×

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना!

Published On :    9 Apr 2018
शेयर करा:


-



२०१४ पासून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप सत्तेत असले तरी त्यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. कुठल्या ना कुठल्या कारणावरुन एकमेकांवर कुरघोडी करण्यात हे दोन्ही पक्ष मागे पुढे पाहत नाही. शिवसेनेकडून वारंवार भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे सांगितले जाते. परंतु गुळाला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे शिवसेना सत्तेला चिकटून आहे. त्यामुळे शिवसेना ना भाजपला सोडणार आणि भाजपही शिवसेनेला सोडणार नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले असले तरी तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना! अशी अवस्था या दोन्ही पक्षांची झाली आहे. 

गत विधानसभा निवडणुकीत भाजपला १२४ आणि शिवसेनेला ६४ जागा मिळाल्या. भाजपला बहुमताला १२ जागा कमी पडल्या. त्यावेळी स्वतंत्र निवडणूक लढविली असल्यामुळे सुरुवातीला शिवसेनेने भाजपला पाठींबा दिला नाही. परंतु अविश्‍वास ठरावाला व विनाशर्ती पाठींबा देत राष्ट्रवादीने भाजपला सहकार्य केले. त्यामुळे भाजप सरकारची नौका किनार्‍याला लागली. दरम्यानच्या कालखंडात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तसे म्हटले तर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे नैसर्गिक मित्र नाहीत. परंतु राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर भाजपने सत्तेच्या चाव्या हाती व सुरुवातीला अमूक अमूक खात्याची मंत्रीपदे हवीत या कारणावरुन शिवसेना रुसली. त्यांनी सत्तेत सहभाग घेतला नाही. परंतु शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्यांनी काही फुटकळ मंत्रीपदे शिवसेनेच्या माथी मारुन त्यांचा राजकीय सहभाग करुन घेतला. एकदाचा शिवसेनेचा गंगेत घोडा न्हाहला. आता सत्तेच्या सारीपाटात दोन्ही पक्ष चांगले काम करतील असे वाटले होते. परंतु अंतर्गत धुसफूस कायम राहली. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री व आमदार मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार करायला लागले. आमची कामे केली जात नाहीत. आम्हाला प्रत्येक वेळी डावलले जाते. भाजप स्वतःच्या पालकमंत्र्यालाच हवा तेवढा निधी दिला जातो. त्यामुळे असंतोष वाढीस लागला होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकदम खालच्या स्तरावर जात एकमेकांचे वाभाडे काढले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचताना म्हणाले होते की, वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजीतो दात जात ही आमची अशा शब्दात शिवसेनेची अवहेलना केली होती. तेव्हापासून शिवसेना भाजपमध्ये विस्तव जात नव्हता. त्यातच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शत-प्रतिशत भाजपचा नारा देऊन शिवसेनेच्या बुडाखाली आग लावली. त्यामुळे शिवसेना सावध झाली. कारण केवळ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाच नव्हे तर देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपने सुरु केला. हे बालंट आपल्या अंगावर येईल या भीतीपोटी शिवसेनेने भाजपला असहकार्य केले. परिणामी दोन्ही पक्षांमध्ये वाद वितंड होऊ लागले. विरोधी असलेले कॉंग्रेस-भाजपापेक्षा शिवसेना आपल्याच मित्रपक्षाच्या विरोधात बोलताना दिसली. त्यामुळे शिवसेना सत्तेत आहे की विरोधात असा प्रश्‍न राज्यातील लोकांना पडला. प्रत्येक वेळी शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याची भाजपला धमकी दिली जाते. परंतु या धमकीला मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी कधीच भीक घातली नाही. म्हणून भाजप आपल्याला हिंग लावून विचारत नाही. ही धारणा उद्धव ठाकरेंच्या मनात सतत घोळत राहिली. परंतु स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल अशा प्रकारची घोषणा करुन पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. 

नुकत्याच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला भाजपचा स्थापना दिवस घेण्यात आला. याला राज्यभरातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वमंत्री यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी लोक एकत्र आले आहेत. परंतु ही लोक म्हणजे कोल्हे, कुत्री, मांजर, मुंगूस यांची युती आहे. त्यामुळे कुणीही कितीही एकत्र आले तरी मोदी यांचा कुणी पराभव करु शकत नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर शिवसेनेने यावे. एकंदरीत युती करुन निवडणुका लढवूया, असे स्वतः भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी लागलीच प्रतिक्रिया देत आता युती करण्याची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे युती शक्य नाही. शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढविणार, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सेनेच्या धनुष्यबाणामुळे भाजपच्या कमळाच्या ठिकर्‍या उडाल्या. शिवसेनेला स्वबळाची उबळ आली आहे. भाजपला मित्रपक्ष सोडून जात आहेत. त्यातच केंद्र व भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तापत आहे. लोकांमध्ये या सरकारविषयी विश्‍वास नाही. हे भाजपने ओळखल्याने त्यांनी आपला सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून मदतीचा हात मागितला. परंतु शिवसेनेने हा हात झिडकारत धनुष्य बाण कमळावर सोडला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढतील असे संकेत मिळत आहेत. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते. शेवटच्या क्षणालाही दुश्मन असलेला मित्र व मित्र असलेला दुश्मन अशी परिस्थिती राजकीय पटलावर नेहमीच निर्माण होते. सत्तेवर आल्यापासून एकमेकांवर फक्त कुरघोडी करण्यातच या दोन्ही पक्षांनी वेळ मारुन नेली आहे. मतदारांना दिलेली आश्‍वासने फोल ठरली आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अजूनही कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना झालेला नाही. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातो. कामाच्या बाबतीत या दोन्ही पक्षांची बोंब आहे. आपले आर्थिक व्यवहार कसे सुरळीत होतील एवढेच धोरण आखले जाते. म्हणून दिवसेंदिवस महाराष्ट्राचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागते. महाराष्ट्रावर कित्येक कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे कर्जबाजारी केलेल्या या लोकांकडून काय अपेक्षा करायची? सत्ता ही सर्व समस्यांची चावी असल्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर शेवटच्या स्तराला जाऊन वाभाडे काढत असले तरी सत्ता जाऊ नये?म्हणून दोन्ही पक्षांकडून सरकार टीकविण्याचे प्रयत्न सुरु असतात हे लपून राहिलेले नाही. म्हणून कितीही नाक फुरफरत शिवसेनेने भाजपवर दुगाण्या झाडल्या आणि भाजपने नाक खुपसत शिवसेनेला हिणवले तरी तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना! अशी अवस्था या दोन्ही पक्षांची झाली आहे. यामुळे मात्र महाराष्ट्रातील लोकांचे मनोरंजन होत आहे. 



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकत नाही
महाभियोगाच्या वादाची ठिणगी पेटणार
आत्महत्या नसून हत्याच, सकट कुटुंबीयांचा आरोप
पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढीस
१५ लाखांचा प्रश्‍न माहिती अधिकारात येत नाही
महाराष्ट्रात आजपासून गुंजणार परिवर्तन यात्रेचा आवाज
तर माझा कॉंग्रेसला पाठिंबा-एच. डी. देवेगौडा
भाजपने बनविली बलात्कार रक्षकांची टोळी
जवाहरलाल नेहरु धोकेबाज
हरियाणात धार्मिक जागेवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची राजकारणात उडी
उन्नाव बलात्कार करणार्‍या आमदाराच्या समर्थनार्थ रॅली
राजस्थान लोकसेवा आयोगाचे महाभारत सुरु
मुलींवर टॉर्च मारून खोलीत बोलवायचा असा(ह)राम
सिलिंडर मिळाले पण गॅससाठी पैसे नाहीत
पॉर्न बघताना पकडलेल्या तीन आमदारांवर भाजपची मेहरबानी
असिमानंदने दिली नव्हती आपली साक्ष
हत्या करणार्‍या आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा पुढे सरसा
महिलांना संघटीत क्षेत्रात आणणे भारताची प्राथमिकता असाय
संघाची सदस्यता कुणालाही सांप्रदायिक बनवत नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper