×

होय...! भटमान्य टिळक दहशतवादाचे जनकच

Published On :    11 May 2018
शेयर करा:


-



राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ या धड्यामध्ये बाळ गंगाधर टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे. 


हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात. ब्रिटीश अधिकार्‍यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. 


त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकार्‍यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले गेले आहे. मथुरेतील प्रकाशनाने जे छापले आहे ते खरे आहे. होय....! भटमान्य टिळक ब्राम्हणी दहशतवादाचे जनकच असे आमचे ठाम मत आहे.


टिळकांनी जे निर्णय घेतले ते नेहमीच बहुजनविरोधी होते. त्यामुळे ते लोकमान्य कधीच नव्हते. म्हणा हवे असेल तर भटमान्य होते. त्यामुळे टिळकांबद्दल ब्राम्हणांनी जे लिहून ठेवले आहे ते सर्वच खोटे आहे. हा माणूस एवढा भेकड आणि भित्रा होता की, इंग्रजांपुढे नांगी टाकायचा. 


इंग्रजांनी आम्हांला प्रशासनात व राजसत्तेत वाटा दिला तर इंग्रजांनी येथून जाण्याची गरज नाही. तसेच इंग्रजांचा राजा तोच आमचा राजा असे भटमान्य टिळकांनी म्हटले होते. याचा अर्थ आम्हां ब्राम्हणांना वाटा द्या, असा होतो. 


म्हणजेच त्यांनी फक्त ब्राम्हणांचेच कसे भले होईल याकडे पाहिले. तर स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणाराच याचा अर्थ स्वराज्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ ब्राम्हणांचे राज्य. ब्राम्हणांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे यासाठीच हा खटाटोप होता. 


विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससीसाठी, भास्करराव जाधव यांनी मराठा-कुणब्यांसाठी तर बॅ. मोहम्मद अली जीना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची इग्रजांकडे मागणी केली होती. त्याचवेळी त्यावेळचे कोल्हापूर तर आताच्या कर्नाटकमधील अथनी या गावी जाऊन आपल्या मनातील गरळ ओकली होती. पोटातील मळमळ बाहेर आली होती. 


अथनी येथील सभेत तेली, तांबोळी, कुणबटांनी संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे? अशी मखलाशी भटमान्य टिळकाने केली होती. म्हणजेच संसद किंवा विधानसभा फक्त ब्राम्हणांचीच. तुमचे त्याठिकाणी कामच नाही असे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एकप्रकारे बहुसंख्यने असलेल्या समाजावर अशाप्रकारे अन्यायच करण्यात आला होता. कुणबी ही जात आहे. 


तर कुणबट ही शिवी आहे. शिवी देऊन अपमान करण्यात आला होता. परंतु आमच्याच काही लोकांना वाटते की, तेली, तांबोळी आणि कुणब्यांनाच शिव्या दिल्या होत्या. आम्हांला कुठे शिव्या दिल्या होत्या. तर एवढ्या सर्व ६ हजार तुकड्यांमध्ये विभागलेल्या जातींची नावे घ्यायची म्हणजे टिळकांचे तोंड तरी जाग्यावर राहिले असते का? ही प्रातिनिधीक स्वरुपात त्यांनी उदाहरण दिले होते, हे आधी समजून घ्यावे लागेल. 


जी व्यक्ती तेली, तांबोळी आणि कुणब्यांना शिवी देऊन सांगते की तुमचे संसदेत काही काम नाही त्याच व्यक्तीला शेंडीधारी खोटे इतिहासकार संबोधतात, तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी....! हा केवढा विरोधाभास आणि विकृती. त्यामुळे ब्राम्हणाी इतिहासकारांनी खरा इतिहास न लिहता खोटा लिहला आणि जाज्वल्य भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण केले. 


त्यामुळे ब्राम्हणांची निती समजून घ्यावी लागेल. राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या भाषेत ब्राम्हणी इतिहासकार म्हणजे कलमकसाई.....! हा फुले यांचा शब्द चपखल बसणारा आहे. एका शब्दातच ब्राम्हणांची रेवडी उडवण्यात आली आहे. 


मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर टरफले उचलणार नाही, हा टिळकांचा बाणेदारपणा असल्याचे सांगितले जाते. यामध्ये कसला आला बाणेदारपणा....! हा बाणेदारपणा नसून केवळ पळपुटेपणा आहे. परंतु नको त्या शब्दांची कसरत करून ब्राम्हणांनी स्वत:ची बौध्दीक दिवाळखोरी स्पष्ट केली आहे. ब्राम्हण आपला उद्देश कधीच बदलत नाहीत तर डावपेचात बदल करत असतात. 


शिवजयंंती आणि गणेशोत्सव साजरे करून टिळकांनी इंग्रजांविरूध्द लोकांना एकत्र आणले होते असेही सांगितले जाते. हे सुध्दा साफ खोटे आहे. टिळक इंग्रजांविरोधात लढत होते तर मग शासन, प्रशासनात वाटा का मागत होते? वाटा देत असाल तर इंग्रजांनी येथून जाण्याची गरज नाही असे का म्हणत होते? याचा अर्थ टिळकांचे सोयीचे राजकारण होते. 


ते इंग्रजांविरोधात लढत नव्हते, तर स्वत:च्या जातीसाठी लढत होते. शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करण्यामागील कारण तुम्हांला सांगितलेच पाहिजे. त्यावेळी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खरे काय आणि खोटे काय याची पारख होत होती. 


फुले यांनी रयतेचे राजे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोेधून काढली. तर शिवाजी महाराजांवर त्यांनी पोवाडाही लिहला होता. शिवाजी महाराजांचा कुळवाडीभूषण असा पहिला शब्दप्रयोग फुले यांनी केला होता.  एवढेच नव्हे तर दहा दिवस शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर सत्य मांडून शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. 


त्यामुळे लोकांमध्ये जागृतीच्या ज्वाळा भडकू लागल्या होत्या. याची भीती भटमान्य टिकळांना लागली आणि त्यांनी शिवजयंतीला काउंटर करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. घरातील गणपती रस्त्यावर आणला. त्यावेळी शिवजयंती दहा दिवस साजरी व्हायची परंतु आता लोक शिवजयंतीला विसरले आणि गणेशोत्सव दहा दिवस साजरा करू लागले. एकंदरीत आमच्या बहुजनांना मानसिक गुलामगिरीत लोटण्याचे काम टिकळांनी केेले. त्यामुळे हा एकप्रकारे दहशतवाद म्हणावा लागेल.


प्रत्येकाला स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाकडे असतो. परंतु बहुजनांचा निर्णय घेण्याचा अधिकार ब्राम्हणांना कुणी दिला? जबरदस्तीने तुम्ही हिंदू आहात असे सांगितले जाते. मारून-मुटकून बहुजनांच्या माथी हिंदुत्व थोपवण्याचा प्रकार आहे. या देशातील कोणीही हिंदू नसताना त्यांना जाणूबुजून हिंदू म्हणून संबोधायचे. 


अरे, आम्हांला आमचा निर्णय घेऊ द्या. तुम्ही कोण आमच्या भवितव्याचा निर्णय घेणारे असे सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हा मानसिक दहशतवाद गेल्या पाच हजार वर्षापासून सुरू आहे. याच मानसिक दहशतवादाचा प्रारंभबिंदू टिळक. म्हणून राजस्थानमधील आठवीच्या रेफरन्स बुकमध्ये जे म्हटले आहे, ते बरोबरच आहे. टिळक दहशतवादाचे जनकच आहेत यात कुठलीही शंका नाही. 


त्यामुळेच आज ब्राम्हणांचा मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरू आहे. या दहशतवादाचा आज नंगानाच सुरू आहे. कारण  सत्तेवर असलेले सरकार हे आरएसएसपुरस्कृत आहे. आरएसएस आणि दहशतवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे टिळकांचा समाचार घेताना त्यांचीच पिळावळ असलेल्या आरएसएसची काळी बाजू मांडणे गरजेचे आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
धक्कादायक! कर्नाटकात कपडे ठेवण्यासाठी मजुराकडून व्हीव
नागपुरात ३० हून अधिक निवासी डॉक्टरांना गॅस्ट्रोने पछाड
भडका! देशात इंधनाने गाठला उच्चांक
कामगारांच्या पत्राशेडमध्ये सापडल्या ईव्हीएम मशीन
सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल, युद्धही लादेल
कर्नाटक मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला!
नीरव मोदी, मेहुल चोकसीविरोधात इंटरपोलकडे धाव
भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी पैसे हिसकावून फाडत फेर
लोकशाहीचा आदर आहे मग बहुमत चाचणीस सामोरे न जाता पळ का काढ
राजनाथ सिंह यांच्यासाठी २० गावे १२ तास अंधारात
१२ हजार ७०० कोटींचा घोटाळा करणारा नीरव मोदी लंडनमध्ये
येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराच
राज्यपाल वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी
अडीच दिवसांचा गणपती
फेक न्यूजचे समूळ उच्चाटन गरजेचे
२८ मे रोजी होणार मराठा आरक्षण सुनावणी
कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
४० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर अस
दिवसाला एक कोटी घेणारे मोठे वकीलही मूग गिळून गप्प असतात
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper