×

राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा आटापिटा

Published On :    10 Jun 2021
साझा करें:

शैक्षणिक आणि सर्व्हीसमधील आरक्षणासाठी मात्र चिडीचूप



चंद्रपूर : एका बाजूला राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी आटापिटा सुरू केला असताना दुसर्‍या बाजूला शैक्षणिक आणि सर्व्हीसमधील आरक्षण वाचवण्यासाठी हेच नेते चिडीचूपची भूमिका निभावताना दिसत आहेत. काय या ओबीसी नेत्यांना राजकीय, शैक्षणिक आणि सर्व्हीसमधील आरक्षणाबाबत काही माहित नाही का? की त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे असा सवाल ओबीसी बांधव विचारत आहेत.  दरम्यान ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांची सहविचार बैठक बुधवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येत ओबीसींचे राजकीय आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. आरक्षण आम्ही मिळवणारच, असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त केला गेला.


वर्षांनुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असणार्‍या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे. ४ मार्च, २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार’ या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशीम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरवले. 


याबाबतची राज्य सरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने २८ मे रोजी फेटाळली आहे. राज्य शासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयात भक्कमपणे ओबीसींची बाजू मांडली असती, तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. तरी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द न होता अबाधित राहिलेच पाहिजे. 


याची दक्षता व कार्यवाही राज्य शासनाने करावी व केंद्र सरकारने कायदा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे यावर चर्चा झाली. बैठकीचे प्रास्ताविक दिनेश चोखारे यांनी केले तर, आभार सचिन राजूरकर यांनी मानले व संचालक श्याम लेंडे यांनी केले.


यावेळी डॉ. बबन तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे, बबन फंड, सचिन राजुरकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, दिनेश चोखारे,  देवराव भोंगळे, डॉ. सतीश वारजूरकर, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रकाश देवतळे, अविनाश पाल, सुधाकर रोहनकार, प्रा.अनिल शिंदे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. शरद वानखेडे, श्याम लेंडे, रणजित डवरे, बादल बेले, चंद्रकांत गुरू, नीलेश खरवडे, गोविंदा पोडे, सुनील फरकडे, गणेश आवारी, उमाकांत धांडे, मोरेश्‍वर लोहे, नितीन गोहणे, गणपती मोरे, तुलसीदास भुरसे, बंडू डाखरे, आदी अनेक राजकीय पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’
मराठा आरक्षण प्रश्‍न न सोडवल्यास पुणे ते विधानभवन मोर्च
एटीएम इंटरचार्जेसच्या नावाखाली आता गावांमधील बँक ग्राह
तामिळनाडूच्या मंदिरांत आता ब्राम्हणेतर पुजारी
मराठा आरक्षणाचा नवा कायदा करून राज्यघटनेच्या नवव्या पर
कुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीच
जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही
कच्चे तेल स्वस्त असूनही पेट्रोल-डिझेलची दरवाढ
२०२४ मध्येही नरेंद्र मोदी प्रधानमंत्री
२६ जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने करून केंद्
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंब
एमपीएसचा निकाल लागून वर्ष लोटले तरी भावी अधिकारी नियुक्
महागाईच्या चटक्याने गरीबांच्या जेवणाचे ताट रिते
गंभीर उपासमारीतील बालकांवर योग्य उपचार न करताही दिवसाल
सुरजागड प्रकल्प एटापल्लीतील मजुरांचा वाली कोण?
१८ वर्षे न्यायासाठी प्रतिक्षा करूनही १०५ कुटुंबातील लो
कोविडमध्ये लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावावे
झारखंडमध्ये लशींची सर्वाधिक नासाडी; केरळ, बंगालमध्ये प्
‘कोव्हिशिल्ड’मुळे रक्तपेशी कमी होण्याचा धोका
लढवय्या असणार्‍या मुली उच्च शिक्षणाच्या प्रवाहात मागेच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper