×

मूलनिवासींनो! पेटवा क्रांतीच्या मशाली

Published On :    24 Apr 2018
शेयर करा:


-



महिलांवर वाढणारे लैंगिक अत्याचार, असुरक्षितता, जाळपोळ, दंगल, बॉम्बस्फोट यासारख्या घटनांना सामोरे जाताना भारतात सरकार आहे की नाही अशी शंका येते. त्यातच आरएसएस नावाच्या बांडगुळाने मूलनिवासी बांधवांवर गुलामी लादली आहे. 


समतामूलक संविधानाने सर्वांना अधिकार दिले ती घटना बदलण्याचे कारस्थान मोहन भागवतच्या डोक्यात वळवळत आहे. म्हणून नेहमीच घटनाविरोधी वक्तव्य करण्याचा परिपाठ भागवत पुराणातून मांडला जात आहे. जर घटनाच शाबूत राहिली नाही तर आपल्यासमोर जगण्यामरण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. म्हणून मूलनिवासींनो क्रांतीच्या मशाली पेटवा. या क्रांतीच्या मशालीच तुम्हा आम्हाला गुलामीतून मुक्त करणार आहेत. 


सर्व प्रकारच्या परिवर्तनाचे मूळ विचार परिवर्तन आहे. असे विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. मग प्रश्‍न निर्माण होतो की परिवर्तन नक्की होणार तरी कसे? युरोपमध्ये जॉन स्टुअर्ड मिल नावाचा विचारवंत होऊन गेला. 


जॉन स्टुअर्ड मिल म्हणतो जर तुम्हाला परिवर्तन हवे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला लोकांच्या विचारामध्ये, विचार करणार्‍या पद्धतीत मूलभूत परिवर्तन केले पाहिजे. जर समाजात मूलभूत परिवर्तन होत असेल तर प्रश्‍न निर्माण होतो की लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत परिवर्तन कोण करु शकतो. विचारामध्ये परिवर्तन करण्याचे कार्य विचारच करतो. 


एक विचार बदलण्याचे काम दुसरा विचार करतो. म्हणून सर्व प्रकारच्या परिवर्तनाचे मूळ विचार परिवर्तन आहे. याच विचार परिवर्तनाची नांदी आज दुमदुमत आहे. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात विचारांची पेरणी केली जाणार आहे. 


तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, जगद्गुरु संत तुकोबाराय, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पेरियार ई रामासामी, संत गाडगे बाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दीनाभाना, डी.के.खापर्डे, मान्यवर कांशीराम यांच्या सकस विचारांचा वारसा घेऊन आज वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून विचारांचा जागर सार्‍या देशभर गेली ४० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. 


नवनवीन आव्हाने असताना देखील त्याला सामोरे जात महापुरुषांचा विचार घेऊनच हा परिवर्तनाचा एल्गार सुरु आहे. त्यामुळेच ब्राह्मण-बनिया मीडिया याची दखल घेत नसली तरी आतमध्ये जो लाव्हारस आहे तो केव्हाही उफाळून येऊ शकतो. 


त्याला कारण केवळ विचार परिवर्तन! आरएसएसच्या वळवळणार्‍या किड्यांना ठेचण्याचे काम याच महापुरुषांच्या विचाराद्वारे सुरु आहे. त्यामुळे मूलनिवासींच्या ओळखीखाली आज एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, धर्मपरिवर्तीत अशा सर्व जाती समूह असलेल्या ८५ टक्के लोकांना घेऊन विचारांची ज्योत प्रज्वलित केली जात आहे. म्हणून महाराष्ट्रातील परिवर्तन यात्रा ही देशातील परिवर्तनाची नांदी ठरेल यात कुठलीही शंका नाही. 


ब्राह्मणवाद ही सुद्धा एक विचारधारा आहे. ब्राह्मण दिसतो, परंतु ब्राह्मणवाद दिसत नाही. जे दिसत नाही त्याच्यावर चाकू, सुरी किंवा बंदुकीची गोळी कशी चालवणार? विचार जर चुकीचा आहे, विषमतेचा असेल, अन्यायाचा असेल, गुलामीचा असेल, भांडण उभ करणारा असेल तर हा विचार संपविण्यासाठी तुमच्याकडे समतेचा विचार असला पाहिजे. 


बंधुत्वाचा, न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा विचार असला पाहिजे. हा स्वातंत्र्य व समतेचा विचार घेऊन परिवर्तन यात्रेने एल्गार पुकारला आहे. आज ब्राह्मणांनी नवनवीन आव्हाने निर्माण केली आहेत. खुलेआमपणे महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. 


शेतकर्‍याला देशोधडीला लावले जात आहे. बँका लुटल्या जात आहेत. आरक्षण विरोधात हाकाटी, शिक्षणाचे खाजगीकरण, एसईझेड, सीमएझेड व भूमी अधिग्रहणसारखे नियम लादून शेतकरी संपविला जात आहे. 


बेरोजगारीत वाढ, महागाई, इंधनाचे वाढते दर अशा अनेक समस्यांनी आज मूलनिवासी समाज त्रस्त झालेला आहे. त्याला कारण या देशातील ब्राह्मणवाद! या ब्राह्मणवादानेच एकेकाळी समृद्ध असलेला हा देश रसातळाला नेला. आरएसएससारख्या संघटनेकडून हिंदुत्ववादी फुत्कार सोडले जात आहेत. 


या देशातील कोणीही हिंदू नसताना जबरदस्तीने त्यांना हिंदुत्वाचे बाळकडू पाजले जात आहे. यामागे ब्राह्मणांची मोठी चाल आहे. ती चाल उघड करण्याचे काम बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सुरु आहे. म्हणूनच ही आश्‍वासक पावले पडत असताना आपण आरएसएसच्या पिलावळीला ठेचायलाच हवे. 


त्यासाठी एकजुटीने व एकविचाराने महापुरुषांच्या विचारांची वज्रमूठ आवळूया आणि या विदेशी ब्राह्मणांना पळताभुई थोडी करण्यासाठी क्रांतीच्या मशाली पेटवूया असे परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आवाहन करत आहोत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
धक्कादायक! कर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव
नागपुरात ३० हून अधिक निवासी डॉक्टरांना गॅस्ट्रोने पछाड
भडका! देशात इंधनाने गाठला उच्चांक
कामगारांच्या पत्राशेडमध्ये सापडल्या ईव्हीएम मशीन
सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल, युद्धही लादेल
कर्नाटक मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला!
नीरव मोदी, मेहुल चोकसीविरोधात इंटरपोलकडे धाव
भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी पैसे हिसकावून फाडत फेर
लोकशाहीचा आदर आहे मग बहुमत चाचणीस सामोरे न जाता पळ का काढ
राजनाथ सिंह यांच्यासाठी २० गावे १२ तास अंधारात
१२ हजार ७०० कोटींचा घोटाळा करणारा नीरव मोदी लंडनमध्ये
येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराच
राज्यपाल वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी
अडीच दिवसांचा गणपती
फेक न्यूजचे समूळ उच्चाटन गरजेचे
२८ मे रोजी होणार मराठा आरक्षण सुनावणी
कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
४० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर अस
दिवसाला एक कोटी घेणारे मोठे वकीलही मूग गिळून गप्प असतात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper