×

भाजपाच्या कळलाव्या नारदमुनींना आवरणार कोण?

Published On :    30 Apr 2018
शेयर करा:


-



नारदमुनी म्हणजे प्राचीन काळातील गुगलच अशा प्रकारची मुक्ताफळे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी उधळली आहेत. गुगलला ज्याप्रकारे संपूर्ण जगाची माहिती आहे तशाचप्रकारे नारदमुनींना संपूर्ण जगाची माहिती असायची. या भाजपमधल्या कळलाव्या नारदमुनींना आवरणार कोण? असा प्रश्‍न सर्व भारतीय जनतेला पडला आहे. 


२०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून बोलघेवड्या अर्थातच कळलाव्या नारदमुनींची संख्या वाढली आहे. प्रत्येक दिवसाआड कुणी ना कुणी वादग्रस्त वक्तव्य करुन स्वतःसह पक्षालाही अडचणीत आणत आहेत. या सरकारने फक्त बोलघेवडेपणाच केला. 


म्हणून न खाऊंगा ना खाने दुंगा अशा म्हणणार्‍या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नाकासमोर विजय माल्ल्या, निरव मोदी, मेहूल चोक्सी यासारखी उद्योजक परदेशी पळून गेले. प्रधानमंत्री बोलघेवडे मग त्यांची टीम कशी असेल? प्रधानमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक मंत्र्यांनी वाचाळविरांची पात्रे चांगलीच रंगविली आहेत. 


आता तर विजय रुपानी यांनी नारदमुनींना प्राचीन काळातील गुगलच संबोधून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. हा कळलाव्यांचा ‘विजय’ उन्माद तेवढ्यावरच थांबत नाही तर या कळलाव्या नारदमुनींच्या यादीत केंद्रातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री यांचा समावेश आहे. 


याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी महाभारत काळात इंटरनेट होते. असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी इंटरनेटचे कनेक्शन कळलाव्या नारदमुनींच्या शेंडीतून आले असावे, असा तर्क केला तर वावगे ठरु नये. 


गुगलने आपली छाप पूर्ण जगावर टाकली आहे. त्यामुळे क्षणात कुठलीही माहिती गुगलच्या माध्यमातून मिळते हे खरे आहे. गुगलबाबा तुम्ही आता आलात. त्यामुळे तुमच्याकडचा साठा निश्‍चितच कमी असेल. परंतु विजय रुपानी यांनी सांगितल्याप्रमाणे नारदमुनींचा कळलावण्याचा साठा निश्‍चितच जास्त असेल. 


कारण कळलाव्या नारदमुनी हा कळ लावतच फिरत होता. त्याच्याच वंशाचे असलेले आजचे नारदमुनी कळ लावत फिरत आहेत. मुनीचा दुसरा अर्थ ब्राह्मण होतो. म्हणूनच आपल्या पूर्वजाचे कळ लावण्याचे उद्योग ब्राह्मणांनी आजही सोडलेले नाहीत. 


भाजपमधल्या नारदमुनींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री असलेले डॉ.हर्षवर्धन यांनीही स्टिफन हॉकिंग यांच्या मृत्यूनंतर हास्यास्पद विधान केले होते. ब्रह्मांडाचा अभ्यास करणार्‍या हॉकिंग यांनी वेदांमध्ये असलेला सापक्षवादाचा सिद्धांत आईनस्टाईन यांच्या सापक्षवादापेक्षा चांगला असल्याचे म्हटले होते. 


नावात सत्यपाल असले तरी नेहमीच असत्य बोलणारे डॉ.सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा मानव उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा ठरविला होता. या सर्वांचा बाप असणारे मोहन भागवत यांनी वेदांमध्येच विज्ञान दडलेले आहे, असे तुणतुणे वाजविले होेते. 


(मनु)स्मृती इराणी या स्वतःची स्मृती गेल्याप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य करत असतात. भगवतगिता हा राष्ट्रीय ग्रंथ करा, असे अकलेचे तारे स्मृती इराणी यांनी तोडले होते. भगवतगिता हे असमानता दर्शक पुस्तक आहे, असे असूनही अशाप्रकारचे वक्तव्य करुन आपण लोकांना कुठल्या दिशेने नेत आहोत याचा पायंडा पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 


परंतु वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न गुंडाळून ठेवला. दोन दिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्यांचे स्वामी असलेले सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठ हे आतंकवादाचा अड्डा असल्याचे म्हटले होते. यावरही वादंग निर्माण झाले. 


देशात बलात्कारासारख्या मोठमोठ्या घटना घडत असूनही त्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपमध्ये अनेक वाचाळवीर आहेत. 


गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनीही वाचाळवीराची भूमिका चांगलीच निभावली आहे. त्यांनी कालच्याच सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण व श्रीकृष्ण ओबीसी होता असे सांगितले होते. ही सर्व वादग्रस्त वक्तव्य पाहता भाजपमध्ये वाचाळवीरांचे तोंड कुणी धरणारे नाही. 


आपण काय वक्तव्य करत आहोत याची जराशीही या लोकांना चाड नाही, भान नाही. बेफामपणे उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारे वक्तव्ये केली जात आहेत. या वक्तव्याचा भारतीय समाज मनावर काय परिणाम होईल याचा बिलकुलही विचार केला जात नाही. 


केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहणे एवढेच एकमेव काम या कळलाव्या नारदमुनींसमोर असते. मग ती प्रसिद्धी कुठल्याही प्रकारे येवो यासाठी या लोकांचा आटापिटा चाललेला असतो. या लोकांनी आपली बौद्धीक दिवाळखोरी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करुन दाखवून दिली आहे. 


म्हणूनच गेल्या चार वर्षात मोदी सरकारने बोलघेवडेपणा हे एकमेव काम केले आहे. त्या पलिकडे अनेकांचे प्रश्‍न मार्गी न लावता तसेच प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपमधल्या या कळलाव्या नारदमुनींना आवरणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 


या नारदमुनींना आवरले नाही तर सर्व भारत देशात कळलावण्यासाठी स्पर्धा सुरु होईल, तशी ती स्पर्धा सुरु झालीच आहे. यापासून सर्व मूलनिवासी बहुजनांनी सावध व्हावे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही
१०० च्या नव्या नोटेमुळे तब्बल १०० कोटींचा फटका
बिहारमध्ये अनु जाती, जमातींना बढतीत आरक्षण
मातंग समाजाचा ‘मूक हुंकार’
मोदी जितके लोकप्रिय होतील तितक्या हिंसक घटना वाढतील
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी मारल्या २ हजार
‘मराठा समाजाला आरक्षण मिळणार याची खात्री काय?’
सरकारविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू
देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर
‘राफेल’चा तपशील जाहीर करता येणार नाही
गौरी लंकेश हत्या प्रकरणात सात संशयितांना अटक
मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करतात
अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करणारा भोंदू बा
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांना के
मालवाहतूकदारांचे देशव्यापी चक्काजाम आंदोलन
देशात आणीबाणीची परिस्थिती. -राज ठाकरे.
न्यायालयीन प्रकरणातील फायली गहाळ?
मोदींचा ४ वर्षात परदेश दौर्‍यावर १ हजार ४८४ कोटींचा खर्च
मराठा क्रांती मोर्चाने केले वाशीत ठिय्या आंदोलन
हजारो कोटी खर्चूनही गंगा मैलीच?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper