×

वाचाळवीर गंग(गँग)वार

Published On :    22 Apr 2018
शेयर करा:


-



अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍यास फाशीची शिक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करुन अध्यादेश आनत असताना मोदी सरकारमधील एका मंत्र्याने बलात्काराच्या प्रश्‍नावर वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. 


इतक्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक दोन घटना घडत असतील तर त्याचे इतके मोठे अवडंबर माजविण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी उधळली आहेत. त्यांचे नाव गंगवार असले तरी त्यांचे हे वादग्रस्त वक्तव्य पाहून ते गँगवार असल्याचे दिसून येत आहे. कारण गँगवार करण्यामध्ये भाजप सरकार आघाडीवर आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या आहेत. 


२०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करुन सार्‍या देशात धमाल उडवून दिली आहे. त्यांना सावरण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अंगावरची शालही पुरत नाही. म्हणून कधी कधी प्रधानमंत्री या मंत्र्यांना शालजोडीने हाणतात. तरीही भाजप सरकारमध्ये वादग्रस्त विधान करणार्‍यासाठी मंत्र्यांमध्येच स्पर्धा लागलेली दिसून येते. याआधी (मनु) स्मृती इराणी या मंत्र्यानी भगवतगीता राष्ट्रीय ग्रंथ करा, असे विधान केले होते. 


त्या पाठोपाठ मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी आपल्या नावात सत्य असले तरी सत्याला न जागता असत्य असे वक्त्व्य केले. मानवी जीवनाचा डार्विनचा सिद्धांत खोटा ठरविण्यात सत्यपाल सिंह यांनी मागे पुढे पाहिले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्ही गाईंचे संरक्षण करु मात्र महिलांचे करु शकत नाही. असे वादग्रस्त विधान करुन पुन्हा एकदा आपल्याकडे लक्ष वेधून घेतले होते. त्याच नामावलीत आता गंग(गँग)वारची भर पडली आहे. 


गंग(गँग)वार तुमच्या जीभेला हाड आहे की नाही असेल तर आपण असे वादग्रस्त वक्तव्ये कसे काय करु शकता. हा देश निश्‍चितच मोठा आहे. देशाचा पसारा अवाढव्य असा आहे. त्यामुळे एका ठिकाणी घडलेली घटना दुसर्‍या ठिकाणी त्याची माहिती मिळेल याची काही शाश्‍वती नाही. परंतु आपण सत्तेवर आल्यास देशातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणे कर्तव्य आहे. 


मात्र सुरक्षा सोडाच देशातील प्रत्येक नागरिक असुरक्षित आहे. कारण या देशात कधी काय होईल याची काहीच कुणाला कल्पना नसते. कधी बॉम्बस्फोट, कधी रेल्वेचा अपघात, जाळपोळ, दंगल, बलात्कार, इमारती कोसळणे व आग लागणे यासारख्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे देशातील लोक सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 


आपण सुरक्षा करायची सोडून ज्यांना बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जायला लागले त्यांच्या वेदना काय असतील ते त्यांनाच ठाऊक. त्या वेदनांवर फुंकर घालण्याऐवजी आपण जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत आहात. हे आपल्यासारख्या एका वरिष्ठ मंत्र्याला शोभा देणारे नाही. 


भारतात दर १५ मिनिटाला लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. याचे धक्कादायक विश्‍लेषण पॉक्सोने केले आहे. गत दहा वर्षात लहान मुलांवरील अत्याचार ५०० टक्क्यांनी वाढले आहेत. २०१६ मध्ये १ लाख ६ हजार ९५८ इतके लहान मुलांवर अत्याचार झाले आहे. लैंगिक अत्याचार करण्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. देशात केवळ महिलाच नव्हे तर कोवळ्या मुलीही सुरक्षित नाहीत. 


आज जे अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. त्याला कारण लैंगिक शिक्षणाचा अभाव! आई-वडील असले तरी आपल्या मुलींबरोबर लैंगिक विषयावर चर्चा करताना दिसत नाही. कारण हा विषय म्हणजे एक प्रकारे मनामध्ये अपराधबोध निर्माण करतो. म्हणून कुणीही या विषयावर वाच्यता करताना दिसत नाही. लैंगिक अत्याचार करणार्‍यांमध्ये बुवा, बापू, खिसे कापू यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तुला नोकरीला लावतो, असे सांगून अनेक बुवा, बापू नको ते चाळे करताना दिसतात. 


आसाराम (हराम) बापूने तर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याचा दिवटा असलेला नारायण साई यानेही आसाराम (हराम) बापूचा कित्ता गिरवला. हे सर्व बुवा, बापू कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय शक्तीशी बांधील असतात. त्यामुळे त्यांचे कुठलेही वाकडे होत नाही. परिणामी दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. 


गंग(गँग)वार यांनी वादग्रस्त विधान करुन आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. आपण किती खुजे आहोत हे गंग(गँग)वार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येते. भाजप सरकारमधील वाचाळविरांचा गंग(गँग)वार हा देशाला खड्ड्यात घालणारा आहे. कारण कुठल्याही देशाची बौद्धीक क्षमता ही त्या देशाची मालमत्ता असते. परंतु मंत्रीच वादग्रस्त विधाने करुन देशाची प्रतिमा मलीन करताना दिसत आहेत. वाचाळविरांचा गंग(गँग)वार थांबला नाही तर देशाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. 


परंतु या मंत्र्यांच्या मेंदूतच काही नाही. मेंदूत ‘कु’ विचार असल्याने तोंडातून ओकारी येते. ही ओकारी वाचाळविर मंत्र्यांनी प्यावी, म्हणजे त्याचा दुर्गंध कसा आहे ते कळून चुकेल. म्हणून वक्तव्ये करत असताना तोल जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper