×

कुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीचे आदेश

Published On :    13 Jun 2021
साझा करें:

तीन सदस्यांकडून खासगी लॅबची होणार चौकशी



उत्तराखंड:  एका खासगी लॅबकडून कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल सादर करण्यात आल्याच्या आरोपाबद्दल आता उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्यादरम्यान झालेली गर्दी आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन अशा अनेक बाबींची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती.


या धार्मिक उत्सवात हजारो भक्तगण सामील झाले होते. एक एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा कुंभमेळा हरिद्वार, डेहराडून, तेहरी आणि पौरी या ठिकाणी भरला होता. या बनावट अहवालाचं प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा पंजाबमध्ये असलेल्या एका व्यक्तीला करोना चाचणीसाठी आपलं सॅम्पल घेतल्याचा मेसेज आला होता. ही व्यक्ती कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये पंजाबमध्ये होती. 


या व्यक्तीने आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबरचा बनावट अहवालासाठी गैरवापर केल्याची तक्रार आयसीएमआरकडे दाखल केली होती. आयसीएमआरनेही गोष्ट उत्तराखंड सरकारच्या लक्षात आणून दिली. उत्तराखंड सरकारने या खासगी लॅबने कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या सर्व चाचण्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यात असे अनेक बनावट अहवाल आढळल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या लॅबला कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘पेगासस’वरून केंद्रावर हल्लाबोल करणारी कॉंग्रेस ईव्ही
कोरोना काळात विमा असूनही पडतोय खिशावर ताण; शब्दांच्या खे
फोन टॅपिंग प्रकरण: पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानग
उत्तर प्रदेशात ‘गुंड’विकास दुबेचा उभारणार पुतळा
महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरा
‘पेगासस’च्या स्वतंत्र चौकशीसाठी ज्येष्ठ पत्रकारांची स
२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी व
केंद्र सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही
आणखी सहा महिन्यांनी सीएए लागू करणार?
देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुप
देशात हेतुपुरस्सर कर्जबुडवे वाढले
गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद होणार
शाळा बंद: जगभरातील १६० कोटी तर भारतातील २५ कोटी मुलांच्य
परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस
नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी
जनता गरीबीत आणि महागाईत होरपळतेय, मंत्र्यांच्या संपत्त
२०२० च्या पूरबाधितांना केंद्राकडून फुटकी कवडी
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक!
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ठरवले दिवाळखोर
केंद्राच्या कोळसा कंपनीकडून जादा दरआकारणीचा राज्यातील
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper