×

नाव आठवले मात्र महापुरूषांचा संघर्ष विसरले...!

Published On :    5 May 2018
शेयर करा:


-



केंद्रीय समाजकल्याणराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आर्थिक आधारावर आरक्षण दिले गेले पाहिजे असे वक्तव्य केले आहे. आठवले आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलू लागले आहेत. आठवलेजी.....! तुम्हांला जे मंत्रीपद मिळाले आहे ना त्यापाठीमागे १८४८ ते १९५६ या १०८ वर्षे महापुरूषांचा संघर्ष आहे. म्हणूनच तुम्हांला कधी राखीव जागांवरून निवडून आणले गेले होते. तुम्ही महापुरूषांचा संघर्ष विसरलात म्हणूनच अशाप्रकारची भाषा करत आहात. 


आरक्षण म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे लागेल. आरक्षण म्हणजे देशाच्या सकल उत्पन्नातील वाटा आहे. त्या काही कुबड्या नाहीत. आरक्षण हा शब्दच चुकीचा आहे, त्याला विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पर्याप्त प्रतिनिधीत्व असे म्हटले आहे. पर्याप्त प्रतिनिधीत्वाची पहिली मागणी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी केली होती. 


त्यानंतर करवीर संस्थानात छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ मध्ये त्याची अंमलबजावणी केली. त्यांनी शिक्षणात व नोकर्‍यात त्यावेळी आरक्षण दिले होते. त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी संविधानात त्याची तरतूद केली. भारतीय संविधानात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असा कुठलाही उल्लेख नाही. आपण जर आर्थिक निकषावर आरक्षण द्या असे म्हणत असाल तर तुम्ही संविधानाविरोधात काम करत आहात असा निष्कर्ष निघतो.


पर्याप्त प्रतिनिधीत्व (आरक्षण) तीन प्रकार आहेत. शिक्षणातील आरक्षण, सेवेतील-नोकर्‍यातील आरक्षण आणि राजकीय आरक्षण. शिक्षण आणि सेवेतील आरक्षणाला कालमर्यादा नाही. कारण आजही जातीव्यवस्थेची मूळे घट्ट रूजलेली आहेत. राजकीय आरक्षणाला मात्र कालमर्यादा आहे. हे आरक्षण संविधान १९५० मध्ये लागू झाल्यापासून १० वर्षात म्हणजे १९६० पर्यंत ठेवायला सांगितले होते. 


परंतु आजचे राजकीय पक्ष राजकीय आरक्षण दर दहा वर्षांनी वाढवतात. हे आरक्षण पुणे करारातून निर्माण झाले आहे. परिणामी या करारातून दलालांची निर्मिती झाली. राजकीय आरक्षण हे एकमेव बील आहे जे चर्चेशिवाय मंजूर केले जाते. आरक्षण मिळण्यासाठी विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात हा निकष प्रमाण मानला आहे. 


जात या निकषावर संविधानसभेत १६ तास चर्चा झाली आहे. त्यात डॉ.आंबेडकरांनी बाजी मारत देशातील सर्व ब्राम्हणांना पराजित केले आहे. ब्राम्हणांचा निकष आर्थिक आधार आहे, डॉ. आंबेडकरांचा निकष जात आहे. आठवलेसाहेब.....! आपणही म्हणता आर्थिक आधारावर आरक्षण हवे. याचा अर्थ तुम्ही ब्राम्हणांची भाषा बोलत आहात. 


बरोबर आहे, त्यात तुमचे काही चूक नाही, कारण ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, त्यांची भाषा न बोलल्यास तुमच्या मंत्रीपदावर गदा येऊ शकते. तुमचे मंत्रीपद वाचले पाहिजे, परंतु सर्व बहुजन समाजाचे वाटोळे झाले तरी चालेल, अशीच तुमची भूमिका दिसत आहे.


रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राम्हणांनी राज्यभिषेक का नाकारला? राष्ट्रपिता जोतिराव फुले यांना सखाराम परांजपे या ब्राम्हणाच्या वरातीतून का बाहेर काढण्यात आले? छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र का नाकारण्यात आले? ते हे सर्व बहुजन महापुरूष शुद्र होते. त्यांना जात आडवी आली असेल तर, त्यांचा अपमान जातीमुळे होत असेल तर जात या घटकाला प्रमाण मानून जातनिहाय आरक्षण दिले गेले. 


एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक यांना कोणत्या आधारावर वंचित केले गेले तर जात...! जात ही अचल आहे. कारण श्रीमंतालाही आणि गरीबालाही जात आहे. जात या देशाचे वास्तव आहे.ते बदलता येणार नाही. अर्थ (पैसा) हा चल आहे. म्हणजे आज गरीब असणारा व्यक्ती उद्या श्रीमंत होऊ शकतो. परंतु आज श्रीमंत असणारा व्यक्ती उद्या गरीबही होऊ शकतो. 


पैसा आज आहे उद्या नाही, परंतु जात कायम राहणार आहे. श्रीमंत असलेल्या व्यक्तीला एकवेळ आरक्षण नाकाराल, परंतु श्रीमंतीतून गरीब झालेल्या व्यक्तीला आरक्षण कसे नाकाराल? आरक्षण नाकारताच येणार नाही. भारतीय संविधानात आर्थिक निकष नाही तर जात हाच निकष आहे.


भारतीय संविधानात आरक्षणाबाबत ५० टक्केची सोडाच कोणतीच मर्यादा नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त प्रतिनिधीत्व म्हणजे आरक्षण. जितनी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागिदारी असे मान्यवर कांशीरामजी म्हणतात. तर मग ५० टक्केची मर्यादा कोणी आणि केव्हा आणली गेली? १६ नोव्हेंबर १९९२ इंद्र सहानी विरूध्द भारत सरकार या खटल्यात सर्वाच्च न्यायालयाने ओबीसींच्या विरोधात चार निर्णय दिले. 


त्यातील पहिला निर्णय ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळणार नाही. तर ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळेल. तर ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही कारण अगोदरच एससी-१५ टक्के, एसटी-७.५ टक्के= २२.५ टक्के. म्हणून ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले गेले तर ४९.५ टक्के आरक्षण होईल, अर्थात ५० टक्क्याच्या आत. ही ब्राम्हणांनी खेळलेली चाल आहे. 


परंतु आमच्या आठवलेसाहेबांच्या काही लक्षात येत नाही. कारण मंत्रीपद आणि आपण बस्स...! बाकी सर्व समाज खड्ड्यात गेला तरी चालेल. आर्थिक आधारावर आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे ब्राम्हणांची तरफदारी आहेच, त्याचबरोबर असे सांगून आठवलेंनी आपली बौध्दीक दिवाळखोरी स्पष्ट केली आहे. आपण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसत आहोत याचे साधे भानही त्यांना नाही. जे ब्राम्हण घटना बदलायला निघालेत त्यांच्यासमोर लाळघोटेपणा करायचा. याला काय म्हणावे असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.


आठवलेजी आरक्षणामुळेच तुम्ही मंत्री झाला आहात, आपण एका खात्याचे राज्यमंत्री आहात याचे भान ठेवून बोलायला हवे. परंतु तुमचे भान कुठे असते, तुम्हांलाच ठाऊक. म्हणून तुमच्यासारखी व्यक्ती एक चेष्टेचा विषय होऊन बसतो. सर्वच राजकीय पक्षांकडून तुमची जोकर म्हणून संभावना केली जाते. असा जोकर म्हणून शिक्का मारून घेण्यात तुम्हांला आनंद वाटतो का? वाटत असेल तर आमची काही ना नाही. मात्र तुम्हीही एखाद्या तळागाळातून वरच्या पायरीपर्यंत गेला आहात. 


अनेक टक्के-टोणपे खाल्लेले आहात, याची आम्हांला जाणीव आहे. कदाचित दिशाहिन असल्यामुळे तुमच्या तोंडून आर्थिक आरक्षणाचे तुणतुणे वाजवले गेले आहेत. आठवलेजी....! ब्राम्हणांची चाल ओळखायला शिका. तरच तुम्ही विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिका, संघटित  व्हा, संघर्ष करा या मंत्राला पुढे घेऊन जाल. 


नाहीतर आंबेडकरी चळवळीतील एक दलाल म्हणूनच तुमची नोंद होऊ शकेल. तुमची दलाल म्हणून नोंद हवी की आंबेडकरी चळवळीतील चांगला अनुयायी अशी नोंद हवी, याचा निर्णय सर्वस्वी तुमच्या हाती असेल. कारण भरकटलेल्या माणसाला चांगले  सांगणे म्हणजे आमचे आम्ही कर्तव्य समजतो. तीच आमच्या महापुरूषांनी शिकवण दिली आहे. तुम्ही अशा प्रकारे वादग्रस्त विधान करून तुमच्याकडे लक्ष वेधून घेतले असले तरी हा बहुजन समाज तुमचा कधी वेध घेईल याचा काही नेम नाही. 


म्हणून आठवलेजी विधान करताना सावधानता बाळगा, नाहीतर कडेलोट झाला म्हणून समजा. कडेलोट करून घ्यायचा असेल तर खुशाल घ्या, तुम्हांला कोणी अडवणार नाही, मग मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे असे सांगू नका. कारण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता इतका लाचार नसतो. लाचार असतो तो ब्राम्हणांची तळी उचलून धरतो. म्हणून आर्थिक आधारावर आरक्षण द्या असे सांगणे ब्राम्हणांची तळी उचलून धरणे होय. हे थांबवा असे आमचे आवाहन आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper