×

गुन्हेगार लबाडांचे सरकार

Published On :    21 Apr 2018
शेयर करा:


-



कटुआ व उन्नाव यासारख्या घटनांमुळे देशात अशांतता माजली आहे. अल्पवयीन मुलींवर व महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तर या घटनांमध्ये जे लोक अडकलेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहे. हे सरकार आहे की चोर आहे असा प्रश्‍न पडला आहे. गुन्हेगार असलेल्या लबाडांचे हे सरकार आहे. त्यामुळे न्याय मिळेल असे वाटत नाही. 

आज महिलांवर अत्याचार करणार्‍यांमध्ये भाजपचे आमदार, खासदा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर बसपा आणि तृणमूल कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधींनीही यावर आघाडी मिळविली आहे. असोशिएनशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील ७७६ खासदारांपैकी ७६८ आणि ४ हजार १२० आमदारांपैकी ४ हजार ७७ जणांच्या प्रतिज्ञापत्रांचे परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये भाजपच्या १२ खासदार व आमदारांवर महिलांवर अत्याचार केल्याचे खटले सुरु आहेत. दुसर्‍या क्रमांकावर शिवसेना ७, तृणमूल कॉंग्रेस ६ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील १२ जण, पश्‍चिम बंगाल ११, आंध्र व ओडिशा प्रत्येकी ५ जणांचा समावेश आहे. महिलांवर अत्याचार करुनही ३२७ जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपने ४५ जणांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर बसपाने ३५, तृणमूल कॉंग्रेसने २४ लोकांना मैदानात उतरविले आहे. ही आकडेवारी पाहिली तर डोक्याला झिणझिण्या येतात. कारण ज्या लोकांकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा निवडून आलेले लोकप्रतिनिधी पूर्ण करतात का? हा खरा प्रश्‍न आहे. देशातील राजकीय व्यवस्था पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुणालाही उमेदवारी देण्यामध्ये हात आखडता घेतला जात नाही. मीडिया, मनी, मसल पॉवर असणार्‍या धनदांडग्याला उमेदवारी देण्याचा प्रघात जवाहरलाल नेहरु यांच्या कालखंडापासून सुरु आहे. १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत काजरोळकर नामक ४ थी पास झालेल्या व्यक्तीला २५ हजार रुपये देऊन नेहरु यांनी उमेदवारी दिली होती. त्या दिवसापासून दांडगाई सुरु झाली आहे. ती आजतागायत कायम आहे. उमेदवारी कोणाला द्यावी व कोणाला नाकारावी याबाबत कुठलीही आचारसंहिता नाही. त्यामुळे आपण फक्त मोठ्या लोकशाहीच्या गप्पा मारतो. परंतु ही लोकशाही ब्राह्मणांची ठोकशाही आहे. उमेदवार हा स्वच्छ चारित्र्याचा असावा. त्याच्यावर कुठलाही डाग अथवा कलंक नसावा. त्याची प्रतिमा जनमानसात चांगली असावी. तो किमान पदवीधर असावा. अशा प्राथमिक अटी उमेदवारांसाठी ठेवायला हव्यात. परंतु कुठल्याही प्रकारे अटी न ठेवल्यामुळे धनदांडग्याच्या जीवावर एखादी व्यक्ती निवडून येते. निवडून आल्यानंतर कुठलेही काम न करता निवडणुकीत खर्च केलेला पैसा भरुन कसा निघेल याकडे त्याचे लक्ष असते. निवडणुकीत लोकांना पैशाचे आमीष दाखवून निवडणूक जिंकलेली असते. त्यामुळे जनतेची कामे करावी, असे कोणालाही वाटत नाही. आज लोकशाही धोक्यात आहे. कारण या लोकशाहीवर ब्राह्मणशाहीचा कब्जा आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून दुसरी मनुस्मृती आज उंबरठ्यावर आहे. निष्पक्ष आणि मुक्त पद्धतीने निवडणूक व्हायला हवी होती. परंतु निष्पक्ष आणि मुक्त पद्धतीला फाटा देण्यात आला आहे. ईव्हीएम हॅक करुन आपल्याला हवा तो उमेदवार सत्ताधारी पक्ष निवडून आणत आहे. त्यामुळे ना त्यांना लोकांची काळजी! परंतु व्यवस्था कशी बळकट होईल याकडे मात्र कटाक्षाने लक्ष दिले जाते. संसदीय सत्र फुकट घालवले जात आहेत. जनतेची कुठल्याही प्रकारे कामे केली जात नाहीत. लोकसभेत गोंधळ घातला जातो. ज्यांच्यावर कायदे करण्याची जबाबदारी आहे तेच लोक अरेरावीची भाषा करतात आणि संसद डोक्यावर घेतात. हे कशाचे लक्षण आहे? याचे उत्तर ब्राह्मणांच्या दडपशाहीत आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोक संसदेच्या सर्वोच्च सभागृहात निवडून जात असतील तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. कारण लोकशाही टिकली तर देश टिकेल. देश टिकला तर देशातील जनता टिकेल. देशातील जनता टिकली तर लोकशाही आणखी मजबूत होईल. परंतु आज कितीही लोकशाहीची टिमकी वाजविली जात असली तरी ही टिमकी केव्हाच फुटली आहे. या टिमकीची शाई उडाली आहे. म्हणून या ब्राह्मणशाहीला व ढोंगी, लबाड, बदमाश गुन्हेगारांच्या टोळीला सामोरे जायचे असेल तर सर्व मूलनिवासींनी एकत्र यायला हवे. मूलनिवासी ही संकल्पनाच तुम्हा आम्हाला सर्वांना एकाच सुत्रात बांधणारी आहे. ब्राह्मणशाहीला घालवून लोकशाहीची पुनर्स्थापना करायची असेल तर एकत्रित व्हावेच लागेल. त्यासाठी आपल्या महापुरुषांनी दिलेले विचार घेऊन संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय काही मिळणार नाही. लोकशाही इमारतीच्या पायाचा दगड?व्हायचा की कळस हे ठरविणे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. कळसाकडे लक्ष जात असले तरी त्या इमारतीचा पाया मजबूत असेल तरच तो कळस टिकेल. त्यामुळे कळसापेक्षा सर्वांनी पाया होऊ या, असे आवाहन करत आहोत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
धक्कादायक! कर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव
नागपुरात ३० हून अधिक निवासी डॉक्टरांना गॅस्ट्रोने पछाड
भडका! देशात इंधनाने गाठला उच्चांक
कामगारांच्या पत्राशेडमध्ये सापडल्या ईव्हीएम मशीन
सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल, युद्धही लादेल
कर्नाटक मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला!
नीरव मोदी, मेहुल चोकसीविरोधात इंटरपोलकडे धाव
भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी पैसे हिसकावून फाडत फेर
लोकशाहीचा आदर आहे मग बहुमत चाचणीस सामोरे न जाता पळ का काढ
राजनाथ सिंह यांच्यासाठी २० गावे १२ तास अंधारात
१२ हजार ७०० कोटींचा घोटाळा करणारा नीरव मोदी लंडनमध्ये
येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराच
राज्यपाल वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी
अडीच दिवसांचा गणपती
फेक न्यूजचे समूळ उच्चाटन गरजेचे
२८ मे रोजी होणार मराठा आरक्षण सुनावणी
कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
४० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर अस
दिवसाला एक कोटी घेणारे मोठे वकीलही मूग गिळून गप्प असतात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper