×

कॉंग्रेस-भाजपचे बेगडी प्रेम

Published On :    13 Apr 2018
शेयर करा:


-



एससी समुदायाबद्दल अन्याय होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दिवसीय उपोषण केले. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उपोषण करावयास लावले. परंतु उपोषण करत असताना छोले, भटुरे खाऊन उपोषणाचे सोपस्कार पार पाडले गेले. 


जणूकाही आम्हाला एससींबद्दल किती कळवळा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. तर विरोधी पक्ष आपल्याला सहकार्य करत नाही या निषेधार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजप कार्यकर्त्यांनी एकदिवसीय उपोषण केले. त्यांनी देखील कॉंग्रेसच्या पुढे जात काजू खाल्ले आणि गारवा वाटावा म्हणून ज्युस प्यायला. या दोन्ही घटना तशा राजकीय पातळीवरील एक व्यवच्छेदक लक्षण आहे. 


एससींवर अन्याय होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केलेले उपोषणाचे नाटक कॉंग्रेसच्याच अंगलट येणार आहे. कारण आजवर आकडेवारी पाहिली तर एससींवर जागोजागी अन्याय होताना दिसत आहे. नुकताच ऍट्रॉसिटी ऍक्टबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालात त्यांनी काही बदल केले आहेत. परिणामी एससी समुदाय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारु लागला. 


मुळात १९८९ मध्ये राजीव गांधी यांनी ऍट्रॉसिटी कायदा आणला. खरं म्हणजे एससींबद्दल त्यांचा कळवळा होता म्हणून हा कायदा आणला गेला नाही. तर हिंदुत्ववाद्यांची धार बोथट करण्यासाठी हा कायदा आणला गेला. दाखल झालेल्या १.४४ लाख ऍट्रॉसिटीच्या खटल्यांपैकी २३ हजार ४०८ एसटी समुदायाने खटले दाखल केले आहे. तर देशभरात १४५० खटले प्रलंबित आहेत. 


नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार हा आकडा २०१६ पर्यंत होता. आता त्यात निश्‍चितच वाढ झाली असेल. या खटल्याचा निकाल त्वरित लावला जात नाही. त्यामध्ये टंगळमंगळ केली जाते. उशिरा निकाल लागत असल्यामुळे सहसा कोणी ऍट्रॉसिटी दाखल करायला धजावत नाही. 


आज देशभरात जागोजागी एससी, एसटी समुदायावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना सरकार मात्र मुग गिळून गप्प आहे. केवळ राजकीय पक्षांकडून नौटंकी केली जाते. परंतु ज्या गतीने खटले चालवायला हवेत व त्या व्यक्तीला न्याय द्यायला हवा त्याला फाटा फोडला जातो. 


महाराष्ट्रात २००५ मध्ये घडलेल्या खैरलांजी हत्याकांड हा तर माणुसकीला काळिमा?फासणारा आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र या खटल्यातील मुख्य साक्षीदार भैय्यालाल भोतमांगे यांना न्याय तर मिळाला नाहीच उलट न्याय मिळण्याआधीच त्यांचे निधन झाले. एका अर्थाने हा खटला आता संपल्यात जमा आहे. 


कारण मुख्य साक्षीदाराचेच निधन झाल्याने खटला चालविणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक घटना अशा प्रकारे समोर येत असताना सरकारकडून कुठल्याही प्रकारे ठोस उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे जे आरोपी असतात त्यांचे फावते आणि दुसरा गुन्हा करण्यास ते पुढे सरसावतात. म्हणून ऍट्रॉसिटी नामक जो कायदा आहे तो आणखी कडक करण्याची गरज आहे. 


परंतु सरकार निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाऊल टाकते. म्हणूनच आज नव्या समस्यांना एससी, एसटी समुदायाला सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी मराठा क्रांती मूक मोर्चात ऍट्रॉसिटी हटवा ही प्रमुख मागणी होती त्यामागील सूत्रधार खरं म्हणजे ब्राह्मण होते. याचा अर्थ आरएसएस पडद्यामागील सूत्रधार होते. परंतु ही मागणी त्यावेळी मान्य झाली नसली तरी भीमा-कोरेगाव दंगल उसळल्यानंतर पुन्हा एकदा ब्राह्मणांनी डोके वर काढले. 


मीलिंद एकबोटेसारखा ब्राह्मण ऍट्रॉसिटी अंतर्गत अडकल्याने त्याच्या सुटकेसाठी केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात असलेल्या सरन्याधिशांनी ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात बदल करुन एकबोटेला वाचविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच अशा प्रकारचा निर्णय दिला गेला. यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. 


कारण त्या विषयावर बोलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आम्ही दिलेला निर्णय कायम राहणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने पाठविलेली पुनर्याचिका आणि सर्वोच्च न्यायालयाची उलट सुलट उत्तरे यावरुन असे दिसते की, तु रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो, अशी सरकार आणि न्यायालयाची भूमिका आहे. ही भूमिका बहुजन समाजाच्या लक्षात आली आहे. 


त्यामुळे केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाने कितीही आव आणला तरी एससी, एसटींबद्दल कुठलाही कळवळा दिसत नाही. त्यामुळे अशा या आरएसएसधार्जिण्या सरकारला आता पाणी पाजण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सरकारचे व राहुल गांधींचे हे बेगडी प्रेम लोकांसाठी हास्यास्पद आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकत नाही
महाभियोगाच्या वादाची ठिणगी पेटणार
आत्महत्या नसून हत्याच, सकट कुटुंबीयांचा आरोप
पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढीस
१५ लाखांचा प्रश्‍न माहिती अधिकारात येत नाही
महाराष्ट्रात आजपासून गुंजणार परिवर्तन यात्रेचा आवाज
तर माझा कॉंग्रेसला पाठिंबा-एच. डी. देवेगौडा
भाजपने बनविली बलात्कार रक्षकांची टोळी
जवाहरलाल नेहरु धोकेबाज
हरियाणात धार्मिक जागेवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची राजकारणात उडी
उन्नाव बलात्कार करणार्‍या आमदाराच्या समर्थनार्थ रॅली
राजस्थान लोकसेवा आयोगाचे महाभारत सुरु
मुलींवर टॉर्च मारून खोलीत बोलवायचा असा(ह)राम
सिलिंडर मिळाले पण गॅससाठी पैसे नाहीत
पॉर्न बघताना पकडलेल्या तीन आमदारांवर भाजपची मेहरबानी
असिमानंदने दिली नव्हती आपली साक्ष
हत्या करणार्‍या आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा पुढे सरसा
महिलांना संघटीत क्षेत्रात आणणे भारताची प्राथमिकता असाय
संघाची सदस्यता कुणालाही सांप्रदायिक बनवत नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper