×

महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक

Published On :    11 Apr 2021
साझा करें:

डॉ .आ.ह. साळुंखे यांनी ‘महात्मा फुले आणि शिक्षण’ या ग्रंथकृतीतून अत्यंत उद्बोधक व उपयुक्त अशी समीक्षा केलेली आहे. या समीक्षेतून विविध पैलूंना प्रकाशात आणल्याचेही लक्षात येईल. प्रस्तुत मांडणीत आपण ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक कसा असावा आणि कसा असू नये’ हे आ.ह. साळुंखे यांच्या समीक्षेच्या संदर्भांनी समजून घेणार आहोत .डॉ .आ.ह. साळुंखे यांनी ‘महात्मा फुले आणि शिक्षण’ या ग्रंथकृतीतून अत्यंत उद्बोधक व उपयुक्त अशी समीक्षा केलेली आहे. या समीक्षेतून विविध पैलूंना प्रकाशात आणल्याचेही लक्षात येईल. प्रस्तुत मांडणीत आपण ‘महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा शिक्षक कसा असावा आणि कसा असू नये’ हे आ.ह. साळुंखे यांच्या समीक्षेच्या संदर्भांनी समजून घेणार आहोत . शिक्षक हा समाजाचा मार्गदाता आहे. तो ज्ञानदानातून शिक्षणाची महत्ता आणि उपयुक्तता वेळोवेळी प्रकट करत असतो. त्याच्या ठिकाणी संवेदनशीलता, समाजभान, विवेक, कर्तव्यभावना, अद्ययावतपणा आणि निर्मळ आचरण अशा सद्गुणांचा गंध सदैव दरवळत राहावा अशी कोणत्याही समाजाही पक्की धारणा असते. अशा पार्श्‍वभूमीवर आ.ह. साळुंखे म्हणतात, शिकलेल्या लोकांनी शिक्षणाच्या आधारे आर्थिकदृष्टया स्वतःही स्वावलंबी व्हावे आणि शिक्षक बनून इतरांनाही शहाणे करावे. हे सांगतांना फुले म्हणतात,‘ तरूण शूद्रांनी विद्या संपादावी, चाकरी धरावी, शाळाखाती’  तसेच  अनेकदा शिकलेले लोक शिक्षणाचा फायदा घेऊन स्वतःचे जीवन समृद्ध करतात, परंतु आपल्या अज्ञानी भावंडांकडे मागे वळून बघत नाहीत . त्यांच्या विवेकाला आवाहन करताना फुले म्हणतात ‘विद्या शिकोनीया गावोगाव फिरा, उपदेश करा, शूद्रादिकां’ येथे शिक्षकाच्या भूमिकेवर भाष्य केल्याचे दिसून येईल.


शिक्षण संपादनाचा एक मुख्य हेतू आर्थिक स्थैर्य मिळविणे हा नक्कीच आहे. परंतु त्याच जोडीने ज्या अशिक्षित लोकांमधून आपण आलोत, लहानाचे मोठे झालोत त्यांच्याप्रतीही आपली जबाबदारी आहे हे महात्मा फुलेंना सांगायचे आहे. विशेषतः शिक्षकी पेशात वावरणार्‍या बंधू- भगिनींनी या जबाबदारीकडे अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत असे. ‘शूद्रवर्णीय म्हणजेच आजच्या ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आदी ५२ टक्के समूहांमधिल तरुण- तरूणींनी विद्या ग्रहण करून शिक्षण विभागात नोकरी करावी आणि आपल्या शूद्र समाजाला उपदेश करावा’ अशी त्यांची आग्रही मागणी होती. याचा अर्थ तत्कालिन अस्पृश्य आणि तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या शिक्षणाला ते अनुकूल नव्हते असे अजिबात नाही. किंबहुना अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी शिक्षण, प्रबोधन वगैरे मोठे काम केले आहे हे आपल्याला दिसूनच येईल. राहिला प्रश्न उच्चवर्णीय ब्राम्हण, वैश्य आदी लोकांचा, तर तत्कालीन वर्णधर्म व्यवस्था ही भक्कमपणे त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत इंग्रजांच्या आमदानीतही फारसा व्यत्यय आलेला नव्हता हेच खरे. करिता त्यांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून पुढाकार घेण्याची महात्मा फुलेंना कधी जरूरीच पडली नाही. आ.ह. साळुंखे हे महात्मा फुलेंच्या भूमिकेवर मीमांसात्मक लेखनी चालवतांना पुढे लिहितात, शिकलेल्या लोकांनी मागे वळून बघितले पाहिजे, आपल्याला लाभलेल्या ज्ञानाचे लाभ अज्ञानात अडकलेल्या आपल्या सगळ्या समाजाला देण्यासाठी झटले पाहिजे, असे फुले यांना वाटत होते.ज्यांना शोषित अवस्थेतून आल्यानंतर चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली आहे, त्यांना आपल्या खेड्यापाड्यांतून राहणार्‍या अज्ञानी जनतेला शिक्षण देण्याच्या कार्याला वाहून घेतले पाहिजे, अशी त्यांची तळमळ होती. येथे महात्मा फुलेंच्या विचारांना त्यांनी आजच्या शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षित लोकांच्या कर्तव्याशी जोडल्याचा संकेत मिळतो. तेव्हा अशा या मीमांसेलाच अद्ययावतपणाची तथा उपयुक्ततेची जोड मिळाली आहे असे ठामपणे म्हणता येते. शेकडो- हजारो वर्ष या देशातील शूद्रातिशूद्र लोकांवर व संपूर्ण महिलांवर वर्णसंस्था आणि जातिसंस्थेच्या आडूण शिक्षणबंदी, शस्त्रबंदी तसेच अर्थबंदी लादलेली होती. त्याविरोधात जाऊन अनेक संतांनी, थोर नायक- नायिकांनी प्रचंड संघर्ष करुन  जागृती घडविली. परंतु तरीही अपेक्षित असा बदल मात्र १९ व्या शतकापर्यंतही घडलेला नव्हता. इंग्रजांनी मात्र त्यांच्या राजकीय व प्रशासकीय स्थैर्यासाठी सर्वच एतद्देशीय लोकांना माफक शिक्षण देण्याचे ठरविले. त्यामुळे महात्मा फुलेंना या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविण्याची प्रेरणा आणि वातावरण मिळाले. तळागाळातील शूद्रातिशुद्रांच्या मुली व मुले शिक्षण घेऊ लागले. वर्णधर्माद्वारे शिक्षण नाकारलेलेही शिक्षणातून प्रगती करू लागले. पण या लोकांनी सामाजिक उत्तरदायित्व आणि कृतज्ञतेचा भाव प्रकट करून आपल्या अडाणी लोकांनाही शहाणे बनविण्यासाठी धडपडले पाहिजे असे ते आवाहन करू लागले. शिक्षक बंधू- भगिनींनी तर या दिशेने प्रयत्नांची शिकस्त करणे हे त्यांचे व्यावसायिक कर्तव्यच आहे. पण त्याच बरोबरीने समाजाकडे वळून पाहण्याची, त्याच्या अडचणीत, सुखा-दुःखात धावून जाण्याची प्रवृत्तीही आपल्या अंतरंगात त्यांनी दृढ केली पाहिजे असेही त्यांना आवर्जुन वाटत असे. तेव्हा आजच्या पारिवारिक, सामाजिक, आर्थिक आशा विविध कसोट्यांवर जर शिक्षक बंधू- भगिनींना आणि शिक्षितांना तपासून घेतले असता महात्मा फुले यांची अपेक्षा शतश: पूर्ण झाली आहे असे नक्कीच म्हणवत नाही. आजही काही शिक्षक- शिक्षिका, नोकरदार लोक ज्या समाजातून मी आलो अथवा ज्या विद्यार्थ्यांमुळे मी शिक्षक आहे, शिक्षिका आहे त्यांच्याशी माझे काहीतरी देणे लागते ही प्रांजळ भावना कृतीत उतरवतांना कमी पडतात हे वास्तव आहे. त्यामुळेच आ. ह. साळुंखे १९ व्या शतकातील शिक्षितांचा उणेपणा २१ व्या शतकातील शिक्षितांवरही सांकेतिक पध्दतीने आरोपित करतात हे आपल्या ध्यानात येईल आणि त्यांचे हे विालेषण अधिक वस्तुनिष्ठ व अचुक आहे हे ‘हयुमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ मधील भारताचे स्थान पाहून निश्चितच स्वीकारार्ह ठरेल. १८६ देशांमध्ये भारताचा ‘हयुमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ क्रम तब्बल १३१ पर्यंत घसरलेला आहे. यावरून आपल्या देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील अधोगती किती चिंताजनक आहे हे समजून येईल. यामुळेच आ .ह. साळुंखे यांची समीक्षा अभ्यासकांना अधिक समाजाभिमुख व इतिहासाचे रास्त आकलन करून देण्यास सहायक आहे याची खात्री पटते.


शिक्षकाने सामाजिक जबाबदारीकडे कसे पाहावे हे स्पष्ट केल्यानंतर त्याने कोणत्या ज्ञानाचा आणि विचारांचा वारसा जपला पाहिजे हे सांगतांना,  शिक्षकांच्या नेमणुकी विषयी ते एका अखंडात म्हणतात,’ स्त्रीपुरुष हक्क सर्वां कळवावे, सत्याने बोधावे, मानवांस, देशधर्मभेद नसावा अंतरी, भावडांचे परी, सर्वा  असे बा शिक्षक सर्व ठाईं नेमा,आदीसत्य नमा, जोती म्हणे’ ते आणखी एका आखंडात म्हणतात ,’ मानव शिक्षक नेमा निर्विवाद, आर्य भेदाभेद, त्यागा सर्व’ येथे महात्मा फुलेंच्या लेखाचे अंश दिलेले आहेत. ज्या तर्‍हेने संत तुकाराम महाराजांनी ‘अभंग’ नामक काव्यरचनेला जन्म दिला अगदी त्याच स्वरूपाच्या विद्रोही काव्यलेखनाला महात्मा फुलेंनीही ’अखंड’ नामाभिधानाने रूढ केले. आपल्या देशात समतेचं अधिष्ठान असणारा समाज निर्माण झाला पाहिजे हे येथील प्रस्थापित धर्ममार्तंडांना कधीही वाटले नाही आणि रुचलेही नाही. किंबहुना आपल्याच मुठभर बांधवांची एकाधिकारशाही, वर्चस्व,अहंकार व सुखोपभोग संतुष्ट होत राहावेत असा अट्टाहास मात्र त्यांनी हजारो वर्ष जपला आहे. आजही हा अट्टाहास आपल्याला डोळस वा विवेकी नजरेतून नक्कीच टिपता येईल. महात्मा फुलेंना हेच सामाजिक वास्तव अस्वस्थ करत होते. विशिष्ट लोकांची ही मक्तेदारी त्यांना सामाजिक अधःपातास खरे कारण आहे याची खात्री झालेली होती. आणि म्हणून त्यांनी शिक्षणास एक प्रभावी माध्यम बनवून या विषमतावादी व्यवस्थेस सुरूंग लावण्याचे ठरविले. त्यांना समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न सत्यात आणायचे होते आणि यासाठी शिकलेला वर्ग हे महान काम निश्चितच पुढे घेऊन जाऊ शकतो असा त्यांचा विश्वास होता. त्यातही समाजातील शिक्षकाने हे काम जर गांभीर्याने हाती घेतले तर क्रांती व परिवर्तन या देशात नक्कीच घडेल असाही त्यांचा दृढ विश्वास होता. करिता ते त्याच्या ठिकाणी काही मूल्यांची,  विचारांची पेरणी घडून आली पाहिजे असा आग्रह धरतात. सत्याचा कळवळा असणारे, स्त्री- पुरूष भेद न मानणारे, वर्ण-धर्म -जात आदींवर आधारित भेदभाव न पाळणारे आणि सर्वांना आपल्या भावंडांप्रमाणे जपणारे, घडविणारे शिक्षक त्यांनी अपेक्षिल्याचे वरिल अखंडातून दिसून येईल.


अर्थात ‘मानव शिक्षक नेमा’ असा आग्रही विचार महात्मा फुलेंनी लावून धरला आहे हे लक्षात येईल. मानवीय व अमानवीय या विरूध्दार्थी शब्दांवरूनही ‘मानव शिक्षकाची’ संकल्पना आपल्याला चांगल्या प्रकारे समजून येईल. मानवीय मल्यांना रुजविणारा, दृढ करणारा आणि त्याआधारे समतेचे नवविश्‍व अधिक स्पष्टपणे वा लख्खपणे स्थापित करण्यासाठी धडपडणारा, प्रसंगी  मोठी किंमत मोजण्यास  सज्ज असणारा शिक्षक या ‘मानव शिक्षकातून’ व्यक्त होतो हेच खरे. या ओघाने आ. ह. साळुंखे यांची पुढील समीक्षा खरोखरंच दिशानिर्देश करणारी आहे याचा अनुभव येईल. त्यांनी( महात्मा फुले) ज्यांना ‘मानव शिक्षक’ म्हटले त्या प्रकारचे शिक्षक अभिप्रेत असल्यामुळे ते शिक्षक ‘सात्विक ज्ञानाचे नमुने’ असायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. त्याबरोबरच, या शिक्षकांना नांगराचे रुमणे धरणे वा सुताराची तासणी हातात घेणे, अशा कामांची लाज वाटता कामा नये, याचा अर्थ ते शारीरिक श्रमाचा आदर करणारे असावेत आणि सर्व समाजांच्या व्यवसायांची कदर करणारे असावेत, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या समीक्षेत मानवीय मूल्यांचा यथोचित आदर शिक्षकाकडून घडून आला पाहिजे असे सांगितले आहे.


भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील शेकडा सत्तर टक्के लोक कृषिद्वारे मिळणार्‍या उत्पादनातून आपला उदरनिर्वाह करतात. याच देशातील सर्वात प्राचीन संस्कृती, सिंधू संस्कृती ही कृषी संस्कृतीच होती आणि ती तत्कालीन जगतातील सर्वात प्रगत संस्कृती म्हणूनही प्रसिद्ध होती असा अनेक इतिहासकारांनी अभिप्राय दिलेला आहे. परंतु नंतरच्या काळात या संस्कृतीवर विदेशी आर्यांनी प्रचंड हल्ले करून तिचा विध्वंस घडविला आणि या देशात कृषिसंस्कृती ऐवजी वर्णसंस्कृतीला स्थापित करून तिला प्रतिष्ठा अन् सन्मान मिळवूण देण्याचा त्यांनी निर्धार केला. याच प्रयासातून पुढे धर्मग्रंथ तथा धार्मिक विश्व उभे करण्यात आले.  त्यात शेती व शेतकर्‍याला ‘शूद्रस्थानी’ ढकलण्यात आले. तसेच त्यांना लाभलेली सामाजिक प्रतिष्ठा धर्मग्रंथांच्या आणि वर्णसंस्थेच्या माध्यमातून संपुष्टात आणण्याचा जोरदार प्रयास झाला. याचाच प्रत्यय वैदिक आर्यांच्या धर्मग्रंथातून येतो. त्यासंबंधी आ. ह. साळुंखे लिहितात, आपस्तंबाने सुचवलेले यापुढचे दोन नियम मात्र धक्कादायक आहेत. गरीब मजुराने वा जमीन कसणार्‍या शेतकर्‍याने शेतीचे काम सोडले असता त्याला काठीने बडवावे, असे तो म्हणतो. त्याने काम सोडण्याला योग्य कारण आहे की नाही हे पहावे, असे तो सांगत नाही. तसेच, तो काम करीत नसेल, तर त्याला बाजूला करून दुसर्‍याकडून काम करून घ्यावे, असेही तो सांगत नाही. त्याला काठीने बडवावे, असे तो सांगतो, याचा अर्थ मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून काम करून घ्यावे, असा होतो. ही एक प्रकारची वेठबिगारीच म्हटली पाहिजे. अशा पद्धतीने या देशातील शेतकर्‍याला साक्षात धर्मग्रंथानेच हीन लेखन, अप्रतिष्ठित ठरवून त्याची सामाजिक प्रतीमा पूर्णत: मलीन केली. त्याचाच परिणाम पुढील हजारो वर्ष शेती आणि शेतकर्‍याच्या अवनतीत आणि संपूर्णतः अधोगतीत घडून आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नेमकी हीच धार्मिक व सामाजिक स्थिती महात्मा फुलेंना उत्तम तर्‍हेने अवगत होती. म्हणून त्यांना शेती, शेतकरी आणि त्यांच्या संबंधीचे इतर व्यवसाय यांची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षकांनी ‘सात्विक ज्ञानाचे नमुने’ ठरावे असे अभिप्रेत होते. ही आ.ह. साळुंखे यांची मांडणी थोर पुरूषाच्या विचारांना न्याय देणारी तथा समाजाच्या संतुलित, सर्वांगीण विकासासाठी प्रेरक ठरणारी आहे यात शंका नाही. महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन.
           
डॉ . विनोद वाघाळकर
७७९८६५५७९६

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र-भाग-१
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र भाग-२
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम क
कोरोना काळातही आदिवासी बांधव दुर्लक्षितच, खावटी योजना क
राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघणार
सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्य
गुजरात मॉडेलचा बुरखा टराटरा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकस
२०२० मध्ये जगभरात उपासमारीशी झगडणार्‍या १५.५ कोटींपैकी
केंद्रातील भाजपा सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकताय
सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे
कोरोना परिस्थिती कशी हाताळू नये हे भाजपा सरकारने जगाला द
राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्या
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात जाणार
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
इमेज बिल्डींगसाठी ३०० सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना जुं
मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकालाची शक्यता
कोरोना काळात भरपूर कमावलंत, फी वाढवू नका
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द
इंधन दर वाढ कायम; पेट्रोल १९ तर डिझेल २१ पैशांची वाढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper