×

‘परिवर्तन यात्रे’चा एल्गार

Published On :    7 Apr 2018
शेयर करा:


-



बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २४ एप्रिलपासून परिवर्तन यात्रेचा एल्गार पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत, ३६७ तालुक्यात ही परिवर्तन यात्रा जाणार आहे. 


या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन कानाकोपरा ढवळून काढण्यात येणार आहे. त्यामुळे एक वेगळा फुले-शाहू-आंबेडकरी विचारप्रवाहाची वीण अधिक घट्ट होणार आहे. परिवर्तन यात्रेचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आणि जनआंदोलनाचे प्रवर्तक वामन मेश्राम करणार आहेत. 


१ जानेवारी १८१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे झालेल्या लढाईत २८ हजार पेशवा ब्राह्मणांचा पराभव करुन ५०० मूलनिवासी नागवंशीय शुरविरांनी विजय प्राप्त केला होता. 


पेशवाईला गाडून पुन्हा एकदा आपल्या महापुरुषांचा तेजस्वी इतिहास जागा केला होता. हा तेजस्वी आणि क्रांतीकारी इतिहास पोहोचविण्याचे काम देशभरात भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे देशातील अनेक जाती समूह जागृत झाले. 


जागृती झाल्यामुळेच ब्राह्मणांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी भीमा-कोरेगावच्या द्विशाताब्दी कार्यक्रमात दंगल घडवून आणली. खरा इतिहास मूलनिवासी बहुजनांना कळू नये?म्हणून ब्राह्मणांचे हे कारस्थान होेते. आजही पेशवाई डोके वर काढून आहे. 


याची अनेक उदाहरणे देता येतील. नुकताच २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात दिलेला निकाल हा पेशवाई बळकट करण्याची पायरी आहे. त्यामुळे या पेशवाईचे षड्यंत्र उघडे करायला हवे. 


यासाठीच या परिवर्तन यात्रेचा उद्देश आहे. मूलनिवासी बहुजन समाजातील अनु.जाती, जमाती, भटके विमुक्त, मराठा, ओबीसी, बलुतेदार, एसबीसी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध, लिंगायत, शिख, जैन, धर्मपरिवर्तीत या सर्वांच्या हक्क व अधिकारावर गदा आणण्यात आलेली आहे. 


परिणामी या देशाचा मूलनिवासी बहुजन बांधव मालक असतानाही त्याला नोकर असलेल्या युरेशियन ब्राह्मणाकडे हात पसरावे लागत आहेत. कारण या देशाची संपूर्ण व्यवस्था आज ब्राह्मणांनी ताब्यात घेतली आहे. 


न्यायपालिका, कार्यपालिका, संसद आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांवर आज पेशवा ब्राह्मणांचे निरंकुश वर्चस्व आहे. त्यामुळे कमांडर असलेला बहुजन बांधव डिमांडर झाला आहे आणि जो खर्‍या अर्थाने डिमांडर असायला हवा होता तो कमांडर झाला आहे. 


सरहद्दीवर दरदिवशी कुणाला तरी शहीद व्हावे लागते. या देशाच्या सुरक्षेसाठी आमचाच बहुजन बांधव शहीद होतो. ऑर्डर सोडणारे ब्राह्मण एससीमध्ये बसलेले असतात. परंतु सरहद्दीवर लढणारा हा फक्त ऑर्डर फॉलो करणारा असतो. 


सरहद्दीवर मरायला बहुजन आणि चरायला ब्राह्मण अशी परिस्थिती आज या व्यवस्थेने आणून ठेवलेली आहे. म्हणून ही ब्राह्मणी व्यवस्था कायम उखडून फेकण्यासाठी, सन्मानाने जीवन जगण्यासाठी व माणुसकीची आणि समतेची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. 


या परिवर्तन यात्रेत आपल्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. त्याचबरोबर विविध मागण्याही केल्या जाणार आहेत. त्यातील ओबीसींची व भटक्या विमुक्तांची जातीनिहाय जनगणना करावी, भीमा-कोरेगाव दंगलीचा सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे या दोघांना फाशी झाली पाहिजे, ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा यासाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करावी. 


ब.मो.पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण काढून घ्यावा, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, मुस्लीम समुदायाला सच्चर कमिशनच्या शिफरशी लागू कराव्यात. यासारख्या प्रमुख मागण्या परिवर्तन यात्रेत करण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, बाजारभावाची हमी, वाढती बेरोजगारी, कंत्राटी कामगार पद्धती, खाजगीकरण, नोकर कपातीचा निर्णय, स्पर्धा परीक्षामधील गैरप्रकार यासारख्या ज्वलंत प्रश्‍नांवर या परिवर्तन यात्रेत वाचा फोडण्यात येणार आहे. तसेच ईव्हीएममध्ये घोटाळा करुन ब्राह्मणांनी देशाची सत्ता काबीज केली आहे. ईव्हीएम म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे. 


या मनुस्मृतीच्या माध्यमातून गुलामगिरी आणखी मजबूत करण्याचा ब्राह्मणी कावा आहे. या ब्राह्मणी काव्याचा व ईव्हीएमचा पर्दाफाशही केला जाणार आहे. त्यामुळे ही परिवर्तन यात्रा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक नवी दिशा देणारी ठरेल. म्हणून या परिवर्तन यात्रेत सर्व मूलनिवासी बांधवांनी तन-मन-धनाने सामील होऊन इतिहासाचे साक्षीदार व्हावे, असे आम्ही आवाहन करत आहोत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकत नाही
महाभियोगाच्या वादाची ठिणगी पेटणार
आत्महत्या नसून हत्याच, सकट कुटुंबीयांचा आरोप
पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढीस
१५ लाखांचा प्रश्‍न माहिती अधिकारात येत नाही
महाराष्ट्रात आजपासून गुंजणार परिवर्तन यात्रेचा आवाज
तर माझा कॉंग्रेसला पाठिंबा-एच. डी. देवेगौडा
भाजपने बनविली बलात्कार रक्षकांची टोळी
जवाहरलाल नेहरु धोकेबाज
हरियाणात धार्मिक जागेवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची राजकारणात उडी
उन्नाव बलात्कार करणार्‍या आमदाराच्या समर्थनार्थ रॅली
राजस्थान लोकसेवा आयोगाचे महाभारत सुरु
मुलींवर टॉर्च मारून खोलीत बोलवायचा असा(ह)राम
सिलिंडर मिळाले पण गॅससाठी पैसे नाहीत
पॉर्न बघताना पकडलेल्या तीन आमदारांवर भाजपची मेहरबानी
असिमानंदने दिली नव्हती आपली साक्ष
हत्या करणार्‍या आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा पुढे सरसा
महिलांना संघटीत क्षेत्रात आणणे भारताची प्राथमिकता असाय
संघाची सदस्यता कुणालाही सांप्रदायिक बनवत नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper