×

आरएसएसच्या शेंडीतच रुजलीत दंगलीची बीजे

Published On :    31 Mar 2018
शेयर करा:


-



बिहारमधील हिंसाचाराची स्क्रीप्ट मोहन भागवत यांनीच लिहिल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. यादवजी! आपण बरोबर बोललात. कारण आरएसएसच्या शेंडीतच दंगलीची बीजे रुजलेली आहेत. त्याचे अनेक दाखले देता येतील. दंगली करा आणि सत्तेवर या.

एकंदरीत फोडा आणि झोडा याचे राजकारण आरएसएसला चांगलेच ठाऊक आहे. कारण ब्राह्मण अल्पसंख्य असल्यामुळे ते सत्तेवर येऊ शकत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लीम, मराठा-एससी यामध्ये दंगली भडकविण्याचा नेहमीच आरएसएसचा प्रयत्न राहिला आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. म्हणूनच सत्तेवर येण्यासाठी दंगल हा एकमेव पर्याय आरएसएससमोर उरतो. दंगलीची पार्श्‍वभूमी असल्यामुळे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी आणली होती. बिहारमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. 


६ जिल्हे या हिंसाचारात होरपळले आहेत. तर या आधी पश्‍चिम बंगाल, गुजरात, राजस्थानात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण पाहून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. एसएमएस व्हॉटस्ऍप या सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. वरवर आपल्याला वाटत असले तरी या दंगलीमागे निश्‍चितच आरएसएस आहे. कारण आता निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. वर्षभरात लोकसभा निवडणुका लागतील. त्यामुळे निवडून येण्यासाठी दंगलीची पार्श्‍वभूमी तयार केली जात आहे. 


म्हणूनच ठिकठिकाणी काही राज्यात दंगली होताना दिसत आहेत. आरएसएसचा विचार करता दंगल त्यांच्या नावावर पुजलेली आहे. कारण आरएसएसचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. हिटलरने जसा दहशतवाद मांडला होता तसाच आरएसएसचा भारतामध्ये दहशतवाद सुरु आहे. गांधी हत्याकांडातही नथुराम गोडसे हा प्रमुख आरोपी होता. गोडसे हा आरएसएसशी संबंधित होता. मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यासारखी आरएसएसशी संबंधित असलेली मंडळी सापडली होती. या दंगलीमागेही आरएसएसचा हात होता. 


अजमेर बॉम्बस्फोट खटल्यात भावेश पटेल, सुनील जोशी यांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. तर २००८ मध्ये २६/११ च्या हल्ल्यात आरएसएसची पडद्यामागची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्याचबरोबर गडकरी रंगायतनमधील स्फोट असो किंवा नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एस.कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येमागील सनातनचे लोक असले तरी सनातन ही आरएसएसची दुसरी शाखा आहे. अशाप्रकारे दंगली घडवून दहशत निर्माण करण्याचा आरएसएसचा प्रयत्न असतो.


‘हु किल्ड करकरे’ या पुस्तकात एस.एम.मुश्रीफ यांनी आरएसएसवर ताशेरे ओढले आहेत. हेमंत करकरे यांच्या हत्येमागेही आरएसएसचा कंपू होता, असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. केवळ यावर न थांबता आरएसएस ही दहशतवादी संघटना कशी आहे यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. एवढे स्फोटक पुस्तक लिहूनही मुश्रीफांना जाब विचारण्याचे धाडस आरएसएसला झालेले नाही. यावरुन आरएसएस निश्‍चित दहशतवादी संघटना असल्याचे निष्पन्न होते.


१ जानेवारी २०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे झालेली दंंगल यामागेही आरएसएस सूत्रधार आहे. कारण आरएसएसचा हस्तक मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांनी चिथावणीखोर भाषणे करुन दंगल घडवून आणली. याचे पुरावे सरकारकडे देण्यात आले आहेत. त्यामुळेच न्यायालयाच्या दबावामुळे मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली. दुसरा एक आरोपी भिडे मात्र सहीसलामत तोंडाला फेस येईपर्यंत व लाळ गळेपर्यंत बडबड करत फिरत असतो. जाती-धर्माच्या नावावर दंगल घडवून आणून आपली राजकीय खुंटी कशी बळकट करता येईल यासाठी आरएसएसची लोक काम करताना दिसत आहेत. 


हिंदू धर्माच्या आडून त्यांचे वर्चस्व राखण्यासाठी नको त्या थराला जाणारी ही मंडळी देशाला धोकादायक आहेत. म्हणूनच आरएसएससारख्या आणि त्यांच्या पिलावळींवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१४ मध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा करुन आरएसएसचे चमचे नरेंद्र मोदी देशाच्या प्रधानमंत्री पदावर आरुढ झाले. परंतु तिहेरी तलाक, घरवापसी, देशभक्ती, राष्ट्रवाद, राष्ट्रगान, गोरक्षा, वंदेमातरम, लव्ह जिहाद अशासारखे नको ते मुद्दे उपस्थित करुन येथील मूलनिवासी असलेल्या मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. 


मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या कायद्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानानेच त्यांना मान्यता दिलेली आहे. असे असताना मुस्लिमविरोधी भाष्य करत नेहमीच वातावरण तापविण्याचा आरएसएसचा प्रयत्न राहिला आहे. खरे पाहिले तर या देशात अल्पसंख्य ब्राह्मण आहेत. परंतु मुस्लिमांना अल्पसंख्य ठरवून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आरएसएस करत आहे. 


देशामध्ये वाढलेली बेरोजगारी, घोटाळ्यांमुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीवनावश्यक वस्तूंची महागाई पेट्रोलियम पदार्थाचे वाढते दर त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. जीवनाशी निगडीत असलेल्या विषयावंरील लक्ष विचलीत करण्यासाठी मग डेटा चोरीचा विषय पुढे आणला जातो. दिवसेंदिवस सरकारला येत असलेले अपयश झाकण्यासाठी सरहद्दीवर बनावट चकमकीही केल्या जातात. पाकिस्तान विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जातो.


जेणेकरुन लोकांचे लक्ष त्या विषयाकडे कसे वळेल हे पाहिले जाते. म्हणूनच पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर दंगली केल्याशिवाय पर्याय नाही. हे ओळखून भागवतनामक पिलावळीने दंगलीला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम आखला आहे. कारण रक्तातच त्यांच्या दंगल आहे आणि त्या दंगलीची बीजे आरएसएसच्या शेंडीत रुजली आहेत. त्यामुळे मूलनिवासींनी ही शेंडी ठेवायची की कापून काढायची यावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper