×

ब्राह्मणीज क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया

Published On :    4 Apr 2018
शेयर करा:


-



जगातील श्रीमंत असणार्‍या बोर्ड क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाला केंद्र सरकारने प्रसारणाचे ४ हजार ४४२ कोटींचे टेंडर देऊन त्यांच्यावर मेहरनजर दाखविली आहे. खरं म्हणजे हे बोर्ड क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया नसून ब्राह्मणीज क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया आहे. कारण या बोर्डावर बहुतांश ब्राह्मण लोकांचे वर्चस्व आहे. क्रिकेट हा काही देशांमध्ये एवढा प्रचलित आहे की, गल्लीतून शहरापर्यंत क्रिकेट खेळले जाते. भारतात तर काल जन्मलेल्या मुलाच्या हातात बॅट असते. 

यावरुन क्रिकेट किती खोलपर्यंत रुजला आहे याची प्रचिती येते. परंतु हा क्रिकेट केवळ दहा-बारा देशांमध्येच खेळला जातो. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय खेळ होऊ शकत नाही. भारताचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर क्रिकेटला प्राधान्य मिळाले आहे. बोर्ड क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया हे भारताच्या क्रिकेटवर नियंत्रण ठेवणारे मंडळ आहे. या मंडळाकडून आयपीएल आणि?त्याच्याशी संबंधित असलेले खेळ खेळविले जातात. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत असणारे बोर्ड आहे. एका वर्षाला बीसीसीआयचे १ हजार ३६५ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. त्यामुळे हे बोर्ड श्रीमंत असल्यामुळे आयपीएलसारखे खेळ खेळवित क्रिकेटपटूंना विकत घेतले जाते. 

लहान सहान बोली लावली जात नाही. तर या खेळाडूंचा लिलाव करोडोच्या किंमतीत केला जातो. केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील जे देश क्रिकेट खेळतात त्या देशातील क्रिकेटपटूंना विकत घेतले जाते. अशी ही क्रिकेटपटूंना विकत घेण्याची चाल शरद पवार, ललित मोदी यांनी सुरु केली. एखाद्या क्रिकेटपटूने चौकार, षटकार मारल्यास चिअर गर्ल्सच्या नावाखाली ज्या महिला विक्षिप्त हावभाव करतात त्याला काय सीमाच नाही. १९२६ मध्ये या बोर्डाची स्थापना झाली. मध्यंतरी क्रिकेट बोर्ड हे स्वायत्त आहे. त्यामुळे त्याच्यावर भारत सरकारचे नियंत्रण असणार नाही, असे सांगण्यात आले होते. एवढा अगोचरपणा बोर्डाने केला होता. कॅपवर इंडियाचा लोगो चालविला होता. परंतु बोर्डाचा हिशोब मागितल्यानंतर बोर्डाने हातवर करत स्वायत्त असल्याचे सांगितले होते. असा हा बोर्डाचा दुतोंडीपणा आहे. माहिती प्रसारण, आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट, आयपील, चॅम्पीयन लिग, २०२०, यासारख्या माध्यमातून बीसीआयकडे करोडो रुपये जमा होतात. बीसीसीआयच्या माध्यमातून ९० टक्के रक्कम क्रिकेटच्या विकासासाठी वापरली जाते. नवनवीन मैदाने बनविणे त्याची देखरेख ठेवणे अशी कामे केली जातात.

बीसीसीआय हे ब्राह्मणीज क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया आहे. कारण?ज्या बोर्डावर पूर्णतः ब्राह्मणांचे वर्चस्व आहे. कुठल्या खेळाडूला घ्यायचे, कुठल्या खेळाडुला?टाळायचे हे निवड समिती ठरवत असते. आज आपण भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंची नावे पाहिली तर लक्षात येते की, या बोर्डाला ब्राह्मणांनी कसे वेढले आहे. खेळाडुंची नावे पाहिली तर एखाद दुसरा अपवाद वगळल्यास बहुतांश ब्राह्मण आहेत. त्यामुळे आपल्या मूलनिवासी बहुजन समाजाला येथपर्यंत पोहचू दिले जात नाही. 

कारण निवड समिती त्यांची असते. आज रणजी ट्रॉफी, ऑस्ट्रेलियामध्ये होणारी बोर्डर-गावस्कर ट्रॉफी. याचबरोबर नानातर्‍हेचे क्रिकेट भारतात खेळले जाते. मग ते दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत क्रिकेटचा बोलबाला आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी शारदाश्रमपासून एकत्र होती. त्यांनी शालेय क्रिकेट सोबत खेळले. दोघेही सोबतच भारतीय संघात आले. मात्र सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळीचे स्ट्रोक्स एवढे पॉवरफूल होते की, त्याच्यापुढे सचिन फिका होता. परंतु कांबळी हा एससीमधला असल्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. 

काही सामने तो खेळला परंतु त्यानंतर त्याला जे बाहेर फेकले गेली ते कायमचे! अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपली मुले क्रिकेट खेळतात. त्यासाठी काही पालक क्रिकेट खेळण्यासाठी कोचिंगलाही पाठवतात. त्यामुळे आपल्या मुलाला पुढे स्थैर्य मिळेल, असे पाहिले जाते. परंतु स्थैर्य मिळण्याचे सोडाच त्याची राष्ट्रीय संघात निवडही केली जात नाही. आजवर काही अपवाद वगळल्यास क्रिकेटही ब्राह्मणांच्या ताब्यात गेले आहे. आपण हे कधी समजून घेणार आहोत. 

कारण आपल्याला संधी मिळाली तरी जेमतेम रणजीपर्यंत पोहोचू शकतो. ते पण वशीला असल्यास नाही तर पूर्ण करीयर बरबाद होते. त्यामुळे मूलनिवासी बहुजन मुलांनी क्रिकेटच्या नादाला न लागता स्वतःला अभ्यासामध्ये गाडून घ्या. तर भवितव्य आपलेच असेल. कारण पॉपुलर वे निवडण्यापेक्षा प्रॉपर वे निवडायला हवा. आज जर बीसीसीआयच्या अध्यक्षपदांवर नजर टाकली तर शरद पवार हा मराठा गडी वगळता कुणीही अध्यक्ष झालेला नाही. 

त्यामुळे केवळ बहुजन मुलांनी क्रिकेट-क्रिकेट याची भुई थोपटण्यापेक्षा आपणच आपला मार्ग शोधायला हवा. कारण प्रत्येक क्रिडा प्रकरणात ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. जोपर्यंत आपल्याला हा ब्राह्मणीकावा समजून येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये अधिकच गुरफटत जातो. हे तुम्हाला गुरफटून घ्यायचे आहे की स्वतंत्र जीवन जगायचं आहे. याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. 


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भोजन पुरविणार्‍या पुरवठादारांचे पैसे देऊ नका
धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
एकत्र निवडणुकांसाठी भाजपची आक्रमक भूमिका
सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय
...तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल
२०१९ मध्ये ईव्हीएम मशीन फोडणारच
देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये
गोवारी समाज आदिवासीच
प्रसूती रजेच्या कायद्यामुळे महिलांच्या नोकर्‍यांत घट
बिहारच्या आणखी १४ बालगृहांत लैंगिक शोषण
अपहरणांचे सत्र सुरूच
संविधान जाळल्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद
केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या सुमारे ८ हजार ज
धनगर आरक्षणासाठी परभणीत तरुणाची आत्महत्या
नालासोपार्‍याचे कर्नाटक कनेक्शन
आरक्षणाच्या मागणीसाठी नगरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोक
सात राज्यांत पूरस्थिती, महाराष्ट्रात १३९ जणांचा मृत्यू
संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच
गाडीला उशीर झाला तरच वेग वाढवा
कवडीमोल भावात जमिनी लाटणार्‍या रिलायन्स विरोधात एल्गार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper