×

लोकशाही वाचविणे हेच बाबासाहेबांना अभिवादन!

Published On :    14 Apr 2018
शेयर करा:


-



मेलेल्या मुडद्याला ज्यांनी जागे केले, गुलामीच्या बेड्या तडातडा तोडून टाकल्या, स्वाभिमानाची व आत्मसन्मानाची लढाई शिकविली. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन बहुजन समाजाला स्वत्वाची जाणीव करुन दिली. 


स्वातंत्र्य, समता बंधुता आणि न्याय या चतुसूत्रीवर आधारित आपल्या प्रकांड पांडित्याने ज्यांनी या देशाची समतामूलक अशी राज्यघटना लिहिली ते विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती! 


विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ भारतालाच नव्हे तर जगाला दीपवणारे दीपस्तंभ होते. ज्या बाबासाहेबांनी शिक्षणासाठी हालअपेष्टा सोसल्या तेच बाबासाहेब जगातील एक नंबरचे विद्वान झाले. ज्यांनी शाळेच्या वर्गाबाहेर शिकून आपली शिक्षणाची भूक भागविली आणि सर्व बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. 


असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि झालेली जडणघडण पाहता ते किती ताकदीचे होते हे लक्षात येते. ज्ञानपिपासू आणि तितकेच आपल्या मतावर ठाम असणारे बाबासाहेब हे आगळेच रसायन आहे. बाबासाहेबांचा जीवनपट नजरेखालून घातला तर असा जीवनपट जगात कुठेही सापडणार नाही. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. त्यावेळी शूद्रातिशूद्रांना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले होते. सर्वच हक्क अधिकार नाकारण्यात आले होते. या मानवी हक्कांच्या लढाईसाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा बाबासाहेबांसारखा महायोद्धा जगभरात सापडणार नाही. बहुजन समाजाला अंधारात लोटण्याचे काम हे ब्राह्मणी व्यवस्थेने केले होते. 


हे बाबासाहेबांच्या लवकरच लक्षात आले होते. कारण त्यांचा विविध विषयांवरील व्यासंग आणि अभ्यास पाहता ही व्यवस्था कशी आहे याचे आकलन त्यांना झाले होते. म्हणून त्यांनी ऍनिहिलेशन ऑफ कास्ट (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) हा प्रबंध लिहिला होता. याचा अर्थ त्यांचा जातीव्यवस्थेवर किती दांडगा अभ्यास होता हे लक्षात येते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे बाबासाहेबांनी ओळखले होते. 


म्हणूनच आपल्या अनुयायांना त्यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा महामंत्र दिला. बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि राष्ट्रपिता जोतिराव फुले यांना गुरु मानले होते. या तिघांचाही लढा ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध होता. हे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच त्यांनी या महामानवांना गुरु मानले. उभी हयात ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध लढण्यात बाबासाहेबांनी घालवली. 


जी लोक आपला इतिहास विसरतात ती लोक इतिहास निर्माण करु शकत नाहीत, असा क्रांतीकारी विचार त्यांनी समाजाला दिला होता. म्हणून १९ व्या शतकामध्ये बाबासाहेबांसारखे वादळ या देशात निर्माण झाले आणि या वादळात ब्राह्मणी व्यवस्थेची नौका कुठल्या कुठे फेकली गेली. 


म्हणूनच आजही बाबासाहेबांचे नाव काढले की ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. याला कारण बाबासाहेबांनी आपल्या उपजत अशा प्रकांड पांडित्याने ब्राह्मणांना चित केले होते. उभ्या देशात बहुजन चळवळीचे काम सुरु असताना त्यांनी १९१६ मध्ये सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्या दिवसापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 


सर्वांना सोबत घेऊन त्यांनी बहुजन चळवळीची पताका सतत फडकत ठेवली. जातीव्यवस्थेचे चटके सोसत असतानाही त्यांनी कधीही बहुजन समाजाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. म्हणूनच बाबासाहेबांचे विचार आजही किती ताकदीचे आहेत हे लक्षात येते. मी प्रथमही भारतीय आणि शेवटपर्यंतही भारतीय राहणार आहे. 


भारतीय असल्याचा अभिमान त्यांच्या नसानसात वाहत होता. म्हणूनच अशातर्‍हेचे विधान त्यांनी केले आहे. देशाची घटना लिहिताना अनेक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. ज्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर अन्याय केला नेहमीच त्यांचा अपमान केला. परंतु घटना लिहिताना बाबासाहेबांनी कुणावरच अन्याय केला नाही. समतामूलक अशी राज्यघटना लिहिली. 


देशातील सर्व समाज बांधवांना एकच न्याय दिला. म्हणून आज भारतात लोकशाही टिकून आहे. परंतु सर्वांना न्याय देत असतानाही बाबासाहेबांनी दिलेली आदर्श राज्यघटना बदलण्याचे षड्यंत्र ब्राह्मणांकडून आखले गेले आहे. आम्ही घटना बदलण्यासाठीच सत्तेवर आलो आहोत अशातर्‍हेची भाषा ब्राह्मणांकडून बोलली जाते. एकंदरीत घटनेला नख लावण्याचे काम सुरु आहे. 


बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. कारण त्यामध्ये सर्वच बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होता. परंतु राज्यघटनेत कुणावरही अन्याय, अत्याचार नसूनही घटना बदलण्याचे जे डावपेच आखले जात आहेत ते देशाला घातक ठरणार आहेत. पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या वाटेकडे आपण चाललो आहोत की काय अशी शंका ब्राह्मण घेत असलेल्या चालीवरुन दिसून येत आहे. 


परंतु दिशाहीन झालेल्या सर्व बहुजन समाजाला दिशा दाखविण्यासाठी बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जागृती सुरु आहे. बाबासाहेबांचा खरा विचार बामसेफच्या माध्यातून घरोघरी पोहोचवला जात आहे. 


बाबासाहेबांची जयंती आली की अनेकांच्या अंगात बाबासाहेब येतात. परंतु बाबासाहेबांनी दिलेला कुठलाही विचार ही लोक डोक्यात घेत नाहीत. केवळ त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात हीच खरी शोकांतिका आहे. १९२७ मध्ये महाडच्या चवदारतळे समता संगर दिनी बाबासाहेबांनी एक विचार दिला. 


जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा परंतु आम्ही मात्र तो अग्नी विझवून टाकला. म्हणून आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती धोक्याची आहे. बाबासाहेबांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. परंतु पुन्हा या बेड्या पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


बाबासाहेबांनी समतामूलक राज्यघटना लिहून लोकशाही दिली. परंतु ही लोकशाही आता ठोकशाही झाली आहे. या ठोकशाहीचा दांडा ब्राह्मण नावाची पिलावळ आहे. म्हणून या लोकशाहीला संपविण्याचे कारस्थान दिवसेंदिवस सुरु आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून देशाची सत्ता काबीज केली जात आहे आणि पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे दुसरी मनुस्मृती लादली जात आहे. 


देशातील ईव्हीएमच्या माध्यमातून होणार्‍या निवडणुका या पारदर्शक व निष्पक्षपणे होणार नसल्याचा खुलासा सर्वोच्च न्यायालयाने करुनही अद्यापही ईव्हीएम हटविण्यात आला नाही. याचा अर्थ ही गुलामगिरी मजबूत करण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न आहे. म्हणून ईव्हीएमला ठेचून काढण्याची वेळ आली आहे. 


कारण आता जर का आपण पाऊल उचलले नाही तर येणार्‍या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. सर्वच महापुरुषांनी आपल्यासाठी आयते करुन ठेवले. परंतु या आयत्या घरावर केवळ आपण रेघोट्या मारण्याचे काम केले. महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. 


आजच्या जयंतीदिनी बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना अभिवादन करताना त्यांनी दिलेला जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा हा विचार घेऊन आपण जागृतीची ज्योत प्रज्वलित करुया. तरच खर्‍या अर्थाने आपण या महामानवाला अभिवादन केल्यासारखे होईल. नाही तर आपल्यासारखा कपाळकरंटा कुणीच नसेल! 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भोजन पुरविणार्‍या पुरवठादारांचे पैसे देऊ नका
धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
एकत्र निवडणुकांसाठी भाजपची आक्रमक भूमिका
सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय
...तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल
२०१९ मध्ये ईव्हीएम मशीन फोडणारच
देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये
गोवारी समाज आदिवासीच
प्रसूती रजेच्या कायद्यामुळे महिलांच्या नोकर्‍यांत घट
बिहारच्या आणखी १४ बालगृहांत लैंगिक शोषण
अपहरणांचे सत्र सुरूच
संविधान जाळल्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद
केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या सुमारे ८ हजार ज
धनगर आरक्षणासाठी परभणीत तरुणाची आत्महत्या
नालासोपार्‍याचे कर्नाटक कनेक्शन
आरक्षणाच्या मागणीसाठी नगरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोक
सात राज्यांत पूरस्थिती, महाराष्ट्रात १३९ जणांचा मृत्यू
संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच
गाडीला उशीर झाला तरच वेग वाढवा
कवडीमोल भावात जमिनी लाटणार्‍या रिलायन्स विरोधात एल्गार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper