×

हिंदुत्वाचे भागवत पुराण

Published On :    16 Apr 2018
शेयर करा:


-



तलासरी डहाणू येथील विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात राम मंदिराच्या विषयाला स्पर्श करतानाच ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक सरसंघचालक मोहन भागवत यांनी मारली आहे. 


आम्ही मोहन भागवत यांना सांगू इच्छितो की, तुम्ही जी वारंवार हिंदुत्वाची पिचकारी मारत आहात, ती पिचकारी तुमच्या तोंडावरच पडणार आहे. भागवत पुराण मांडण्याऐवजी आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या. तुम्ही कोण ठरविणारे आम्ही हिंदू आहोत म्हणून! त्यामुळे अशा प्रकारची बकवासगिरी बंद करा. 


भागवत गेली अनेक दिवस हिंदू नावाची पिचकारी सोडत आहेत. परंतु हिंदू म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला हवे. हिंदू हा पर्शियन भाषेतला शब्द आहे. हिंदुचा अर्थ हिन आणि दुय्यम दर्जाचा गुलाम, चोर, लबाड, लफंगा असे अनेक अर्थ हिंदू या शब्दाचे निघतात. 


मग आम्हाला वारंवार हिंदू संबोधून इथल्या मूलनिवासींना चोर अशी शिवी देण्याचा प्रयत्न भागवतांकडून सुरु आहे. मोगल राजवटीच्या कालखंडात ज्यावेळी सारा वसूल केला जात होता तेव्हा याच ब्राह्मणांनी म्हटले की, आम्ही हिंदू नाही. मग आत्ताच हिंदुची पिपाणी एकसारखी का वाजविली जाते. 


याचा अर्थ येथील बहुजन समाजाला हिंदू या नावाखाली गंडविण्याचा प्रकार आहे. हिंदू या नावाखाली आमच्या लोकांनी गंडवून घेतले आहे. त्याचाच फायदा भागवतसारख्या पिलावळीने उठवला आहे. या देशातील कोणीही हिंदू नाही. स्वतःचा हिंदू म्हणून उर बडवून?घेणारा ब्राह्मणही हिंदू नाही. 


त्याच्या दाखल्यावर वैदिक ब्राह्मण असा उल्लेख असतो. स्वतः वैदिक असताना आमच्यावर मात्र हिंदू ही शिवी लादली जाते. यामागे ब्राह्मणांचे फार मोठे षड्यंत्र आहे. येथील मूलनिवासी समाज हा नागवंशीय आहे. त्याला एक कृषी संस्कृती आहे, श्रमण संस्कृती आहे.


परंतु या कृषी आणि श्रमण संस्कृतीवर ॠषी व भ्रमण संस्कृती ब्राह्मणांनी लादली आणि आमचा मूलनिवासी बांधव स्वतःची संस्कृती विसरुन ब्राह्मणांचा शेंडी कुरवाळत बसला. म्हणूनच या अज्ञानापायी आज वाताहत होताना दिसत आहे. 


या ब्राह्मणी अथवा वैदिक धर्माला कंटाळून अनेकांनी हिंदू धर्माचा त्याग केला. त्यामध्ये बुद्धीस्ट, जैन, शिख, लिंगायत, ख्रिश्‍चन, मुस्लीम यांचा समावेश आहे. त्यांनी विषमतावादी धर्माला सोडून समतावादी धर्माला आपलेसे केले. परंतु आज या देशातील ओबीसीसारखा मोठा समूह हिंदू धर्माच्या नावाखाली गणला गेला आहे. यामागेही ब्राह्मणांची मोठी चाल आहे. 


खर्‍या अर्थाने अल्पसंख्य असलेला ब्राह्मण हिंदू या नावाखाली बहुसंख्य होतो आणि बहुसंख्य असलेला ओबीसी बांधव अल्पसंख्य होतो. त्यामुळेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना टाळण्यात येते. आजही देशभरामध्ये लिंगायत आमचा स्वतंत्र धर्म आहे. त्याला स्वतंत्रच दर्जा द्यावा, अशी मागणी लिंगायत समाजाने लावून धरली आहे. अनेकजण आम्ही हिंदू धर्माचे घटक नाही, असे सांगत आहेत. 


असे असताना जबरदस्तीने भागवत नामक पिलावळीकडून तुम्ही हिंदू आहात आणि हिंदुच राहणार आहात. ही टिमकी सतत वाजविली जाते. एकंदरीत मूलनिवासी समाजामध्ये होत असलेली जागृती पाहून भागवतांचे पित्त खवळले जात आहे. म्हणूनच त्यांच्याकडून वारंवार आपण हिंदू आहोत, अशी मखलाशी केली जाते. ब्राह्मणाची शेंडी तुटेल परंतु त्या शेंडीचे मूळ काही तुटणार नाही. 


त्यामुळे ब्राह्मण हा नेहमीच वाकड्यात जातो. कारण त्याच्याकडे न्याय देण्याचा गुणच नाही. ब्राह्मणीज नॉट ए ज्युडीशियल कॅरेक्टर असे इंग्रजानी म्हटले होते. त्यामुळे ब्राह्मणांवर कधीही विश्‍वास ठेवू नये. परंतु आज ३.५ टक्के असलेला ब्राह्मण देशावर कब्जा करुन आहे. त्याला कारण आमचाच अज्ञान! या अज्ञानाच्या गर्तेत लोटण्याचे काम ब्राह्मणांनी केले. म्हणूनच अज्ञान वाढत गेले. 


परंतु आता जागृती होताना दिसत आहे. आता कळून चुकले आहे. आम्ही हिंदू धर्माचे घटक नाही. यामुळेच ब्राह्मण पुरते घाबरले आहेत. येथील मूलनिवासी समाज हिंदू असेल तर जाहीर करा, असे आव्हान बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिले होते. यावर उत्तर देताना याच भागवतांनी एससी, एसटी, ओबीसी हिंदू नसून ते सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आहेत, अशी पळवाट काढली होती. 


याचा अर्थ भागवतही गोंधळले आहेत. ब्राह्मणांनो तुमची संस्कृती तरी आहे का? तुमची संस्कृती नसून विकृती आहे. हे पेशवाईच्या कालखंडात शनिवारवाड्यावर होणार्‍या प्रकारावरुन लोकांना समजून चुकले आहे. भागवतसारखा डोमकावळा एकसारखा हिंदू नावाचा जपमाळ ओढताना दिसत आहे. 


आम्ही येथील मूलनिवासी लोक हिंदू नसताना आमच्यावर जबरदस्तीने हिंदुत्व का लादले जात आहे. अरे तुमची व्यवस्था टिकविण्यासाठी हा उद्योग तुमच्याकडून सुरु आहे. हे न कळण्याइतपत आम्ही वेडे नाही. आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या. तुम्ही कोण ठरविणारे आम्ही हिंदू आहोत म्हणून! ही मखलाशी बंद करा नाही तर ज्यांना तुम्ही हिंदू म्हणत आहात ते लोक तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकत नाही
महाभियोगाच्या वादाची ठिणगी पेटणार
आत्महत्या नसून हत्याच, सकट कुटुंबीयांचा आरोप
पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढीस
१५ लाखांचा प्रश्‍न माहिती अधिकारात येत नाही
महाराष्ट्रात आजपासून गुंजणार परिवर्तन यात्रेचा आवाज
तर माझा कॉंग्रेसला पाठिंबा-एच. डी. देवेगौडा
भाजपने बनविली बलात्कार रक्षकांची टोळी
जवाहरलाल नेहरु धोकेबाज
हरियाणात धार्मिक जागेवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची राजकारणात उडी
उन्नाव बलात्कार करणार्‍या आमदाराच्या समर्थनार्थ रॅली
राजस्थान लोकसेवा आयोगाचे महाभारत सुरु
मुलींवर टॉर्च मारून खोलीत बोलवायचा असा(ह)राम
सिलिंडर मिळाले पण गॅससाठी पैसे नाहीत
पॉर्न बघताना पकडलेल्या तीन आमदारांवर भाजपची मेहरबानी
असिमानंदने दिली नव्हती आपली साक्ष
हत्या करणार्‍या आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा पुढे सरसा
महिलांना संघटीत क्षेत्रात आणणे भारताची प्राथमिकता असाय
संघाची सदस्यता कुणालाही सांप्रदायिक बनवत नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper