×

पाखंडी व सैतान गांधीचे नाणे खोटे

Published On :    8 Apr 2018
शेयर करा:


-



कॅनडाच्या ओटावा शहरातील कार्लटन विद्यापीठात मोहनदास करमचंद गांधीचा बसविण्यात आलेला पुतळा काढून टाकावा यासाठी आफ्रिकन स्टुडंट असोशिएशनकडून मागणी केली जात आहे. गांधी काळ्या लोकांप्रती वंशवादी व वर्णवादी होते. ते काळ्या लोकांना नास्तिक व दुष्ट म्हणत होते. 


दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीचा वंशवाद स्पष्टपणे दिसून आला होता, असे असोशिएशनचे अध्यक्ष केनेथ अलीऊ यांचे म्हणणे आहे. वंशवाद व वर्णवाद निर्माण करणारा गांधीचा पुतळा हवा कशाला म्हणूनच कॅनडात राडा सुरु झाला आहे. 


गांधी म्हणजे पाखंडी आणि पाखंडी म्हणजे गांधी हे समीकरण एकमेकांशी पुरक आहे. कारण भारतामध्ये गांधीला महात्मा म्हटले जात असले तरी गांधी हा कधीच महात्मा नव्हता. याबाबत विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीच्या पाखंडी राजकारणाचा खरपूस समाचार घेतला आहे. डॉ.आंबेडकर हयातभर मूलनिवासी बहुजनांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन चालवत होते. 


ज्याला गांधीने जिवतोडून विरोध केला. त्या अगोदर गांधीने सत्यशोधक चळवळ समाप्त केली. तर डॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला दाबण्यासाठी पुणे कराराचा षड्यंत्रकारी वापर केला. डॉ.आंबेडकरांनी संपूर्ण हयातभर पुणे कराराचा धिक्कार केला. जगाच्या नजरेत गांधी खलनायक?म्हणूनच प्रसिद्ध आहे. गांधीमध्ये माणसाचे गुण कमी आणि सैतानाचे गुण अधिक होते. 


फ्रिडम ऍट मिडनाईट या जागतिक ग्रंथात गांधीचे चरित्र अगदी नेमक्या भाषेत वर्णन केले आहे. ते म्हणजे गांधीजीला एक दगाबाज व पाखंडी राजकारणी एक ढोंगी मसीहा म्हणतात. ज्यांचे अंहिसात्मक आंदोलनाचा शेवट हा प्रत्येक वेळी हिंसेतच होतो आणि ज्यांचे आमरण उपोषण प्रत्येक वेळी मृत्यूच्या दारावर पोहचून तूटत असते. फारच घाणेरड्या वृत्तीचा जिद्दी धमकी देणारा दुहेरी बोलणारा ज्यांच्यात खर्‍या संतवृत्तीचा अंशदेखील नव्हता. 


बीबीसी वर्ल्ड लंडन ब्रॉडकास्टींगला दिलेल्या मुलाखतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीचा खरा चेहरा उघड केला आहे. पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्‍न विचारला की, गांधीजीबद्दल तुमचे मत काय आहे? त्यावर बाबासाहेब म्हणाले, भारताच्या इतिहासात गांधीसारखा पाखंडी मनुष्य आजतागायत झाला नाही. गांधी या देशातील लोकांच्या स्मरणातून नाहीसे झाले आहेत. 


त्यांनी महान कार्य केले असे तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्‍नावर बाबासाहेब उसळून म्हणाले, मुळीच नाही. खरे तर नेहमी कपटाने वागत. इंग्रजी भाषेत ते हरीजन आणि?त्यापूर्वी यंग इंडिया असे दोन वृत्तपत्र चालवित असत. जर तुम्ही दोन्ही वृत्तपत्र वाचले तर तुम्हाला असे आढळेल की, गांधी लोकांना फसवत होते. इंग्रजीवृत्तपत्रामध्ये ते जातीप्रथा आणि अस्पृश्यतेचे विरोधक व लोकशाहीवादी असल्याचा आव आणत असत. परंतु तुम्ही त्यांचे गुजराती वृत्तपत्र वाचले तर ते फार सनातनी व्यक्ती होते. 


जातीप्रथा, वर्णाश्रम धर्म, सनातनी धार्मिक कर्मकांड याचे ते समर्थक होते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात गांधीला कधीच महात्मा म्हटले नाही. ते महात्मा म्हणण्याच्या लायक देखील नाहीत. अशा शब्दात विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीच्या ‘कु’विचारांची पोलखोल केली होती. गांधीने हरिजन हा शब्द अस्पृश्यांना का दिला? याचे आपण चिकित्सक वृत्तीने विश्‍लेषण केले तर दिसते की, गांधीस बगळ्याच्या रुपाने आपण पाहू शकतो. 


गांधी डोळे मिटून साधूपणाचे ढोंग करीत पण बंद डोळ्यासोबतच डोक्यात षड्यंत्राचा महापूर येत असे. आज हरिजन शब्दावर बंदी आहे. जर हा शब्द कोणी उच्चारला तर ऍट्रॉसिटीची केस होईल. हरिजन हा शब्द गैरसंविधानिक आहे. हरिजन म्हणजे हरीचा जन्म असा त्याचा अर्थ होत नाही. वास्तविक त्यास इंग्रजी भाषेत पर्यायी शब्द बास्टर्ड असा आहे. 


याचा अर्थ हरामी की अवलाद असा होतो. देवदासीपासून होणार्‍या अनौरस संततीस हरिजन संबोधत. ज्याच्या बापाचा पत्ता नाही ते हरिजन. गांधी अशा कुत्सित आणि षड्यंत्रकारी शब्दाचा वापर करीत. गांधी टाटा बिरला यांच्या पैशावर ऐशआराम करीत. कधी भंगी वस्तीत जाऊन त्या ठिकाणी असलेल्या एखाद्या झोपडीत वास्तव्य करुन पंचतारांकित सुविधा तेथे आणून उपभोग घेत. 


आपण अस्पृश्यांचे उद्धारक आहोत असे ते लोकांना दाखवत असत. गांधीला गरीब दाखविण्यासाठी फार मोठी रक्कम मोजावी लागे. रेल्वेच्या जनरल बोगीत गांधी प्रवास करी तर ती पूर्ण बोगीच गांधीसाठी विकत घ्यावी लागे. गांधी महागडा ऐय्याशी होते, असे सरोजिनी नायडू यांनी म्हटले आहे. हे सर्व संदर्भ प्रा.विलास खरात लिखित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध गांधी आणि गांधीजी एक दगाबाज व पाखंडी राजकारणी या पुस्तकातून घेण्यात आले आहेत. 


गांधीसारख्या पाखंडी व्यक्तीने या देशातील बहुजनांना फार लुटले आणि मूलनिवासी बांधवांवर गुलामगिरीची पुटे अधिक मजबूत कशी होतील या दृष्टीने गांधीने प्रयत्न केले. म्हणूनच १५ टक्के वगळता ८.५ टक्के मूलनिवासी बहुजन समाजाचा आदर्श गांधीसारखी व्यक्ती असू शकत नाही. कॅनडा ओटावामध्ये कार्लटन विद्यापीठात गांधीचा पुतळा हटविण्यासंदर्भात होत असलेले आंदोलन निश्‍चितच जगाला दिशा देणारे आहे. 


वंशवादाचा व वर्णवादाचा समर्थक असलेल्या गांधीचा पुतळा कशाला हवा? म्हणून हे आंदोलन होत असल्याने फार मोठे या विषयाला जागतिक संदर्भ आहेत. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीला रेल्वेतून हाकलून दिले. त्याला कारण वंशवादाचे केलेले समर्थन! परंतु हा विषय भारतातील ब्राह्मणीव्यवस्थेने पुढे आणला नाही. कारण गांधी ब्राह्मणी व्यवस्था आणखी मजबूत करत होता. 


म्हणूनच येथील ब्राह्मणांनी?त्याला महात्मा ही पदवी दिली. मात्र गरज संपल्यानंतर याच महात्म्याचा काटा काढायलाही ब्राह्मणांनी मागे पुढे पाहिले नाही. नथुराम गोडसे या आरएसएसच्या बगलबच्च्याला पुढे करुन गांधीला संपविण्यात आले. गांधीचे विचार कधीच महान नव्हते. म्हणून ज्या दिवशी गांधीला संपविण्यात आले त्याचदिवशी त्याच्या विचारांनाही कायमची मूठमाती मिळाली. म्हणूनच आज कॅनडात होत असलेले आंदोलन गांधीचे कुत्सित विचार कायमचे संपविण्याच्या दृष्टीने टाकलेले एक आश्‍वासक पाऊल आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बाबा रामदेवला बीएसएफने दिला झटका
भाजप आमदाराने पत्रकारांना दिलेल्या धमकीवर अमित शहांनी
पाच दिवसात ७५० कोटी कसे काय मोजले?
बेपत्ता ८ मुलांना माओवादी बनविण्याचा पोलिसांचा डाव
कठुआ गँगरेप प्रकरण अधिक प्रमाणात झोपीच्या गोळ्या दिल्य
अमित शहांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार
न्यायालयीन भरती स्थगित करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मो
फेसबुकवर ‘अनोळखी’सोबत मैत्री करणे पडले महागात
विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन
प्लास्टिक बंदीमुळे एका रात्रीत ३ लाख लोकांनी गमावली नोक
अखेर तोडगा निघाला
इंदिरा गांधीं हिटलर, अरूण जेटली यांचा कॉंग्रेसवर निशाणा
बहूजन क्रांती मोर्चा द्वारे आयोजित
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper