×

घोषणांचा पाऊस

Published On :    8 May 2018
शेयर करा:


-



नेमेची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला जातो. अशाच घोषणांचा पाऊस सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसकडून पाडला गेला आहे. नाना तर्‍हेच्या घोेषणा करून त्यांनी मतदारांना भूलथापा देण्याची नौटंकी दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून सुरू आहे.


आज देशात अनेक समस्या आहेत. त्या मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी नको त्या विषयाला वाचा फोडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. भूकबळी होत आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कुषोषणाने विळखा घातला आहे. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. काही गावामंध्ये भीषण पाणीटंचाई आहे. वाहतुकीची दळण-वळणाची साधने नाहीत. 


काही गावांना अजूनही अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीपीक कमी येते. अशा अनेक समस्यांनी देशात थैमान घातले आहे. या समस्या सोडवण्याऐवजी नरेंद्र मोदी सरकार डिजीटल इंडियाच्या दुनियेत वावरत आहे. कर्नाटक निवडणुकीत तर सर्वच राजकीय पक्षांनी कहरच केला. युवकांना लॅपटॉप देऊ असे आश्‍वासन दिले गेले आहे. 


लॅपटॉप देऊन त्याची भूक भागणार आहे का? कारण भूक लागली तर लॅपटॉप खाणार आहे का? त्याला डाळ, भात, भाजीच खावी लागेल ना? मूलभूत गरजा भागवण्याचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीच्या भूलथापांना भूलणारे लोक व मतदार या देशात मोठया प्रमाणात आहेत. इंदिरा गांधी सत्तेवर असताना गरीबी हटावचा नारा दिला होता. देशातील गरीबी सोडाच गरीबालाच हटवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. 


या गरीबी हटाववरून इंदिरा गांधी यांनी अनेक निवडणुका जिंकल्या होत्या. राजकीय नेत्यांनाही माहित आहे की, भारतीय समाज हा भोळा-भाबडा आहे. त्याला थोडेसे लॉलीपॉप दाखवले की तो पटकन सांगितलेल्या गोष्टीवर विश्‍वास ठेवतो. त्यामुळे त्याच त्याच घोषणा केल्या जातात. या घोषणेच्या मायाजालात सर्वसामान्य मनुष्य फसतो आणि स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो. 


देशाला कथित स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे सुरू आहे. कारण मिळालेले स्वातंत्र्य नव्हतेच तर इंगजांसारखा एक सत्ताधारी जाऊन ब्राम्हणांच्या हातात सत्ता देऊन केला. एका अर्थाने हे सत्तेचे हस्तांतरण आहे. ब्राम्हणांनी पूर्ण व्यवस्थेवरच कब्जा मिळवल्यामुळे देशात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या सुटण्याच्या मार्गावर नाहीत. एक सत्ताधारी जातो आणि दुसरा सत्ताधारी येतो. म्हणजे एक ब्राम्हण सत्तेतून पायउतार होतो आणि दुसरा ब्राम्हण पुन्हा सत्तेवर येतो. 


सत्तेत परिवर्तन झाले तरी शाासक जातीत परिवर्तन होत नाही. त्यामुळे समस्या जशाच्या तशा राहतात. आज तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त घोषणांचा पाऊस पाडला तरी चालतो कारण येथील जनता ही विसरभोळी आहे. आज काय घडले याची दुसर्‍या दिवशी माहिती नसते. परंतु घोषणा किती करणार याची काही मर्यादा नाही. कुठल्याही घोषणा करून निवडणुका जिंकता येतात हा फंडा राजकीय पक्षांना माहित नाही. त्यामुळे घोषणांचा पाऊस पाडला जातो. 


देशात आजवर आलेल्या सत्ताधार्‍यांना प्रश्‍न सोडवण्यात अपयश आले आहे. कारण कथित स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षानंतरही जर काही गावांना पाणी, वीज मिळत नसेल तर हे अपयश आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. परंतु या अपयशाची राजकीय पक्षांना कुठलेही देणे-घेणे नसते. केवळ निवडणुका जिंकणे आणि सत्तेवर आल्यानंतर निवडणुकीत खर्च झालेला पैसा वसूल करणे एवढेच उद्दीष्ट त्यांच्यासमोर असते. 


त्यामुळे मतदार कितीही बोंबलले तरी त्याचा फारसा परिणाम राजकीय नेत्यांवर व पक्षांवर होताना दिसत नाही.  राजकारण हे गेंड्याच्या कातडीचे असे म्हणतात. ही गेंडयाची कातडी जागेवरून हलत नाही. परिणामी कुठल्याही समस्या सुटताना दिसत नाहीत.


पाणी, वीज, रस्ते देऊ या कॉमन मुद्दयांवरून निवडणुका लढवण्याचा फंडा आखला जातो. आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात या बाबींवरून निवडणुका लढवल्या जात नाहीत. शिक्षण आणि आरोग्य या महत्वाच्या घटकांना तिथे प्राधान्य दिले जाते. आपल्याकडे उलटे आहे. घड्याळाचे काटे नेहमीच उलटे फिरताना दिसतात. त्यामुळे वेळ कधी निघून जाते हे सरकारला देखील कळत नाही. सत्तेवर असलेल्या सरकारने खर्‍या अर्थाने त्यांनी प्रश्‍न सोडवायचे असतात. कारण ते जनतेला बांधील असतात. 


परंतु याठिकाणी केवळ भांडवलधार्जिणे निर्णय घेऊन मतदारांनाच वार्‍यावर सोडले जाते. पुन्हा एकदा आठवण होते ती पाच वर्षांनी.....! कारण निवडणुका जवळ आलेल्या असतात. मग काय गं ताई, काय गं माई, काय गं आक्का अशा हाका मारताना सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी दिसतात. एरव्ही कोण मतदार आणि कोण काय? याचा पायपोस कुणाला नसतो. 


गेले अनेक वर्षे घोषणांचा पाऊसच पाडण्यात येत आहे. करण्यात आलेल्या घोषणा या पूर्ण करण्यासाठी नसतातच याची खूणगाठ त्यांनी बांधलेली असते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा करू अशी घोषणा केली होती. 


यावर गदारोळ माजल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हा निवडणुकीचा जुमला होता असे सांगायला मागे पुढे पाहिले नाही. केवळ शहाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी घोषणांचा पाऊस पाडण्यात येतो. निवडणुका संपल्या की त्या घोषणा हवेत विरलेल्या असतात. त्या घोषणांकडे सर्वसामान्य लोक डोळे लावून बसतात. परंतु त्या घोषणांच्या पावसातला एकही थेंब त्यांच्या तोंडात पडत नाही.


अशा या राजकारणापायी आज देश रसातळाला गेला आहे. ज्या गतीने देश पुढे जायला हवा, त्या गतीने जाताना दिसत नाही. त्यातच गेल्या काही वर्षात या देशाला बलात्काराचा कलंक लागला आहे. कुठेनाकुठे बलात्कार होताना दिसत आहे. त्यामुळे भारताची नाचक्की होताना दिसत आहे. परंतु याचे सत्ताधार्‍यांना कुठलेही सोयरेसुतक नाही. 


कारण यांनी लाजच भाजून खाल्ली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नाचक्की होत असताना मोदींच्या नाकावरची माशी देखील हालत नाही. त्यामुळे बिनकामी सरकारला खाली खेचण्याची तयारी ठेवा. याचा अर्थ कॉंग्रेसला निवडून द्या असे होत नाही. हे दोन्ही पक्ष महालबाड आहेत. महालबाडी त्यांच्या नसानसात भिनली आहे. परिणामी आपण सर्वांनी सावध असायला हवे. 


सावधानतेने पावले टाकली पाहिजेत. दिवस आणि रात्रही वैर्‍याची आहे. या घोषणांच्या पावसाकडे लक्ष न देता अव्याहतपणे व्यवस्था परिवर्तनाच्या कामाला लागले पाहिजे. त्यासाठी समर्पित भावनेने काम केले पाहिजे. आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा सुर्योदय पहायचा असेल तर एकजुटीची वज्रमूठ आवळू या.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही
१०० च्या नव्या नोटेमुळे तब्बल १०० कोटींचा फटका
बिहारमध्ये अनु जाती, जमातींना बढतीत आरक्षण
मातंग समाजाचा ‘मूक हुंकार’
मोदी जितके लोकप्रिय होतील तितक्या हिंसक घटना वाढतील
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी मारल्या २ हजार
‘मराठा समाजाला आरक्षण मिळणार याची खात्री काय?’
सरकारविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू
देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर
‘राफेल’चा तपशील जाहीर करता येणार नाही
गौरी लंकेश हत्या प्रकरणात सात संशयितांना अटक
मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करतात
अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करणारा भोंदू बा
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांना के
मालवाहतूकदारांचे देशव्यापी चक्काजाम आंदोलन
देशात आणीबाणीची परिस्थिती. -राज ठाकरे.
न्यायालयीन प्रकरणातील फायली गहाळ?
मोदींचा ४ वर्षात परदेश दौर्‍यावर १ हजार ४८४ कोटींचा खर्च
मराठा क्रांती मोर्चाने केले वाशीत ठिय्या आंदोलन
हजारो कोटी खर्चूनही गंगा मैलीच?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper