×

योगी, भोगी आणि मानसिक विकृतीचे रोगी

Published On :    9 May 2018
शेयर करा:


-



उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली खून केले जात असून त्यात मरणार्‍यांमध्ये अनु.जाती आणि मुस्लिम समाजातील लोक सर्वाधिक असल्याचा धक्कादायक दावा मानवाधिकारासाठी काम करणार्‍या सिटीजन अगेन्स्ट हेट या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून होत असलेल्या या नरसंहाराची चौकशी करावी, अशी मागणीही या संस्थेने केली आहे. 


सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी हे एन्काउंटर नसून खून असल्याचे म्हटले आहे. अनु.जाती-मुस्लिमांचा नरसंहार करण्याचा अधिकार योगी सरकारला दिला कुणी असा सवाल विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हे बनावट एन्काउंटर देशासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.


योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या १२ महिन्यात १२०० एन्काउंटर करण्यात आले आहेत. त्यात ५० हून अधिक गुंडांना ठार मारण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर एन्काउंटर होऊनही उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीत काहीही कमी झाली नसल्याचेही उघड झाले आहे. तर देशभरात बनावट एन्काउंटर होत आहेत. 


ही आकडेवारी पाहिली तर डोळे पांढरे करणारी आहे. यूपी- ४५५, असाम- ६५, आंध्रप्रदेश- ६३, मणिपूर-६३३, झारखंड- ५८, छत्तीसगड- ५६, मध्यप्रदेश- ४९, तमिलनाडू- ४४, दिल्ली- ३६, हरयाणा- ३५, बिहार- ३२, पश्चिम बंगाल- ३०, उत्तराखंड- २०, राजस्थान-१९, महाराष्ट्र- १९, कर्नाटक- १८, गुजरात- १७, जम्मू-कश्मीर- १७, केरळ- ०३, हिमाचल- ०३. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार १ जानेवारी २००५ ते ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत म्हणजे गेल्या १२ वर्षात देशात १२४१ बनावट एन्काउंटर झाले आहेत. 


त्यातील ४५५ बनावट एन्काउंटर एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. याच १२ वर्षात उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे बनावट एन्काउंटर करून देशात दहशत माजवण्याचा योगी सरकारचा प्रयत्न तर नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे.


एखादा गुंड शिरजोर झाला तर एन्काउंटर करायला हवे. मात्र सरसकट करण्यात येणारे एन्काउंटर बनावट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. बनावट एन्काउंटर करण्याची एखादे सरकार मजल गाठत असेल तर निश्‍चितच धोक्याचे आहे. अशा आपल्या देशात अनेक बनावट एन्काउंटर झालेले आहेत. त्यात गुजरातमधील इशरत जहॉं, सोहराबुद्दीन शेख हे बनावट एन्काउंटर झालेले आहे. 


या दोन्ही बनावट एन्काउंटरमध्ये भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांचा हात होता. तर सोहराबुद्दीन शेख या एन्काउंटरप्रकरणी सुनावणी करणारे न्या. बी.एच. लोया यांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. लोया यांनी या प्रकरणाची पालेमुळे खणली होती. या एन्काउंटरममध्ये आपले नाव येईल भीतीपोटी शहा यांनी लोया यांचा काटा काढला असावा अशी शक्यता आहे. 


तसा शहा यांचा इतिहास हा विकृत आणि गुंड प्रवृत्तीचा आहे. त्यांना एका प्रकरणात तडीपारची नोटीस बजावण्यात आली होती. आपला पक्षाध्यक्षच गुंड प्रवृत्तीचा आहे. आपण बनावट चकमकी केल्या तर कुठे बिघडले असे विकृत विचार योगी आदित्यनाथ यांच्या मनात आले असतील तर त्याला कोण काय करणार? 


परंतु आपण एका देशातील मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवत आहोत, या संविधानिक पदाचा तरी मान राखायला हवा. परंतु मान राखणे सोडाच आपले राजकीय विरोधक संपवून आपल्याला पाहिजे तसे करून घेणे हे एकमेव उद्देश योगींचा दिसतो. नाव योगी परंतु काम मात्र विलासी आणि भोगी.....!  


देशातील विविध राज्यांमधील भाजप सरकारचा परफॉमन्स पाहिला असता तर केवळ बोलघेवडेपणा दिसून येतो. आश्‍वासने द्यायची आणि ती पाळायची नाहीत हा एकमेव खाक्या दिसतो. आलेले अपयश झाकण्यासाठीच बनावट एन्काउंटर केले जातात. त्यात योगी सरकार आघाडीवर आहे. उत्तरप्रदेशात अनेक प्रश्‍न गंभीर बनले आहेत. रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवण्यातही  या सरकारला यश आलेले नाही. 


त्यामुळे बेकारांची फौज विकसित राज्याच्या दिशेने कूच करताना दिसते. बानवट एन्काउंटर जे केले जात आहेत, ते एससी, मुस्लिम समुदायातील लोकांची केले जात आहेत. एखाद्या जातीसमुहाला टार्गेट करून अशाप्रकारे एन्काउंटर केले जात असतील तर योगी सरकारची पावले अराजकतेच्या दिशेने पडताना दिसत आहेत. 


ही अराजकता केवळ उत्तरप्रदेशलाच गिळंकृत करणारी नसेल तर त्याचा फार मोठा परिणाम देशाच्या विकासावर होईल यात शंका नाही. ही अराजकता देशाला घातक आहेच, परंतु मानवमुक्तीच्या लढ्याला मागे नेणारी असेल. आपण बनावट चकमक का करत आहोत याचे साधे भान योगींना नसेल तर त्या राज्याचे कधीच भले होणार नाही. 


एखाद्या विषयावरून लक्ष विचलित करण्याचाही हा प्रकार असू शकतो. त्यासाठीच जाणीवपूर्वक बनावट एन्काउंटर केले जात असावेत अशी शक्यता आहे. सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की, तुम्ही सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. कुणावरही अत्याचार अथवा अन्याय करता कामा नये. परंतु मूलभूत बाब विसरून बनावट एन्काउंटर करून आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचे काम होत असेल तर ते निंदनीय आहे. 


तुम्हांला एखाद्याला जगवता येत नसेल तर त्याला मारण्याचा अधिकारही नाही. तो अधिकार तुम्हांला दिला कुणी? सरकार म्हणून आपल्याकडे अधिकार आहे असे तुम्ही सांगू शकता मात्र स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही.


ज्यावेळी देशात हिंदुत्ववादी राजकारणाने पाय घट्ट रोवले, त्या दिवसापासून देश अराजकतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कारण हिंदुत्ववादी राजकारण म्हणजे पाखंड्यांचा अड्डा. पाखंडयांचा अड्डा म्हटल्यावर त्यांच्या डोक्यात चांगले विचार कधीच येणार नाहीत. म्हणूनच दिवसेंदिवस अनेक प्रश्‍न आ वासून उभे राहिले आहेत. त्याला सामोेरे जाताना देशातील नागरिकांची बोबडी वळली आहे. 


बनावट एन्काउंटर भलेही तुमच्या राजकारणासाठी योग्य असेल परंतु आमच्यासाठी ते घातक आहे. योगींसारखी घातकी माणसे आज जागोजागी पहायला मिळत आहेत. परिणामी सावधानतेनेच पावले उचलण्याची गरज आहे. कारण ब्राम्हणवादी लोकांमध्ये मानसिक विकृतीच भरली आहे. 


या मानसिक विकृतीच्या रोगामुळेच बनावट एन्काउंटर केला जात आहेत. हा मानसिक विकृतीचा रोग कधी विळखा घालेल याचा काही नेम नाही. त्या कराल दाढेतून सुटताना फार मोठे कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे योगी, भोगी आणि मानसिक विकृतीचे रोगी यापासून मूलनिवासी बहुजनांनी नेहमीच सावध असायला हवे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकर्‍यांचाही विरोध
अमित शहांचे मनसुबे उधळवून लावणारे मंत्री शिवकुमार ‘ईडी
हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांवर सोशल मीडियातून टीका हा ग
तुझा पाय तोडेन
ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती
राज्यावर भारनियमनाचे सावट
महागाईचा पुन्हा भडका
राष्ट्रीय परिवर्तन यात्रेला ब्रम्हादेखील रोखू शकत नाही
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper