×

अण्णांची ‘टोपी’

Published On :    23 Mar 2018
शेयर करा:


-



राळेगण सिद्धीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दिल्लीतील रामलीला मैदानावर जनलोकपालसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मरण आले तरी बेहत्तर अशातर्‍हेची डरकाळी त्यांनी फोडली असली तरी या डरकाळीला गांधीवादाचा गंध येत आहे. कारण मोहनदास करमचंद गांधी यांनी सर्व बहुजन समाजाला जी ‘टोपी’ घातली त्याचीच ‘री’ अण्णा हजारे ओढत आहे. गांधी टोपी म्हणजे बदमाशी आणि गांधीवाद म्हणजे बदमाशांचा अड्डा. 


२०११ मध्ये कॉंग्रेसच्या सत्ताकाळात जनलोकपाल विधेयक मंजूर झाले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतरच्या २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर येऊनही या जनलोकपालकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे अण्णा हजारेंचा तिळपापड झाला आहे. म्हणून पुन्हा एकदा गांधी टोपी घालून लोकांना टोपी घालण्याचा उद्योग अण्णा हजारेंनी सुरु केला आहे. 


जनलोकपालचा मसुदा अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला सादर केला आहे. जनलोकपाल विधेयक हे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमावयाचे आहे. त्यासाठी लोकपालचे अध्यक्ष भारताचे सरन्यायाधीश किंवा माजी सरन्यायाधीश असतील. तसेच अध्यक्ष पदावरील व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाची विद्यमान व माजी न्यायाधीश सुद्धा असू शकते. 


लोकपालाच्या अंतर्गत एक चौकशी शाखा असेल. डायरेक्टर ऑफ इन्क्वॉयरी हे त्याचे प्रमुख असतील. तर दिल्ली पोलीस इस्टॅब्लिसमेंट ऍक्ट १९४६ आणि सीव्हीसीच्या कलम ८ नुसार लोकपालाला अधिक्षक, निर्देश आणि तपासाचे पूर्ण अधिकार असतील. त्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अण्णांची पार्श्‍वभूमी पाहता त्यांनी शासक असलेल्या ब्राह्मणांनाच मदत केली आहे. 


दर दहा वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना होते. १८७१ ते १९३१ पर्यंत इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली. परंतु त्यानंतर जातीनिहाय जनगणनेला ब्राह्मणांनी विरोध केला. फक्त आज एससी, एसटीची जातीनिहाय जनगणना होते. परंतु ओबीसींची जातीनिहाय जनगणना होत नाही. त्यामुळे ओबीसींसमोर आज हजारो समस्या निर्माण झाल्या आहेत. 


२०११ मध्येही ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आला. कारण या देशात बहुजन समाजामध्ये झालेली जागृती आहे. ही जागृती करण्याचे काम अव्याहतपणे ४० वर्षे बामसेफच्या माध्यमातून सुरु आहे. म्हणून ओबीसी बांधवांमध्ये एक प्रकारची चेतना निर्माण होऊन जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा प्रकर्षाने चर्चीला गेला. 


या मुद्यावरुन लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी देशातील शासक असलेल्या ब्राह्मणांनी अण्णांना हाताशी धरुन जनलोकपालचा मुद्दा उपस्थित करायला लावला. अण्णा हजारेंनी त्यासाठी दिल्ली येथे आंदोलन केले. सार्‍या देशभरामध्ये ‘मै हू अण्णा’ अशा प्रकारची टोपी घालून बहुजनांना अण्णांनी ‘टोपी’ घातली. कारण ओबीसींच्या जातीनिहाय जनणनेच्या मुद्यावर चर्चा होऊन निर्णय झाला असता तर निश्‍चितच त्याचा फायदा ओबीसींना झाला असता. परंतु ओबीसींना वंचित ठेवण्यासाठीच ही बदमाशी करण्यात आली. 


जनलोकपालसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय?घेणे म्हणजे ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेला फाटा देण्यासाठीच अण्णा हजारेंनी ही चाल खेळली आहे. या खेळीमागील खरा सूत्रधार अर्थातच शासक असलेला ब्राह्मण आहे. जनलोकपालला भ्रष्टाचार विरोधात चौकशी करण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तसा मसुदा अण्णांच्या चेलेचपाट्यांनी तयार केला आहे. समजा जनलोकपालने भ्रष्टाचार केल्यास त्याला कोण अडवणार? हा साधा सवालही अण्णांच्या मनात येत नाही. 


या देशातील संसद ही सार्वभौम आहे. संसदेमध्ये घेतले गेलेले निर्णय व केलेले कायदे हे सर्वांना बंधनकारक आहे. विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेलाच सर्वाधिकार दिले आहेत. संसद जर सर्वसत्ताधिश असेल तर जनलोकपालच्या माध्यमातून दुसरे पर्यायी सत्तास्थान निर्माण करण्याची गरज का आहे? याचे उत्तर टोपीधारी अण्णांकडे आहे का? याचा अर्थ संविधानाविरोधात हा एक कलमी कार्यक्रम अण्णा हजारेंच्या मार्फत सुरु आहे. 


काही दिवस अण्णा गायब होतात आणि पुन्हा एकदा भूछत्राप्रमाणे उगवतात. भूछत्राचेही दोन प्रकार आहेत. एक विषारी व दुसरा बिनविषारी. बिनविषारी भूछत्र लोक खातात. परंतु अण्णा हजारे नामक जे भूछत्र आहे ते विषारी आहे. त्यामुळे बहुजनांनी या विषारी भूछत्रापासून सावध असायला हवे. त्याला साधा स्पर्शही करता कामा नये. नाही तर या विषारी भूछत्राने ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मुद्याची काय अवस्था केली. 


भूछत्राप्रमाणे हा मुद्दा कसा मातीत गाडला गेला हे सर्वांना ठाऊक आहे. काही दिवस उपोषण करतील आणि सरबताचे ‘घोट’ घेऊन ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेचा गळा ‘घोट’तील. कारण जसा गांधींनी बहुजनांचा घोट घेतला तसाच त्यांची री ओढणार्‍या अण्णासारख्या लोकांनाही घोट घेण्यात फार मोठा आनंद वाटतो. म्हणूनच अण्णांची ही नौटंकी समजून घेत बहुजन बांधवांनी त्यांना जाब विचारायला हवा. तसेच बहुजनांना जातीनिहाय जनगणनेसाठी देशात मोठे आंदोलन उभे करावे लागेल तरच यश निश्‍चितच आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भोजन पुरविणार्‍या पुरवठादारांचे पैसे देऊ नका
धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
एकत्र निवडणुकांसाठी भाजपची आक्रमक भूमिका
सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय
...तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल
२०१९ मध्ये ईव्हीएम मशीन फोडणारच
देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये
गोवारी समाज आदिवासीच
प्रसूती रजेच्या कायद्यामुळे महिलांच्या नोकर्‍यांत घट
बिहारच्या आणखी १४ बालगृहांत लैंगिक शोषण
अपहरणांचे सत्र सुरूच
संविधान जाळल्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद
केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या सुमारे ८ हजार ज
धनगर आरक्षणासाठी परभणीत तरुणाची आत्महत्या
नालासोपार्‍याचे कर्नाटक कनेक्शन
आरक्षणाच्या मागणीसाठी नगरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोक
सात राज्यांत पूरस्थिती, महाराष्ट्रात १३९ जणांचा मृत्यू
संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच
गाडीला उशीर झाला तरच वेग वाढवा
कवडीमोल भावात जमिनी लाटणार्‍या रिलायन्स विरोधात एल्गार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper