीत या ब्राह्मण-बनिया मीडियाला सामोरे जायचे असेल तर बहुजनांचा एक सक्षम मीडिया असावा, जेणेकरुन आपले विचार आपल्याच मीडियामध्ये मांडून त्याच्यावर समाधानकारक उत्तरे आपण मिळवू शकतो. त्यासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रमाण मानून ‘मूलनिवासी नायक’ने पाऊल टाकत सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम हाती घेतले आहे. या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ विचारांना खतपाणी घालण्यासाठी सर्व मूलनिवासी बहुजनांनी आपला मीडिया सक्षम करावा, असे आवाहन करीत आहोत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बाबा रामदेवला बीएसएफने दिला झटका
भाजप आमदाराने पत्रकारांना दिलेल्या धमकीवर अमित शहांनी
पाच दिवसात ७५० कोटी कसे काय मोजले?
बेपत्ता ८ मुलांना माओवादी बनविण्याचा पोलिसांचा डाव
कठुआ गँगरेप प्रकरण अधिक प्रमाणात झोपीच्या गोळ्या दिल्य
अमित शहांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार
न्यायालयीन भरती स्थगित करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मो
फेसबुकवर ‘अनोळखी’सोबत मैत्री करणे पडले महागात
विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन
प्लास्टिक बंदीमुळे एका रात्रीत ३ लाख लोकांनी गमावली नोक
अखेर तोडगा निघाला
इंदिरा गांधीं हिटलर, अरूण जेटली यांचा कॉंग्रेसवर निशाणा
बहूजन क्रांती मोर्चा द्वारे आयोजित
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper