×

न खाऊंगा न खाने दूँगा बार फुसका.....!

Published On :    7 May 2018
शेयर करा:


-



२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा न खाने दूँगा अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती. परंतु या घोषणेचा बार फुसका निघाला आहे. कारण ज्या प्रकारे मोदींच्या कालखंडात या देशात घोटाळे झाले याचा विचार केल्यास मती गुंग झाल्याशिवाय राहणार नाही. 


तर कर्नाटक विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकीत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपणसुध्दा कॉंग्रेसपेक्षा वेगळे नाही हे दाखवण्याचा प्रताप भाजपने केला आहे.


कर्नाटकमध्ये निवडणुकीसाठी भाजपच्या २२४ उमेदवारांपैकी ३७ टक्के म्हणजे ८३ उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल आहे. तर कॉंग्रेसच्या २२० उमेदवारांपैकी २७ टक्के म्हणजे ५९ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यातील काहीजणांवर हत्येचा प्रयत्न व महिलांची छेडछाड केल्याचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर ८८३ उमेदवार करोडपती आहेत. 


त्यातील कॉंग्रेसचे २०७ व भाजपचे ९३  टक्के उमेदवार करोडपती आहेत.  प्रत्येक उमेदवाराकडे  ७.५४ कोटीची मालमत्ता आहे. ही आकडेबारी पाहिली की भोवळ आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्टाचार व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लोकांना उमेदवारी देणे भाजपची बौध्दीक दिवाळखोरी स्पष्ट झाली आहे. 


आपण या देशाचा चौकीदार असून प्रधानसेवक आहोत अशी भाषणबाजी मोदी यांनी केली होती. भाषणबाजीमध्ये मोदींचा आज कुणीही हात धरणार नाही. जशी भाषणबाजी तशी निवडणुकीची जुमलेबाजी करण्यातही मोदी माहिर आहेत. तुमच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होतील असे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सांगणारे मोदी २०१९ ची लोकसभा निवडणूक आली तरी ते पैसे जमा करू शकलेले नाहीत. 


यावर टीका झाल्यानंतर ती घोषणा म्हणजे निडणुकीचा जुमला होता असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तोंड वर करून सांगितले होते. आपल्याच तोंडातून या वाफा गेल्या होत्या हे मात्र ते सोयीस्कर विसरले होते. म्हणूनच एवढे सांगण्याची त्यांची मजल गेली.


मोदी काहीतरी देशात परिवर्तन करतील या अपेक्षेने त्यांना लोकांनी निवडून दिले. मात्र परिवर्तन जाऊ द्या जे आहे ते टिकवण्याचे सामर्थ्यही त्यांच्याकडे नाही. त्यांचे अनेक निर्णय चुकले म्हणून आज देशाला अपेक्षित असलेली विकासाची गती राखता आलेली नाही. 


न खाऊंगा न खाने दूँगा म्हणणारे मोदी मात्र आपल्याच मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला पाठिशी घालताना दिसले. मोदींचा केविलवाणा चेहरा सार्‍या भारतीयांनी पाहिला. कॉंग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराची गंगाच वाहत होती, त्यावर कडी केली ती मोदी सरकारने.....! अनेक घोटाळे मोदींच्या कालखंडात उघडकीस आले. 


त्यात प्रामुख्याने ४५ हजार कोटींचा दूरसंचार घोटाळा, २० हजार कोटींचा एलपीजी गॅस कनेक्शन घोटाळा,  राफेल विमान खरेदी घोटाळा, विविध बँकाचे घोटोळे, त्यात प्रामुख्याने पीएनबी नॅशनल बँकेचा नीरव मोदीचा ११ कोटींचा घोटाळा, विजय मल्ल्याचा ९ हजार कोटींचा घोटाळा. 


त्यातच या बड्या उद्योजकांना बाहेरच्या देशात पाठविण्यासाठी केलेली मदत. या सर्व बाबी विचारात घेतल्या तर मोदींच्या कालखंडात घोटाळ्यांची मालिकाच समोर आली. त्यात आणखी एक मोठा घोटाळा म्हणजे करण्यात आलेली नोटाबंदी. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. 


या नोटाबंदीला तत्कालीन आरबीआयचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी विरोध केला होता. म्हणून त्यांना तेथून हटवून ओनाम्या सांगकाम्या असलेले उर्जित पटेलनामक माणसाला गर्व्हनरपदावर आणले गेले. हा सुध्दा एकप्रकारे घोटाळाच आहे. 


नाव उर्जित मात्र अर्थव्यवस्थेला उर्जित अवस्था आणण्यासाठी या माणसाने कुठलीच पावले उचलली नाहीत. नोटाबंदीच्या काळात हे महाशय कुठल्या बिळात लपून बसले होते कुणास ठाऊक? कुठलीही प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली नव्हती. 


प्रॉब्लेम ऑफ रूपी (रूपयांचा प्रश्‍न) या पुस्तकात जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दर दहा वर्षानी चलन बदलाव्यात असे सूचवले होते. मात्र त्यांचा हा विचार अंमलात आणला गेला नाही. मोदींनी तर मनमानीप्रमाणे नोटाबंदी करून सर्वसामान्यांचा घास हिरावून घेतला. 


खरे म्हणजे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ही नोटाबंदी नव्हती तर आपल्या जवळच्या उद्योजकांना व भांडवलदारांना वाचवण्याचा हा खटाटोप होता. काळा धन किती बाहेर आले. यामुळे काय फायदा झाला यावर कुठलेही भाष्य आरबीआयने केलेले नाही. याचा अर्थ नोटाबंदी पूर्णत: फसली आहे. यामध्ये भांडवलदारांचाच फायदा झाला. 


नोटाबंदी होणार आहे याची बातमी अगोदरच ६ महिने गुजरातमधील उद्योजकांना समजली होती. म्हणून त्यांनी तत्काळ जे काळे धन आहे ते पांढरे करून घेतले होते. यावरून असे दिसून येते की, नोटाबंदी केवळ बड्या उद्योजकांना फायदा व्हावा व काळेधन बाळगणार्‍यांना हुशार करण्यासाठी करण्यात आली होती. यावेळी उन्हातान्हात  उभे राहिल्यामुळे जवळपास ३५ लोकांना मृत्यू आला होता. अनेकांचे रोजगार बुडाले. सर्व व्यवस्था कोलमडली.


नोटाबंदीनंतर मोदी सरकार नको ते निर्णय घेत सुटले आहे. त्यातच आता या देशाचा जाज्वल्य असणारा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. लालकिल्ला व ताजमहालसारखे ऐतिहासिक ठिकाणे दालमिया ग्रुपला भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


जो लालकिल्ला व ताजमहाल शहाजहान यांनी बांधला होता. त्याच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा मिटवण्याचा हा प्रयत्न आहे. आज लालकिल्ला व ताजमहाल विकला तर उद्या देशही हे लोक विकतील. सरकारी कंपन्यांचे होत असलेले खाजगीकरण, शिक्षणाचे बाजारीकरण यामुळे देशाची व्यवस्था गलितगात्र झाली असताना सरकार मात्र आपल्याच तोर्‍यात आहे. 


२०१९ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन देशात हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचा बेतही या सरकारचा आहे. जेणेकरून मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा आपल्यालाच कसा होईल यादृष्टीने आखणी केली जात आहे. पुन्हा एकदा मोदी सरकारने सत्तेवर येण्याचा बेत आखला आहे. त्यामुळेच कालबाह्य झालेले मुद्दे उपस्थित केले जात आहेत. 


घोटाळेबाजांचे हे सरकार भारताचे वैभव धुळीला मिळवत आहेत. ना कुठली आखणी ना नियोजन. वाटेल तसे निर्णय घेऊन लोकांवर लादले जात आहेत. भूमी अधिग्रहण कायदा येथील शेतकर्‍याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारची सुरू असलेली ही मनमानी देशाला घातक ठरणारी आहे. 


त्यामुळे घोटाळेबाज व दांभिक असलेल्या या सरकारला जाब विचारायला हवा. त्यासाठी सर्व मूलनिवासी बहुजनांनी एकात  एक सूर मिसळला पाहिजे. हा आवाज एकीची वज्रमूठ बनायला हवा. ती वज्रमूठच आवळताच सरकार थरथर कापायला हवे. त्यासाठी प्रबोधन हवे. प्रबोधनासाठी सर्वस्वी झोकून द्यायला हवे. 


सरकार कसे दांभिक व खोटारडे आहे, हे लोकांना सांगितले पाहिजे. सांगताना मनात भितीचा लवलेशही नसला पाहिजे. बिनधास्त आणि रोखठोक विचार मांडून समाजाला गुलामीच्या दलदलीतून बाहेर काढण्याचे काम सर्व बहुजनांचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी परिवर्तन यात्रेचा उद्देश काय? का काढण्यात आली परिवर्तन यात्रा याची कारणे तपासली पाहिजेत. 


परिवर्तन यात्राच या देशात परिवर्तन घडवून आणणार आहे. ही खूणगाठ मनाशी बांधून ब्राम्हणधार्जिण्या या घोटाळेबाज सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper