×

लिंगायत धर्माला विरोध करणारे दीड ‘शहा’णे

Published On :    5 Apr 2018
शेयर करा:


-लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात येणार नाही. एकप्रकारे लिंगायत धर्माला विरोध करुन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गरळ ओकली आहेत. शहांचे दुखणे आहे की, लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देणे म्हणजे ब्राह्मणी धर्माचे विभाजन! परंतु लिंगायत धर्म हा कधीच हिंदू धर्माचा भाग नव्हता तो तर स्वतंत्र धर्म आहे. हे अमित शहांसारख्या दीड ‘शहा’ण्यांनी लक्षात घ्यायला हवे. महात्मा बसवण्णा यांनी १२ व्या शतकामध्ये या धर्माची स्थापना केली. परंतु महात्मा बसवण्णांच्या जन्माबाबत ब्राह्मणांनी महात्मा बसवण्णा शैव ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्याचे प्रचारात आणले. 

त्यामुळे मूलनिवासी लिंगायतांचे प्रेरणास्थानच मोडीत निघाले. लिंगायत ही जात नाही तर धर्म आहे, जीवनपद्धती आहे, विचारधारा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. लिंगायत धर्माची स्थापना करुन बसवण्णा यांनी ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकली. भटाळलेली शैव धर्मसंस्कृती नाकारुन नवनूतन असा लिंगायत धर्म स्थापन केला. नागवंशीय बहुजन समाजातील सर्वांनी लोकसंसदेमध्ये एकत्रित बसून चर्चा संवादाच्या माध्यमातून अनुभवी वचन साहित्याची निर्मिती केली. महात्मा बसवण्णा स्थापित अनुभव मंटप लोकसंसदच होती. ब्राह्मण कधीही अनुभव मंटपासारखी लोकसंसद स्थापन करणार नाही. कारण अशा लोकसंसदेमुळे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व धोक्यात येते. स्वतः बसवण्णाने एका वचनात माची देवीला धोबी, कक्कयाला ढोर, चन्नयाला मांग आणि मला स्वतःला ब्राह्मण म्हणू नका. कारण ही विकृत विशषणे ब्राह्मणांच्या शेंडीतून तयार झाली आहेत. विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘भारतातील जातीप्रथा त्यांची संरचना, उत्पत्ती आणि विकास’ या ऐतिहासिक प्रबंधात लिहितात, भारतात एकूण अस्तित्वात असलेल्या १२५० ब्राह्मण जातींमध्ये शैव ब्राह्मण ही जात शोधूनही सापडत नाही.  महात्मा बसवण्णा शैव ब्राह्मण असल्याचे दाखवून लिंगायत धर्माचे ब्राह्मणीकरण करण्याचा हा प्रकार आहे. १२ व्या शतकात लिंगायत धर्माने ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात विरोध केला. हे भविष्यात मूलनिवासी नागवंशीय लिंगायत लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून महात्मा बसवण्णांना ब्राह्मण भासवून मूलनिवासींचा विद्रोही शमविला. जेव्हा जेव्हा असूर संघटीत होतात तेव्हा तेव्हा इंद्राचे आसन हालते. या पुराणातील विधानाचा ध्वनित अर्थ असा निघतो की, जेव्हा मूलनिवासी बहुजन समाज संघटीत होतो, तेव्हा वर्णव्यवस्था धोक्यात येते. वर्णव्यवस्था धोक्यात आल्यास ब्राह्मणांची मोठेपणाची मक्तेदारी संपुष्टात येते. महात्मा बसवण्णांचे आंदोलनाचे नाते त्यांच्या वचनातून कळते. ते एका वचनात म्हणतात, ‘‘कृषि कर्म हेचि कायम पिकवितो धरणी| तनु-मन-श्रमवुनी धन धान्य आणुनीदासोह करीत्या परम सद्भक्तांचे | दर्शन घडवा तयाच्या चरणांचे शुद्ध तयाचे तनु-मन| अन् बोल तयाचे पावन करणीही शुद्ध हेचि कारण’’या वचनात महात्मा बसवण्णा कृषि संस्कृती-श्रमण संस्कृतीचा जयघोष करतात. कोठेही त्यांच्या ब्राह्मण संस्कृतीचा गर्वाभिमान दिसून येत नाही. जैसी वाणी तैसी करणी हे मूलनिवासी बहुजन समाजाच्या विचारधारेचे वैशिष्ट्ये आहे. बुद्धिप्रामाण्यवाद आणि शब्दप्रामाण्यवाद हे दोन विचारप्रवाह आहेत. बुद्धिप्रमाण्यवाद हा मूलनिवासी बळीवंशाच्या संघर्षाचा विचारप्रवाह आहे.


तर शब्दप्रमाण्यवाद हा विदेशी युरेशीयन ब्राह्मणांचा विचारप्रवाह आहे. प्रयत्नवाद ही बुद्धिप्रामाण्यवादाची निर्मिती आहे. तर दैववाद हा शब्दप्रामाण्यवादाची निर्मिती आहे. म्हणून मूलनिवासी महापुरुषांनी नेहमीच ब्राह्मणी व्यवस्थेला धारेवर धरले. परंतु ही व्यवस्था बदलून टाकण्याचे काम पुश्यमित्र शुंग नामक युरेशियन ब्राह्मणाने केले ती व्यवस्था आज पूर्ण मजबूत झाली आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा द्यावा व?त्यांची स्वतंत्र ओळख आहे यासाठी बामसेफ आणि कोरणेवश्‍वर स्वामी यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. म्हणूनच लिंगायत बांधव मोठ्या प्रमाणात जागृत होऊन त्यांच्यामध्ये बसवण्णांच्या विचारांचा प्रवाह सळसळताना दिसत आहे. 


म्हणूनच लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्याचे सुतोवाच कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकारने करताच भाजपाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यातच राक्षसी प्रवृत्तीचे लोक हिंदू धर्माचे विभाजन करत आहेत, अशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी बतावणी केली. मुळात या देशातील कुठल्याही जातीतील लोक हिंदू नाहीत. मग असे असताना त्यांच्यावर जबरदस्तीने हिंदुत्व लादून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा ब्राह्मणांचा डाव असतो. हिंदू या नावाखाली अल्पसंख्य असलेले लोक बहुपसंख्य होतात म्हणूनच अल्पसंख्य असणारा ब्राह्मण बहुसंख्य होतो. त्यामुळेच शेंडीतून हिंदुत्वाची पिचकारी सोडली जाते. आम्ही हिंदू नसताना आमच्यावर का हिंदुत्व लादले जात आहे? आम्हाला आमचा विचार करु द्या ना! तुम्ही आमच्या भवितव्याचा विचार करणारे कोण? असा सवाल भागवतांना विचारावासा वाटतो. या देशात मुस्लीम, ख्रिश्‍चन, जैन, बौद्ध असे विविध धर्म आहेत. 


मग लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जाचा धर्म?म्हणून मान्यता देण्यास का विरोध केला जातो. याचा अर्थ लिंगायत धर्मालाही तो हिंदूचाच भाग असल्याचे भासविले जात आहे. परंतु आता जाणीव जागृती होत असल्याने आणि लिंगायत धर्माने आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याने तुमच्या स्वातंत्र्य दर्जाची मान्यता मिळो अथवा न मिळो त्याला काही फरक पडत नाही. म्हणून अमित शहांसारख्या दीड ‘शहा’ण्यांनी आपली बोलती बंद करावी.  बहुजन समाज जागा होतच आहे. एकदा का जागा झाला त्या दिवशी तुम्हाला पळताभुई थोडी होईल. एवढे मात्र लक्षात ठेवा. 


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सागरी किनारा मार्गामुळे तीन हजार मच्छीमारांवर संकट
संसदेत यंदा २७ मुस्लिम खासदार
राजकीय पक्षांच्या नावात धार्मिक जातीवाचक शब्द नको
ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवड
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
भारत बंदचे आंदोलन पेटले
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper