×

‘नमामी गंगे’ फेल

Published On :    29 Mar 2018
शेयर करा:


-



२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी ‘नमामी गंगे’ असा उपक्रम राबविला. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. उमा भारती यांच्याकडे हे खाते देण्यात आले होते. परंतु ही नदी स्वच्छ होण्याऐवजी अधिकच गटारगंगा झाली आहे. कारण फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाची मात्रा वाढल्यामुळे गंगा नदीपात्रात स्नान करणे धोक्याचे बनले आहे, असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.


या नदीपत्रात ५ ते १३ टक्के बॅक्टेरिया आहेत. मानवी मलमूत्र सरळ गंगा नदीत सोडले जाते. त्याचा परिणाम बॅक्टेरिया वाढण्यात झाला आहे. नदीपात्रनजिक असलेल्या शहरांनाही त्याचा धोका पोचहला आहे. कानपूर, अलाहबाद, वाराणसी यासारख्या शहरांना फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंत सरकारने ३ हजार ६०० कोटी खर्च केले आहेत.



परंतु एवढा खर्च होऊनही नदीची स्वच्छता होत नसेल तर सरकार काय करत आहे? पहिल्या टप्प्यात अंतर्गत नदीचे पात्र साफ-सफाई करण्याचे ठरविण्यात आले. या नदीपात्रानजीक मलमूत्रांची समस्या संपविण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी स्मशानशेड बनविण्याचे ठरविण्यात आले होते. 


लोकांचा नदीशी संबंध वाढविण्यासाठी ठिकठिकाणी घाट निर्माण करण्यात येणार होते. परंतु या घोषणा हवेत विरल्या आहेत. ठिकठिकाणी नदीचे पाणी खराब झाले आहे. कचर्‍यामुळे नदीला विद्रुपावस्था प्राप्त झाली आहे. ५ वर्षात २ हजार ५०० एमएलडी अतिरिक्त कचरा उचलण्यासाठी प्रकल्प उभारणी करण्यात येणार होती. या नदीपात्राला चांगले स्वरुप देऊन पुन्हा एकदा नवीन झळाळी आणण्याचे प्रयत्न होते. परंतु हे प्रयत्न फसले आहेत. 


अलाहाबादमध्ये लवकरच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. तेथे गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांचा संगम होतो. परंतु कुंभमेळ्यात स्नान करण्याआधी गंगेचे पाणी धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली या नदीपात्रात जो तथाकथित साधुंचा धिंगाणा चालतो त्याला काही सीमा नाही. त्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. सरकारकडे जमा होणारा कर हा सर्वसामान्यांच्या खिशातून जातो. 


त्यामुळे कुठल्याही एखाद्या कुंभमेळ्यासारख्या बेशिस्त कार्यक्रमावर अशा प्रकारचा खर्च करणे म्हणजे लोकांच्या पैशाचा अपव्यय करणे होय. परंतु सरकारच सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देत असल्याने कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या तथाकथित साधुंचे अधिक फावते. गंगा नदीपात्रानजीक असलेल्या कारखान्यातील पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. 


त्यामुळे त्या कारखान्यांचे पाणी थांबविण्याचे आदेशही दिले गेले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय कारवाई केली, असा सवाल उपस्थित होत आहे. देखरेख केंद्राची उभारणी करण्यात येणार होती. देशभरात केवळ गंगा नव्हेच तर अनेक नद्या प्रदूषित झाल्यामुळे अखेरची घटका मोजत आहेत. यमुना, गोदावरी, कावेरी, यासारख्या नद्याही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत.


 कारण नदीपात्रालगत असलेल्या मानवी वस्तीतून मलमूत्र टाकल्या जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याला घाण असा वास येतो. नदी म्हणजे खर्‍या अर्थाने मानवाचे जीवन आहे. परंतु आपण डोळस होत नसल्यामुळे नदीचे वाहणारे निर्मळ पाणी कधी गढूळ होऊन जाते हे कळतच नाही. काही ठिकाणी पाण्यावाचून हाहाकार उडालेला दिसतो. पाणी मिळत नसल्याने जनाावरे कासावीस होतात. 



दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भासते. या पाण्यावर प्रक्रिया करावी आणि धरणे बांधून लोकांना पाणी द्यावे, असे सरकारच्या मनात येतच नाही. जी धरणे आपल्या देशात झाली आहेत ती विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून! मग ते भाकरा नांगल असो अथवा सलतज नदीवरील धरण असो.


 या धरणांमुळे नदीलगतची गावे सूजलाम, सुफलाम झाली आहेत. झालेली धरणे वाखानण्याजोगी आहेत. त्यामुळे केंद्रातील सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती याचा अभ्यास करुन धोरणे आखली तर नमामी गंगे सारखा प्रकल्प फेल होणार नाही. त्यासाठी सरकारची सकारात्मक मानसिकता हवी. तरच सर्वदूर पाणी पोहचून देश हिरवागार होईल. 


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper