×

एटीएम इंटरचार्जेसच्या नावाखाली आता गावांमधील बँक ग्राहकांचाही खिसा कापला जाणार

Published On :    13 Jun 2021
साझा करें:

आरबीआयचा निर्णय ग्राहकांचे कंबरडे मोडणारा



मुंबई : एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आधीच कंबरडे मोडले असताना त्यात आता बँकांनी ग्राहकांचाही खिसा कापण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासह वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत. यातून बँका मोठी कमाई करतात. त्यातच आता आरबीआयने या आठवड्यात एटीएममधून पैसे काढणे आणि इतर बँकांच्या एटीएमचा वापर करणे यासाठीच्या शुल्कात वाढ केल्याची घोषणा केली आहे. याचा मोठा परिणाम गावांवर होणार आहे. गावांमध्ये मोठ्या अंतरावर एखादं एटीएम असते. त्याच एटीएमचा वापर सर्व बँकांचे ग्राहक करतात. आता त्यांच्या खात्यातून यासाठी अधिकचे पैसे कापले जाणार आहेत.


सुरुवातीला २०१२ मध्ये एटीएम इंटरचार्ज फी म्हणून १५ रुपये आणि इतर बँक सेवांसाठी ५ रुपये आकारण्यात येत होते. आता हे शुल्क वाढून १७ रुपये आणि ६ रुपये करण्यात आले आहे. मात्र, बँका आधीच वेगवेगळ्या नावाखाली सर्वसामान्यांकडून पैसे आकारत असताना या कोरोना काळात एटीएम इंटरचार्जेसमध्ये ही वाढ करण्याचं कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.


खरंतर बँकांकडून ज्या प्रमाणात एटीएम उपलब्ध करुन द्यायला हवेत त्या प्रमाणात एटीएम उभारण्यातच आलेले नाहीत. त्यामुळे बँक ग्राहकांना नाईलाजाने जवळ उपलब्ध असलेल्या इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. आता आरबीआयने जवळपास १२ वर्षांनंतर शुल्कवाढ केली आहे. देशात मार्च २०२१ पर्यंत जवळपास २ लाख १५ हजार ५७५ एटीएम आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या १ लाख लोकांमागे केवळ २० एटीएम आहेत.

वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली ३०८ कोटी रूपयांची कमाई
भारतातील गावांमध्ये बँका किती सुविधा पुरवतात हे पाहायचं ठरलं तर केवळ एक आकडेवारीच ते सांगण्यासाठी पुरेशी आहे. ग्रामीण भागात एकूण एटीएमच्या केवळ २० टक्के एटीएम आहेत. देशातील बँका वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली ग्राहकांचे खिसे कापून मोठी कमाई करतात. आयआयटी बॉम्बेच्या एका अभ्यासानुसार, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने केवळ बीएसबीजी अकाऊंट चार्जेसच्या नावावर ३०८ कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पीएनबीने देखील कोट्यवधींची कमाई केली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘पेगासस’वरून केंद्रावर हल्लाबोल करणारी कॉंग्रेस ईव्ही
कोरोना काळात विमा असूनही पडतोय खिशावर ताण; शब्दांच्या खे
फोन टॅपिंग प्रकरण: पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानग
उत्तर प्रदेशात ‘गुंड’विकास दुबेचा उभारणार पुतळा
महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरा
‘पेगासस’च्या स्वतंत्र चौकशीसाठी ज्येष्ठ पत्रकारांची स
२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी व
केंद्र सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही
आणखी सहा महिन्यांनी सीएए लागू करणार?
देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुप
देशात हेतुपुरस्सर कर्जबुडवे वाढले
गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद होणार
शाळा बंद: जगभरातील १६० कोटी तर भारतातील २५ कोटी मुलांच्य
परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस
नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी
जनता गरीबीत आणि महागाईत होरपळतेय, मंत्र्यांच्या संपत्त
२०२० च्या पूरबाधितांना केंद्राकडून फुटकी कवडी
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक!
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ठरवले दिवाळखोर
केंद्राच्या कोळसा कंपनीकडून जादा दरआकारणीचा राज्यातील
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper