×

हेच का ब्राह्मणांचे मेरिट

Published On :    3 Apr 2018
शेयर करा:


-



जगभरातील २०० विश्‍वविद्यालयांमध्ये भारतातील केवळ २ विश्‍वविद्यालयांना स्थान मिळाले आहे. तसा अहवाल एसोचॅम आणि येस इन्स्टिट्यूटने प्रसारित केला आहे. आयआयटी दिल्ली आणि दिल्ली विश्‍वविद्यालय असे स्थान मिळालेल्या विश्‍वविद्यालयांची नावे आहेत. ब्राह्मण नेहमीच मेरिटच्या गप्पा मारतात. आमच्याकडेच मेरिट आहे असे भासवितात. जगातील सर्वज्ञानी फक्त आम्हीच आहोत असा ब्राह्मणांचा अविर्भाव असतो. 


मेरिटच्या गप्पा मारत असताना भारतातील विश्‍वविद्यालये जगभरातील उत्कृष्ट विश्‍वविद्यालयांमध्ये का गणली जात नाहीत. याची थोडी जरी लाज असेल तर विचार होईल. परंतु तुम्ही कसले विचार करणार? कारण विचारांची आणि तुमची गाठभेटच नाही. गेल्या ५ हजार वर्षापासून ब्राह्मणांचे भारतावर अनियंत्रित वर्चस्व आहे. धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता शैक्षणिक सत्ता, प्रशासनिक सत्ता आणि प्रसार माध्यमांवरील सत्ता! या सर्वांवर अनियंत्रित सत्ता असल्यामुळे अर्थातच ब्राह्मणांकडे बोटे वळतात. आज शिक्षण कुठल्याप्रकारे शिकविले जाते याचा विचार केला तर शिक्षणात दम नाही. घोकंपट्टी करण्यात येऊन मार्कांची खैरात केली जाते. 


त्यामुळे विद्यार्थ्याला वाटते की, आपण हुशार आहोत. मार्क जास्त मिळाले म्हणजे हुशार हा जो काही गैरसमज पसरविलेला गेला आहे तोच चुकीचा आहे. जास्त मार्क मिळवितो तो हुशार आणि कमी मार्क मिळवितो तो ‘ढ’ ही ब्राह्मणांच्या पोतडीतून जी व्याख्या आली आहे, ती सुद्धा सर्वथा चुकीची आहे. राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी १८८२ मध्ये हंटर कमिशनपुढे साक्ष देताना सांगितले की, बहुजनांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले गेले पाहिजे. याची प्रथमतः अंमलबजावणी केली ती करवीर संस्थानचे राजे शाहू महाराजांनी! १९०२ मध्ये त्यांनी सामाजिक व शैक्षणिक आरक्षण लागू केले. त्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केली. शिक्षणाचा मूलभूत अधिकार घटनेने दिला. 


परंतु या अधिकारावरच गदा आणण्याचे काम ब्राह्मणांनी केले. आता तर शिक्षणावर खरा ‘प्रकाश’ टाकण्याऐवजी स्वायत्ततेची धोंेड बहुजनांच्या गळ्यात मारण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्या दिशेला शिक्षण नेले जात आहे याचा अंदाज यायला वेळ लागत नाही. मौर्य कालखंडात भारत जागतिक दर्जाचे ज्ञानकेंद्र होते. विज्ञानाधारित शिक्षण दिले जात होते. परंतु ब्राह्मणांनी विज्ञानाधारित शिक्षणाला फाटा देऊन लोकांच्या माथी भाकडकथा मारल्या.


ज्या भाकडकथा भाकड गाईप्रमाणेच! कधीच दूध न देणार्‍या. विज्ञानावर शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, उज्जैनी, अवंतीसारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे भारतात होती. त्यामुळे परदेशातून या ठिकाणी लोक शिकायला येत होते. हे शिक्षण पाली भाषेतून दिले जात होते. सम्राट अशोकांचा नातू ब्रहद्रथ याची हत्या केल्यानंतर ब्राह्मणांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षण संस्था व विद्यापीठांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. नालंदा या बौद्ध विद्यापीठावरही हल्ला केला. या आक्रमणात नालंदाची रत्नसंगारा, रत्नवेधी आणि रत्नरंजके ही तीन भव्ये ग्रंथालय वाचली होती. रत्नसंगारा हे ग्रंथालय नऊ मजली एवढे भव्य होते. 


त्या ग्रंथालयांना जाळण्यासाठी ब्राह्मणांनी तेथे यज्ञ केला व?त्यातील निखारे या ग्रंथालयांवर फेकले. त्यामुळे भीषण ज्वाळा निर्माण होऊन ही तिन्ही ग्रंथालये जवळ जवळ सहा महिने सतत जळत होती. या घटनेचे वर्णन तिबेट यात्रेकरु धर्मस्वमीन यांनी केले आहे. भारत हे जागतिक ज्ञानकेंद्र असताना त्याला उद्ध्वस्त करण्याचे काम ब्राह्मणांनी केले. म्हणून जगातील आज २०० विश्‍वविद्यालयांमध्ये केवळ भारताची २ विश्‍वविद्यालये आहेत. आज जगभरात शिक्षणावर ६ टक्के खर्च केले जातात. परंतु भारतात मात्र केवळ २.५ टक्के एवढाच शिक्षणावर खर्च केला जातो. दिवसेंदिवस शिक्षणावरील खर्च कमी केला जात आहे. भारतात आज शैक्षणिक सुविधा चांगल्या असत्या. चांगल्या तर्‍हेचे शिक्षण असते तर येथे ब्राह्मणांची मुले शिकली असती. 


परंतु शिक्षणाचा दर्जा घसरला असल्यामुळे ब्राह्मणांची मुले बाहेर शिकायला जातात. याचा अर्थ भारतातील शिक्षण हे अधोगतीला नेणारे आहे. इंग्रजांच्या कालखंडात त्यांनी प्रिव्हिकॉऊन्सिल निर्माण केली होती. या कॉऊन्सिलमध्ये ब्राह्मणांना घ्यावे का असा विचार इंग्रजांच्या डोक्यात आला. परंतु  Brahmnis have not judicial characters  असे इंग्रजांनी म्हटले होेते. इंग्रज जर असे म्हणत असतील तर खरचं ब्राह्मणांकडे न्याय आहे का? याचा अर्थ ब्राह्मण हा बदमाश आणि आत्मप्रौढी मिरवणारा आहे. त्याचबरोबर विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मणांना शिक्षणाबाबत चांगलेच फटकारले आहे.

ब्राह्मणांनी गेल्या पाच हजार वर्षात एकही व्हाल्टेअर निर्माण केलेला नाही. हे उदाहरण आजही ब्राह्मणांना तंतोतंत लागू पडते. कारण शिक्षणावर त्यांचीच सत्ता आहे. मग शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी ब्राह्मणांनी किती प्रयत्न केले? याचे उत्तर नकारात्मक आहे. ब्राह्मणांकडे प्रामाणिकपणा नाहीच परंतु शैक्षणिक मेरिटही नाही. परंतु ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी ब्राह्मणांची परिस्थिती आहे. लोकांना ब्रह्मज्ञान सांगतील परंतु स्वतः मात्र कोरडे पाषाण आहेत. हे त्यांच्या वागण्यावरुन दिसून येत आहे. कलम २८ नुसार शाळेमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास बंदी आहे. 

परंतु ब्राह्मणांनी धार्मिक शिक्षण देण्याची आघाडी उघडली आहे. तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री (मनु)स्मृती इराणी यांनी भागवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ करा, अशी मागणी केली होती.?त्यानंतर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेदांमध्येच विज्ञान असल्याचे सांगितले होते. डॉ.सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत खोटा ठरवत वेदच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले होते. हरियाणात शाळेमध्ये गायत्री मंत्र शिकविण्याचा निर्णय झाला आहे. 

ही सर्व विधाने व वाटचाल पाहता ब्राह्मणांनी विज्ञान आधारित शिक्षण तर सोडाच धार्मिक आणि अंधश्रद्धा विषयक शिक्षणास प्राधान्य दिले आहे. ब्राह्मणांच्या खुळचट डोक्यातून नको ती थेरं जन्माला घातली जात आहेत. त्यामुळेच शैक्षणिक स्तरावर प्रगती होताना दिसत नाही. आज शिक्षणाच्या नावाखाली बट्ट्याबोळ सुरु आहे. खाजगी संस्था चालकांच्या खिशात शैक्षणिक संस्था घालण्यात आल्या आहेत. फी वाढीवर निर्बंध नाहीत. ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत ते सर्व राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लगाम नाही. बहुजन समाजातील मुले आपल्या बुद्धिमत्तेच्या कसोटीवर पुढे जात असल्याने नीट, नेट-सेट सारख्या परीक्षांचा अडथळा निर्माण केला जातो. अशा या ब्राह्मणी शिक्षणामुळे सारे अधोगतीला जात आहे. 

म्हणून शिक्षण संस्था बहुजनांनी आपल्या ताब्यात घ्यायला हव्यात आणि विज्ञानाधारित शिक्षण सुरु करायला हवे. तसेच आपल्याला फक्त शैक्षणिक नव्हे तर सर्वच आघाड्यांवर प्रगती करायची असेल तर बुद्धांनी दिलेल्या अत्त दीप भव! या तत्वानुसार चालायला हवे. असे झाल्यास आपली प्रगती सर्वोच्च शिखरावर असेल. 


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper