×

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकरांची पात्रता नाही

Published On :    12 Jun 2021
साझा करें:

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून कॉंग्रेस नेते अभिजीत पाटील यांची जहरी टीका



नवी मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांवर राजकारणात उभा राहिला, अशा शब्दात जहरी टीका कॉंग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी केली आहे. आंबेडकरांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर ही टीका करण्यात आली आहे. पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत आंबेडकरांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.


पनवेल तालुका कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले, दि. बा. पाटील आणि नवी मुंबई विमानतळ याच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा काही एक संबंध नाही. नवी मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला काडीचे स्थान नाही. नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय आहे.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काहीएक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांबर राजकारणात उभा राहिला आणि नंतर खाल्ल्या पानात थुंकून दुसर्‍याच्या वळचणीला गेला. राजकारणातला त्यांचा वावर हा सुपारी घेतल्यासारखाच आहे ही एक बाब आहे. आपला काही संबंध नाही अशा गोष्टीत नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय अशा शब्दात पाटील यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.


नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे की दि. बा. पाटील यांचे, याच्याशी वास्तविक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सुतराम संबंध नाही. नवी मुंबईत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काडीचे स्थान नाही. इथल्या लोकभावना, इथल्या अस्मिता, इथले आर्थिक प्रश्न, याबाबत प्रकाश आंबेडकरांना चार परिच्छेदांचा निबंध कुणाशी चर्चा न करता लिहून दाखवला तर मी त्यांचा दास होईन. 


दि. बा. पाटील यांच्याबद्दलही त्यांना काही माहिती असेल अथवा आस्था असेल अशातलाही भाग नाही. पण खूप दिवसांत पेपरात नाव आले नाही आणि महाविकास आघाडी सरकारला विरोध करणे हा सध्या एकमेव व्यवसाय असल्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे नावाला विरोध करत ‘संघ’प्रणित भाजपच्या हातात हात मिळवला आहे असे शाब्दिक फटकारे पाटील यांनी लगावले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘पेगासस’वरून केंद्रावर हल्लाबोल करणारी कॉंग्रेस ईव्ही
कोरोना काळात विमा असूनही पडतोय खिशावर ताण; शब्दांच्या खे
फोन टॅपिंग प्रकरण: पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानग
उत्तर प्रदेशात ‘गुंड’विकास दुबेचा उभारणार पुतळा
महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरा
‘पेगासस’च्या स्वतंत्र चौकशीसाठी ज्येष्ठ पत्रकारांची स
२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी व
केंद्र सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही
पुरंदरेनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही
पेगासस बनवणार्‍या कंपनीवर इस्त्रायल सरकारची छापेमारी
आणखी सहा महिन्यांनी सीएए लागू करणार?
देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुप
देशात हेतुपुरस्सर कर्जबुडवे वाढले
गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद होणार
शाळा बंद: जगभरातील १६० कोटी तर भारतातील २५ कोटी मुलांच्य
परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस
नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी
जनता गरीबीत आणि महागाईत होरपळतेय, मंत्र्यांच्या संपत्त
२०२० च्या पूरबाधितांना केंद्राकडून फुटकी कवडी
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper