×

नौटंकी कशाला करता

Published On :    15 Apr 2018
शेयर करा:


-



भारतीय संविधान वाचविण्यावरुन कॉंग्रेस-भाजप यांच्यामध्ये नौटंकी सुरु झाली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत त्यांनी वाभाडे काढले आहेत. एकंदरीत संविधानाप्रती या दोघांच्याही मनात अढी आहे. बहुजन क्रांती नायक कांशीराम यांच्या मते कॉंग्रेस आणि भाजप म्हणजे नागनाथ व सापनाथ आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांवर विश्‍वास ठेवणे बरोबर नाही. 


कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महू या जन्मस्थळापासून ‘संविधान वाचवा’ अभियान सुरु केले. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सडकून टीका केली. १९७५ मध्ये आणीबाणी लादून कॉंग्रेसने संविधानाची खिल्ली उडविल्याचे त्यांनी सांगितले. यावर कॉंग्रेसनेही भाजपवर निशाणा साधला. आम्ही देशातील बंधुभाव मजबूत करत आहोत. 


भाजपची विचारधारा समाजात तंटे लावण्याचे काम करत आहे. संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. अशातर्‍हेचे वक्तव्य कॉंग्रेसने केले. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले असले तरी दोघेही महालबाड आहेत. याची अनेक उदाहरणे देता येतील. 


मसुदा समितीचे अध्यक्ष विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉ.राजेंद्र प्रसाद! बाबासाहेबांनी एखादे कलम लिहिल्यानंतर त्याबाबतचा मसुदा डॉ.राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांना दाखविणे क्रमप्राप्त होते. त्यांनी मंजूरी दिल्यानंतर संविधानात ते कलम समाविष्ट करण्याचे अधिकार बाबासाहेबांकडे होते. 


एकूण ३९५ कलमे समाविष्ट केली. समतामूलक अशी राज्यघटना देऊनही कॉंग्रेस-भाजप सारख्या पक्षांनी अंतर्गत विरोध सुरुच ठेवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दारच नव्हे तर खिडक्या सुद्धा संविधानसभेत येण्यासाठी बंद आहेत, असे वक्तव्य मोहनदास करमचंद गांधी यांनी केले होते. त्यांच्यावरच शेवटी संविधान लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. 


तर १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जवाहरलाल नेहरु यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात चौथी नापास असलेल्या काजरोळकर यांना उभे केले. त्यावेळी काजरोळकर यांच्याकडे पैसेही नव्हते. परंतु नेहरु यांनी काजरोळकर यांना २५ हजार रुपये देऊन निवडणूक लढविण्यास भाग पाडले. या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव झाला. अशाप्रकारे लोकसभेत येऊ नये म्हणून नेहरुंनी अशाप्रकारची रणनीती आखली. 


त्याचबरोबर संविधान लागू असूनही १९७५ च्या कालखंडात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली. या आणीबाणीच्या माध्यमातून जेवढा जुलूम केला गेला त्याला तोडच नाही. १९९१ च्या दरम्यान तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंहराव यांनी खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारिकरण, जागतिकीकरण हे धोरण आणले. परिणामी परकीय गुंतवणुकीच्या नावाखाली देशातील नोकर्‍या कमी करण्यात आल्या. 


त्याचा परिणाम देशामध्ये बेरोजगारी वाढण्यात झाला. हे देखील संविधानविरोधी काम कॉंग्रेसने केले. त्याचबरोबर एसईझेड (स्पेशल ईकॉनॉमिक झोन) च्या नावाखाली येथील मूलनिवासींच्या जमिनी हडपण्यात आल्या. त्या जमिनी टाटा, बिर्ला, अंबानीसारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्यात आल्या. 


या जमिनी बाबासाहेबांनी कुळ कायदा संसदेत आणून मूलनिवासींना मिळवून दिल्या होत्या. त्या देखील काढण्याचे काम कॉंग्रेसने केले. असे संविधानविरोधी काम करत असताना आता मात्र कॉंग्रेसने कुठल्या आधारावर संविधान बचाव अभियान सुरु केले आहे? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. 


कॉंग्रेस बरोबरच भाजपही संविधानविरोधी आहे. असे असूनही भाजपही कॉंग्रेसवर तोंडसुख घेताना दिसत आहे. भाजपने सत्तेवर आल्यापासून भूमी अधिग्रहण कायदा जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राष्ट्राध्यक्षांमार्फत वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच घटना बदलण्यासाठी आम्ही सत्तेवर आलो आहोत अशी मखलाशी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केली होती. 


शिक्षण संपविले जात आहे. शिक्षणाला स्वायतत्ता असे गोंडस नाव दिले असले तरी शिक्षण हिरावण्याचा हा प्रकार आहे. भगवतगिता हा राष्ट्रीय ग्रंथ करा असे वक्तव्य (मनु)स्मृती इराणी यांनी केले होते. भारतीय संविधान हे विज्ञानाला प्राधान्य देणारे आहे. परंतु अंधश्रद्धाविषयक शिक्षण देऊन संविधानाविरोधी काम सुरु आहे. ऍट्रॉसिटीलाही संविधानाचे संरक्षण आहे. 


परंतु या ऍट्रॉसिटीतही बदल केला जात आहे. संविधानातील अनेक कलमे कमी करण्यात आली आहेत. हे सर्व प्रकार कॉंग्रेस-भाजपच्या सल्ल्यानेच होत आहे. असे असूनही संविधान बचाव अभियानाचा जो काही या दोन्ही पक्षांना पुळका सुटला आहे तोच मुळात घातक ठरणारा आहे. या दोघांनाही संविधान नको आहे. 


त्यांना पुन्हा एकदा मनुस्मृतीचे राज्य आणावयाचे आहे. म्हणूनच ईव्हीएम आणून भारतात निवडणुका लढविल्या जात आहेत. ईव्हीएम ही आधुनिक मनुस्मृती आहे. त्यामुळे संविधान बचाव अभियानाची नौटंकी कशाला करत आहेत. याचा जाब विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संविधान वाचवायचे असेल तर येथील मूलनिवासी बहुजनांनी रस्त्यावर उतरुन जनआंदोलन करण्याची गरज आहे. 


नाहीतर वेगवेगळ्या क्षेत्रावर ब्राह्मणांनी कब्जा करुन येथील मूलनिवासींना देशोधडीला लावले आहे. संविधान सर्वांना हक्क व अधिकार प्रदान करते. मात्र सत्ताधारी पक्षाकडून फक्त उद्योगपतींचेच चोचले पुरविले जात आहेत. हे सर्व संविधानविरोधी आहे. म्हणून भाजप-कॉंग्रेसने नौटंकी थांबवावी. नाहीतर तुम्हाला मतदार कुठे फेकेल याची कल्पनाही येणार नाही. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकत नाही
महाभियोगाच्या वादाची ठिणगी पेटणार
आत्महत्या नसून हत्याच, सकट कुटुंबीयांचा आरोप
पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढीस
१५ लाखांचा प्रश्‍न माहिती अधिकारात येत नाही
महाराष्ट्रात आजपासून गुंजणार परिवर्तन यात्रेचा आवाज
तर माझा कॉंग्रेसला पाठिंबा-एच. डी. देवेगौडा
भाजपने बनविली बलात्कार रक्षकांची टोळी
जवाहरलाल नेहरु धोकेबाज
हरियाणात धार्मिक जागेवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची राजकारणात उडी
उन्नाव बलात्कार करणार्‍या आमदाराच्या समर्थनार्थ रॅली
राजस्थान लोकसेवा आयोगाचे महाभारत सुरु
मुलींवर टॉर्च मारून खोलीत बोलवायचा असा(ह)राम
सिलिंडर मिळाले पण गॅससाठी पैसे नाहीत
पॉर्न बघताना पकडलेल्या तीन आमदारांवर भाजपची मेहरबानी
असिमानंदने दिली नव्हती आपली साक्ष
हत्या करणार्‍या आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा पुढे सरसा
महिलांना संघटीत क्षेत्रात आणणे भारताची प्राथमिकता असाय
संघाची सदस्यता कुणालाही सांप्रदायिक बनवत नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper