×

बनवारीलाल आणि गाल

Published On :    18 Apr 2018
शेयर करा:


-तामिळनाडूचे राज्यपाल व भाजपाचे नेते बनवारीलाल पुरोहित यांनी द विकच्या महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम यांच्या गालावर टिचकी मारुन एकच खळबळ उडवून दिली आहे. जरी या प्रकरणी त्यांनी माफी मागितली असली तरी घटनात्मक पदांवर बसणार्‍या व्यक्तींनी अशातर्‍हेचे वर्तन करणे शोभनीय नाही. 


बनवारीलाल पुरोहित नावातच लाल आणि पुरोहित! त्यामुळे लालमलाल होत त्यांनी गालावर टिचकी मारण्याचा जो प्रकार केला आहे तो निंदनीय आहे. पुरोहित म्हटल्यानंतर बदमाश आणि लफंगा! त्यांच्या नावाला ते जागले आहेत. परंतु आपण एका घटनात्मक पदावर बसलो आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. राजकारण करत असताना कुठल्याही प्रकारे आपल्या अंगावर डाग पडणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. 


परंतु बनवारीलाल पुरोहितांसारखे लोक आपल्या इज्जतीचा खोबरा करताना दिसत आहेत. कारण बनवारीलाल पुरोहित ज्या परिवारातून राजकारणात आलेत त्यांचे राजकारण म्हणजे कुठलीही पातळी सोडून असते. त्यांच्यावर संघ परिवाराच्या विचाराचा पगडा आहे. संघ परिवाराचा विचार म्हणजे मनात ‘कु’हेतू ठेवून केलेली कृती होय. म्हणूनच त्यांची ही कृती विकृती आहे. विकृती संघ परिवाराच्या पाचवीला पुजलेली आहे. 


बनवारीलाल पुरोहितांनी केलेली विकृती ही या देशातील एकमेव नाही. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी.तिवारी यांचे उदाहरण यापेक्षाही भयानक आह