×

राफेल डीलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० लाख युरो दलाली घेतल्याचा आरोप

Published On :    12 Apr 2021
साझा करें:

मोदींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका



नवी दिल्ली:  राफेल डीलमध्ये प्रधान नरेंद्र मोदी यांना १० लाख युरो दलाली मिळाली आहे असा आरोप करत त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मनोहर लाल शर्मा नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. तसेच आरोपी सुशान गुप्ता यांच्याविरूद्ध समान गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली आहे. शर्मा यांनी कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.


टेलीग्राफच्या वृत्तानुसार ६ एप्रिलला याचिका दाखल केली गेली आहे. पण मनोहर लाल शर्मा यांनी रविवारी जाहीर केले. पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे फ्रेंच मीडिया पोर्टल मीडियापार्टने असा दावा केला होता की इंफोर्समेंट डायरेक्टरेट ऑफ इंडियाने सुशान गुप्ता नावाच्या दलालला दासाऊ व त्याच्या सहाय्यक कंपन्यांनी दिलेल्या रकमेची चौकशी केली नाही. गुप्ता यांना संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती, असा पोर्टलचा दावा आहे. जे त्याने दसॉ एव्हिएशनला दिले. या कागदपत्रांमुळे कंपनीला भारताची गुप्त धोरणे काय आहेत ही उघडकीस आली. गुप्तामुळे कंपनीला राफेल जेट विक्री करण्यात मदत झाली.


सुशान गुप्ता कोण आहेत ?अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर डीलमधील दलालीच्या आरोपामुळे सुशिन गुप्तावर खटला आहे. २०१९ मध्ये गुप्ता यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शविला, असे सांगून दुबईत राहणार्‍या राजीव सक्सेना यांच्या डायरीने ‘आरजी’ ला ५० कोटी रुपये दिल्याचा खुलासा झाला. मनोहर लाल शर्मा यांनीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक रद्द करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती, त्यांनी ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानने कठोर टीका करत या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र-भाग-१
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र भाग-२
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम क
कोरोना काळातही आदिवासी बांधव दुर्लक्षितच, खावटी योजना क
राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघणार
सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्य
गुजरात मॉडेलचा बुरखा टराटरा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकस
२०२० मध्ये जगभरात उपासमारीशी झगडणार्‍या १५.५ कोटींपैकी
केंद्रातील भाजपा सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकताय
सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे
कोरोना परिस्थिती कशी हाताळू नये हे भाजपा सरकारने जगाला द
राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्या
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात जाणार
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
इमेज बिल्डींगसाठी ३०० सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना जुं
मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकालाची शक्यता
कोरोना काळात भरपूर कमावलंत, फी वाढवू नका
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द
इंधन दर वाढ कायम; पेट्रोल १९ तर डिझेल २१ पैशांची वाढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper