×

मातेचे दूध आणि प्रदूषणाचा विळखा

Published On :    3 May 2018
शेयर करा:


-



हवेचे प्रदूषण आणि औद्योगिकीकरण व शेतीसाठी वापरलेल्या किटकनाशकामुळे भारतातील आयांचे दूध अशुध्द बनले आहे. त्यामुळे बाळाच्या आरोग्यासाठी ते धोकादायक असल्याचे चित्र आहे. असा अहवाल जागतिक कृषी संघटनेने दिला आहे. औद्योगिकीकरणामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हा अहवाल चिंता वाढवणारा आहे.


माता आणि बाळ हे अतुट असे नाते आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला वाटते की, घरी कोणीतरी पाहुणा यायला हवा. परंतु सध्या धकाधकीच्या जीवनात तशा प्रकारच्या योग जुळेलच असे नाही. परिणामी ज्यांना मुल झाले आहे त्यांनी आपल्या बाळाचे संगोपन करणे गरजेचे आहे. 


परंतु हवेचे प्रदूषण आणि औद्योगिकीकरण व किटकनाशकामुळे भारतातीय आयांचे दूध अशुध्द बनले आहे. हा अहवाल निश्‍चितच धोकादायक आहे. आज सार्‍या देशाला हवेच्या प्रदूषणाने घेरले आहे. औद्योगिकीकरण जागोजागी होत आहे. किटनाशकांचा वापर वाढला आहे. 


परिणामी नैसर्गिक असे काहीच मिळत नाही. कारण आपण निसर्गावरच अतिक्रमण करत आहोत. परिणामी निसर्ग आली जागा दाखवत आहे. शेती ही नैसर्गिकरितीने झाली पाहिजे, परंतु त्यावर भरमसाठ किटकनाशकांचा वापर वाढला आहे. शेतीतील अन्न आपण खातो त्यामुळे रासायनिक घटक आपल्या शरिरात मोठ्या प्रमाणात जातात. 


त्याचाच परिणाम महिलांच्या दुधावर होत आहे. तलाव, नदी, समुद्र, भूगर्भातील पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. जागतिक प्रदूषणात भारताची अनेक शहरे आज आघाडीवर आहेत. त्यात मुंबई, चेन्नई, कोलकात्ता व दिल्लीसारखी महत्वाची शहरे प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहेत. 


दिल्लीत तर सर्वाधिक प्रदूषण आहे. या प्रदूषणाच्या विळख्यात भारत केव्हा सापडला त्याचा मागमूसही नाही.औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जी काही थेरं चालली आहेत त्यामुळे हिरवीगार झाडे तोडून त्यावर टॉवरच्या टॉवर उभारले जात आहेत. परिणामी स्वच्छ हवा मिळण्याऐवजी प्रदूषित हवा घ्यावी लागत आहे. 


औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणारे पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नद्याही व तलाव प्रदूषित होत आहेत. परिणामी या रासायनिक प्रदूषणामुळे फार मोठ्या आव्हानांना  सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र त्याचाही बोजवारा उडाला आहे. 


रासायनिक कारखानदारीमुळे तर प्रदूषणात अधिकच भर पडली आहे. प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करावी असे सीईटीपीसारखे प्रकल्प केले जातात. परंतु त्या सांडपाण्यावर प्रक्रिया होते का? असा खरा मुद्दा आहे. सॅनिटेशनचे व्यवस्थापन नाही. परिणामी अशाप्रकारच्या डोकेदुखीला सामोरेजावे लागते. रासायनिक सांडपाण्यामुळे मच्छिमारी समाप्त झाली. 


येथील मुलनिवासी असलेला मच्छिमार देशोधडीला आहे. त्याला पूर्वीसारखी मच्छी मिळत नाही. पूर्वी पापलेट, सरंगा, सुरमई, कोळंबी यासारखी चांगली व मोठ्या प्रमाणात मच्छी मिळत असे, मात्र आता तो सिलसिला कमी झाला आहे. आताच्या मच्छीला पटकन कुबट वास येतो, त्याला कारण खाडीमध्ये सोडण्यात येणारे रासायनिक पाणी. त्यामुळे त्याचा परिणाम मच्छिमारीवर होत आहे. मच्छिमार बांधव देशोधडीला लागला आहे.


जागतिक पर्यावरणाचे भान सर्वांनी राखले पाहिजे. परंतु भान राखताना दिसत नाही. आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे फार मोठा धोका जगाला निर्माण झाला आहे. जर हवा चांगली असेल तर ठिक नाहीतर प्रदूषित हवेचे श्‍वसन केल्याने श्‍वसनाचे विकार, दमा यासारखे आजार बळावतात. होणारा परिणाम धोकादायक असल्याने यावर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु सत्तेवर आलेल्या कुठल्याही सरकारने कठोर पावले उचललेली नाहीत. 


एकच दिवस वृक्षदिंडी काढून सोपस्कार पार पाडले जातात. त्याशिवाय काहीच केले जात नाही. जगतगुरू संत तुकाराम महराज यांनी म्हटले आहे की, वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती.....! खरंच या ओळी किती आजही सार्थक आहेत. वृक्ष व वेली तुम्हांला स्वच्छ हवा देतात. स्वच्छ हवा आपला जीव की प्राण असतो. मात्र झाडे लावण्याचे सोडाच उलट किटाच्या नावाखाली जंगल उघडे-बोडके केले जात आहेत. 


बिनदिक्कतपणे जंगलतोड सुरू आहे. त्याचा परिणामही आरोग्यावर होत आहे. यावर ना वनखाते काम करत ना कृषी खाते. केवळ भारतच नव्हे तर चीन, ऑस्ट्रेलिया, युरोपीय खंडातील देश व अमेरिकेसारखा देशलाही ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या जगाला भेडसावत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विचाविनिमय व्हायला हवा. नाहीतर उद्या हवेसाठीही युध्द व्हायला वेळ लागणार नाही. 


कारण स्वच्छ हवा असेल तर माणूस तग धरू शकतो. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संभवू शकतात. म्हणून मानवी जीवन वाचवायचे असेल तर वृक्षवल्ली आम्हां सोयरे हा मंत्र जपून प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकर्‍यांचाही विरोध
अमित शहांचे मनसुबे उधळवून लावणारे मंत्री शिवकुमार ‘ईडी
हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांवर सोशल मीडियातून टीका हा ग
तुझा पाय तोडेन
ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती
राज्यावर भारनियमनाचे सावट
महागाईचा पुन्हा भडका
राष्ट्रीय परिवर्तन यात्रेला ब्रम्हादेखील रोखू शकत नाही
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper