×

आसा(ह)राम बलात्कारी बापू आणि खिसेकापू

Published On :    26 Apr 2018
शेयर करा:


-



अल्पयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जोधपूर विशेष न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आसा(ह)राम बापू आणि खिसेकापूंची रंगील्यालिला पाहिल्यास या देशाला त्यांनी घेरल्याचे जीवंत वास्तव समोर आले आहे. रंगील्यालिलांबरोबर त्यांनी करोडोंची माया जमा करुन अनेकांना या मायाजाळात फसविले आहे. धर्माच्या मुखवट्याखाली दडलेला हा छुपा ब्राह्मणवाद आहे. त्याचेच हे प्रचारक आहेत. त्यामुळे देशात बुवाबापू खिसेकापूंचे पीक आले आहे. 

ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करुनी म्हणती साधू ॥

अंगा लावुनिया राख | डोळे झांकुनि करती पाप ॥

दावुनि वैराग्याची कळा | भोगी विषयांचा सोहळा ॥

तुका म्हणे सांगो किती | जळो तयांची संगती ॥


अशा कठोर शब्दात जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी भोंदूबाबांवर प्रहार केले आहेत. याच भोंदूबाबांच्या नामावळीत आसाराम बापूसह गुरमित राम रहीम सिंग इन्सान, स्वामी प्रेमानंद, संत रामपाल, स्वामी अमृत चैतन्य, स्वामी सदाचारी, स्वामी नित्यानंद, इच्छाधारी संत स्वामी भीमानंद, नारायण साई याच्यासह शेकडो बुवाबापूंचा समावेश आहे. 


अक्षरशः बुवाबापूंनी लैंगिक अत्याचाराचा हैदोस घातला आहे. यातील अनेकांवर गुन्हे दाखल असून त्यांना अटकही झाली आहे. आज सर्व प्रसार माध्यमांवर ब्राह्मणांनी वर्चस्व मिळविले आहे. या प्रसार माध्यमांमधील पारंपारिक मीडिया (ट्रॅडिशनल मीडिया) यामध्येही ब्राह्मणांचे कोणीही हात धरु शकत नाही. याच पारंपारिक मीडियात बुवा-बापूंनी नंगानाच सुरु केला आहे. 


एकंदरीत या भोंदू बुवाबापूंनी ब्राह्मणी विचारधारेच्या प्रचारकाची भूमिका निभावली आहे. म्हणूनच या भोंदूविरोधात अनेकदा गुन्हे दाखल होऊनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम राजकीय नेत्यांकडून केले जाते. कारण ब्राह्मणी व्यवस्थेचे प्रचारक असल्यामुळे त्यांना कोणीही हात लावत नाही. 


या बुवाबापूंचे प्रताप पाहिले तर संवेदनशील माणसाची मान शरमेने खाली जाते. परंतु या बुवाबापूंनी लाजच भाजून खाल्ली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार करताना सीमा राखली जात नाही. आसा(ह)राम बापूने तर कहरच केला. आपल्या त्या अल्पवयीन शिष्य असलेल्या मुलीला कक्षात बोलवून लैंगिक अत्याचार केले. 


तिला बाधा झाली आहे आणि बापूंच्या ‘खास प्रसादा’ने ती दूर होईल, असे सांगत आसा(ह)रामच्या महिला सहकार्‍याने या मुलीस बाबाकडे जाण्यास भरीस पाडले. हे घृणास्पद कृत्य येथेच संपत नाही. त्यानंतर या मुलीने तक्रार दाखल करु नये?म्हणून?त्याने जंग जंग पछाडले. अनेकांनी धमकावले. काही साक्षीदारांना ठारही मारले. 


कुठलीही शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नाही. परंतु बुवाबाजीच्या नावाखाली अनेक भोंदूबाबांनी हजारो कोटींची संपत्ती जमा केली. ठिकठिकाणचे बांधलेले आश्रम हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे अड्डेच बनले आहेत. आसा(ह)रामने गेल्या चार दशकात १० हजार कोटींची संपत्ती जमविली. भल्या भल्या उद्योगपतींनाही हे जमले नाही. ते आसा(ह)रामसारख्या बापूने करुन दाखविले. या बुवाबापूंच्या जुमलेबाजीला अनेकजण फसत आहेत. बुवा, बापू, बाबा, मॉ, माताजींचे पीक या देशात आलेले आहे. 


कोणी आपल्या भक्तास मिठीतून प्रसाद देते, कोणी लत्ताप्रहारात आशीर्वाद देते, कोणी स्वतःला कॉम्पुटरबाबा म्हणून घेते, कोणी नुसताच भय्यू तर कोणी बीगबॉससारख्या भिकारोत्तम कार्यक्रमात सहभागी होत महिलांच्या अंतरर्वस्राचा बँ्रड बाजारात आणतो. या भूलभलैय्याला फसून आपली बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट केली आहे. 


सत्संगच्या नावाखाली रंगील्यालिलांनी कहरच केला आहे. आसा(ह)राम बापू कृष्णाचा अवतार मानत असे. त्याने अनेक लिला सादर केल्या. तो ज्या मुलीवर टॉर्च मारत असे त्या मुलीला शयनगृहात बोलवित असे आणि लैंगिक अत्याचार करत असे. एवढ्यामोठ्या अवाढव्य देशात बुवाबापूंचे पीक आले त्याला कारण राजकीय नेत्यांनी दिलेले पाठबळ! अनेक राजकीय नेते या बुवाबापूंच्या पाया पडताना दिसतात. त्यामुळे त्यांचे अधिक फावते. 


मूलनिवासी संतांनी सद्सद् विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि ज्ञानाला शरण जा, असे सांगितले होते. परंतु हा विज्ञानवादी दृष्टीकोन बाजूला सारुन ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन करत अंधश्रद्धा विषयक माहिती देण्यास या बुवाबापूंनी सुरुवात केली. त्याच अंधश्रद्धांना भुलून येथील विज्ञानवादी विचार विसरुन समाज अधिक गुरफटत गेला. तर अशक्त राजसत्ता आणि बेगडी धर्मसत्ता यामध्ये समाज आपले भान विसरला. 


त्यामध्ये समजाचे पूर्णपणे सँडविच झाले. विज्ञानवादी विचार, विवेकी मार्ग, तर्काची कास धरण्याऐवजी पुराणातील सडक्या वांग्यांना पुजनिय मानल्याने आज ही अवस्था निर्माण झाली आहे. परंतु पुराणातील वांग्यांचे हे तण छाटण्यासाठी ब्राह्मणवाद संपवावा लागेल. तरच बुवाबापूंचे आलेले पीक नष्ट होईल. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper