×

कोविंद साहेब! ब्राह्मणांसाठी भाटगिरी किती कराल

Published On :    23 Apr 2018
शेयर करा:


-



संस्कृत ही केवळ अध्यात्मक, दर्शनशास्त्र किंवा साहित्याच्या क्षेत्रात उपयोगी भाषा नाही तर यांत्रिक युगासाठी सर्वात उपयोगी भाषा आहे. गणित आणि यांत्रिक माहिती वाढण्यासाठी ती साहाय्यक आहे. संस्कृत अनेक भाषांची जननी आहे. 


ही ज्ञान आणि विज्ञानाची भाषा आहे, असे राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात बोलताना सांगितले. कोविंद साहेब तुम्ही ज्या विचारांच्या मुशीतून आला आहात त्यामुळे तुम्ही केलेले हे भाष्य तुमच्यासाठी व ब्राह्मणांसाठी ठीक आहे. परंतु तुमच्यासारख्या व्यक्तीने उचलली जीभ लावली टाळ्याला असाच प्रकार केला आहे. 


संस्कृत ही कुठल्याही भाषांची जननी होऊ शकत नाही. कोविंद साहेब ब्राह्मणांची किती भाटगिरी करणार आहात. याची काही तरी मर्यादा ठेवा. मात्र तुम्ही मर्यादाच ओलांडल्याने अशातर्‍हेचे वक्तव्य तुमच्या तोंडून आले आहे. 


संस्कृत अनेक भाषांची जननी आहे असे तुम्ही म्हणालात. तुमच्यासारख्या एवढ्या महत्त्वपूर्ण राष्ट्राध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला आमच्यासारख्या पामराने काय सल्ला द्यावा? परंतु सल्ला द्यायची वेळ तुम्ही आणली आहे. संस्कृत ही केवळ ३.५ टक्के लोकांची अर्थात ब्राह्मणांची भाषा आहे. 


या युरेशियन ब्राह्मणांनी भारतीय संस्कृतीवर आक्रमण केले. त्यावेळी येताना त्यांनी आपली संस्कृत भाषाही सोबत आणली. संस्कृतचा अर्थ संस्कार केलेली भाषा! ही भाषा केवळ ब्राह्मणांनाच माहीत आहे. ती जननी कशी काय असू शकते? संस्कृतच्याही अगोदर भारत देशाला अनेक भाषा आहेत. 


त्यामध्ये पाली, मागधी, अर्धमागधी, प्राकृत, मरहट्टी अशा अनेक भाषांचा संगम असलेला हा भारत देश! याच भाषांमधून भारताचा व्यवहार सुरु होता. परंतु आमच्या या मूलभूत भाषांवर ब्राह्मणांनी संस्कृत भाषा लादली. ज्या भाषेला आज जागतिक बाजारात कुठलेही?स्थान नाही. 


ब्राह्मणांनी आपले धर्म ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले. जेणेकरुन ही भाषा कोणालाही समजू नये. त्यामध्ये बहुजनविरोधी ओकलेली गरळ कुणालाही समजू नये. म्हणून जाणीवपूर्वक संस्कृतमध्ये लिखाण केले गेले. सिंधु घाटीची सभ्यता या पुस्तकात पी.एस.सदार यांनी भारतात संस्कृत भाषेच्या आधी अनेक भाषा बोलल्या जात होत्या. 


हे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले आहे. अभ्यासपूर्वक त्यांनी विश्‍लेषण केले आहे. त्यामुळे संस्कृत भाषा जननी नव्हेच भारतीय भाषांच्या जवळही पोहचू शकत नाही. आज संस्कृत भाषा ही आऊटडेटेड झाली आहे. संस्कृतचा मिजास मिरविणारी ब्राह्मणांची पोरं देखील आज संस्कृत शिकताना दिसत नाहीत. त्यांनी जागतिक ज्ञानाची भाषा असलेल्या इंग्रजीला जवळ केले आहे. 


कोविंद साहेब! संस्कृत जर जननी असेल मग ब्राह्मणांच्या मुलांनी संस्कृतला फाट्यावर मारत इंग्रजीला का जवळ केले. याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? कोविंद साहेब तुम्ही संघाच्या विचारातून पुढे आला आहात. संघाच्या पालखीचे भोई झाल्यामुळे तुम्हाला राष्ट्राध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर बसविण्यात आले आहे. नाही तर तुम्हाला कुणी कुत्रेही विचारले नसते हे लक्षात असू द्या. 


भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या कालखंडात पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला. भारतात तक्षशिला, नालंदा, उज्जैन सारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे पाली भाषेचे ज्ञान देत होती. एकंदरीत ज्ञानाचा व भाषेचा सत्ता केंद्र भारत होता. पाली भाषेमध्ये आपले लिखाण करावे, असा दंडक बुद्धांनी घालून दिला होता. 


त्यांनी आपल्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार पाली भाषेतून केला होता. परंतु ब्राह्मणांनी मुद्दामहून हा आदेश मोडला. ब्राह्मण कवी अश्‍वघोषाने संस्कृत भाषेत बुद्धचरित्रम हे काव्य लिहिले. जेणेकरुन बुद्धांच्या आंदोलनाला मूठमाती देण्यात येईल. 


त्यामुळे तथागतांचे मूळ विचार नष्ट केले गेले आणि आपल्याला हवे तसे विचार ब्राह्मणांनी संस्कृत भाषेच्या माध्यमातून घुसविले. परिणामी बुद्धांच्या पाली भाषेचेही विकृतीकरण केले गेले. त्यामुळे या देशामध्ये असलेली ही मूळ भाषा नष्ट झाली. 


पाली भाषेत ज्ञान दिले जात असल्याने विश्‍व विद्यापीठांमधील दोन ग्रंथालये जाळण्याचा प्रकारही ब्राह्मणांनी केला. हे जरा कोविंद साहेब तुम्हाला माहीत असेलच. तसेच संस्कृत भाषा शिकण्याची तुमच्या पूर्वजांनाही परवानगी नव्हती. त्यातूनच एखादा व्यक्ती संस्कृत शिकला तर त्याचे कान, नाक, जीभ कापले जाई. कानामध्ये तेल ओतले जाई. 


कातडी सोलण्यात येत असे. डोळे काढण्याचे प्रकार केले जात असत. एवढे अमानवी कृत्य ब्राह्मणांकडून त्याकाळी चालत असत. असे असताना कोविंद साहेब तुम्ही कुठल्या तोंडून संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याचे म्हणता? परंतु हे सांगण्याचे धाडस तुमच्याकडून कदापिही होणार नाही. कारण ब्राह्मणांची भाटगिरी करण्यातच तुम्ही हयात घालविली. 


म्हणूनच संस्कृत भाषा जननी आहे असे वक्तव्य तुमच्या तोंडून आले. या देशात दर ३० किलोमिटरला भाषा बदलते. प्रत्येक भाषेचा लहेजा आणि तोल वेगवेगळा असतो. म्हणूनच आज देशामध्ये संस्कृत सोडून अनेक भाषा टिकून आहेत. या सर्व भारतीय भाषांना एकाच सूत्रात बांधले गेले आहे. 


संस्कृत ही भारतीय भाषा नाही. ती युरेशियन ब्राह्मणांची भाषा आहे. याचा अर्थ ती परकीय भाषा आहे. म्हणून संस्कृतसारखी भाषा आमच्या लोकांवर थोपविण्याचा प्रयत्न करु नका. तुमची संस्कृतसारखी विकृती तुमच्याकडेच ठेवा. 


नाही तर मूलनिवासी बहुजन समाज आज जागा होताना दिसत आहे. त्याला संस्कृती काय आणि विकृती काय याची जाणीव होत आहे. त्यामुळे संस्कृतच्या या विकृतीला ठेचायलाही कमी करणार नाही. हे लक्षात असू द्या. एवढाच आमचा सांगावा आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper