×

ज्ञानाची दिवाळखोरी

Published On :    25 Apr 2018
शेयर करा:


-



देशभरात २४ विद्यापीठे बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा विद्यापीठ अनुदान आयोगाने केला आहे. दिल्लीमध्ये ८ विद्यापीठे असून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बोगस विद्यापीठांचा भरणा अधिक आहे. ही बोगस विद्यापीठे निर्माण होतात कशी? याचा अर्थ कुंपणच शेत खात आहे.


विद्यापीठे बोगस असतील मग ज्ञान कसे असेल? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. विद्यापीठ या शब्दाचा अर्थ विद्येचा पीठ! ज्ञानाची महती सांगणारा असा हा शब्द. मात्र आड्यात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार अशी आजची शिक्षण व्यवस्था आहे. विद्यापीठांवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियंत्रण असते. 


देशभरात २४ बोगस विद्यापीठे निर्माण होत असेल तर त्यांना परवानगी कशी काय दिली गेली? त्याबाबत नियम व अटीचे पालन का गेले नाही. कुणी परवानगी दिली. याचा अर्थ टेबलाखालून निश्‍चितच रक्कम पोहोचली असेल, असा अर्थ निघतो. 


म्हणूनच सरसकट परवानगी दिली गेली. आज जागतिक स्तरावर ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजीला स्थान दिले गेले आहे. त्यामुळे अनेकांनी इंग्रजीला जवळ केले आहे. परंतु बोगस विद्यापीठे निर्माण करुन विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या पंगू बनविण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्थेकडून सुरु आहे. आज शाळा, विद्यार्थी, शिक्षक, इमारती आमच्या असल्या तरी शिक्षण आमचे नाही. 


या शिक्षणावर पूर्णतः ब्राह्मणांचे नियंत्रण आहे. या शेंडीने बहुजनांचा गळा कापला आहे. म्हणूनच आज शिक्षण संपलेलं आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदींनी मनुष्यबळ विकास मंत्रीपदावर (मनु)स्मृती इराणी या बाईची वर्णी लावली होती. परंतु या बाईंनी काहीच काम न करता केवळ स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात कसे राहता येईल याकडे लक्ष दिले. 


कुठल्याही प्रकारे शिक्षण विषयक सकारात्मक दृष्टीकोन या बाईंमध्ये दिसला नाही. म्हण्ाून नको ती थेरं त्यांनी केली. त्यातच बोलघेवडेपणा हा (मनु)स्मृती इराणींच्या पाचवीला पुजला होता. भगवतगिता राष्ट्रीय ग्रंथ करा, अशी गरळ या बाईने ओकली. यावर देशभरात काहूर माजला होता. त्यामुळे त्यांना पदावरुन हटविण्यात आले. 


दरम्यानच्या कालखंडात प्रकाश जावडेकर या पुणेरी ब्राह्मणाला मनुष्यबळ विकास खाते देण्यात आले. परंतु नावात जरी प्रकाश असला तरी या खात्यावर प्रकाश पाडण्यास त्यांना यश आले नाही. अंधारातच सर्वांना चाचपडायला लावणारे निर्णय घेतले. त्यामुळे दिवसेंदिवस शिक्षणाची वाताहत होताना दिसत आहे. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये एक चित्रपट येऊन गेला. 


त्या चित्रपटाचे नाव शिक्षणाच्या आयचा घो! या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटात शिक्षणाची पोलखोल करण्यात आली होती. अशीच परिस्थिती आज देशभरात ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. जास्त गुण मिळविणारा हुशार आणि कमी गुण मिळवणारा ‘ढ’ अशी जी व्याख्या केली आहे तीच चुकीची आहे. 


ही ब्राह्मणांच्या डोक्यातून आलेली व्याख्या आज तिलाच आपण कुरवाळताना दिसत आहोत. प्रत्येक पालक शिक्षण म्हणजे काय? शिक्षण का घ्यायला हवे? शिक्षण कशासाठी घ्यायला हवे? शिक्षणाचा उपयोग काय? यावर कुठल्याही प्रकारे विचार करताना दिसत नाही. हे वरवरचे शिक्षण जीवनात कसे सामोरे जावे यावर मंथन केले जात नाही. खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतात ते शिक्षण. 


अशी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी व्याख्या केली होती. परंतु फुले यांचे शिक्षण हे समाजाचे भान जपणारे होते. म्हणून त्यांच्या शाळेत शिकलेली वस्ताद लहूजी साळवे यांची नात मुक्ता साळवे हीने चिकित्सक प्रश्‍न विचारत हिंदू आमचा धर्म नाही. असे सांगत ब्राह्मणांच्या थोबाडावर आपले विचार फेकून मारले होते. असे शिक्षण राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या शाळेत दिले जात होते. 


परंतु आजचे शिक्षण हे ना कुठल्याही कामाचे ना धामाचे. केवळ ब्राह्मणांची हुजरेगिरी करणारे आहे. म्हणूनच बोगस विद्यापीठांच्या नावाखाली शिक्षणाचा सुळसुळाट सुरु झाला आहे. अशा विद्यापीठातून दिले जाणारे शिक्षण कुठल्यातर्‍हेचे असेल याची कल्पना केलेली बरी. शिक्षण म्हणजे शिक+क्षण. क्षणाक्षणाला चांगले शिकणे. चांगल्या गोष्टी अंगीकारणे असा होतो. 


परंतु चांगले शिकणे जाऊदे नको ते शिक्षण आज मिळत आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण करुन एकमेकांमध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यातच स्पर्धा परीक्षेत बहुजनांची मुले पुढे जात असल्याने त्यावर अडथळा आणण्यासाठी नीट, सेट नेट सारख्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यातच सर्व मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती कमी करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. 


त्यामुळे पुढे शिकावेसे नको असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर निर्माण होतो. त्याचबरोबर संस्थाचालकांचा फीवाढीचा मनमानीपणा सर्वांच्या जीवावर आला आहे. म्हणून शिक्षण घ्यावे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याला कारण सर्वस्वी या देशात पोसलेला ब्राह्मणवाद! या ब्राह्मणवादाने आमच्या बहुजनांची डोके भडकवली आणि दंगलीच्या तोंडी दिले. 


परंतु याच ब्राह्मणांचा मुलगा स्वतः मात्र परदेशात जाऊन इंग्रजी माध्यमात शिक्षण घेताना दिसतो. म्हणून शिक्षणामध्ये रुजलेला ब्राह्मणवाद हा भारतीय व्यवस्थेला लागलेली किड आहे. ही किडीचा नायनाट केल्याशिवाय तरणोपाय नाही. हा ब्राह्मणवाद ठेचण्यासाठी देशातील ८५ टक्के बहुजनांनी एकत्र येऊ या असे सांगावेसे वाटते.


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper