×

देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुपयांची बेवारस रक्कम

Published On :    28 Jul 2021
साझा करें:

सरकारी योजनेत पैसे गुंतवणार्‍याचा अकाली मृत्यू झाल्यास पैशांवर कोणीही दावा सांगत नाही



नवी दिल्ली:  देशातील बँका आणि विमा कंपन्यांकडे जवळपास ५० हजार कोटींची रक्कम बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय, म्युच्युअल फंडस आणि भविष्य निर्वाह निधीमध्येही कोणीही दावा न केल्यामुळे कोट्यवधी रुपये पडून असल्याचे समजते. अनेकदा व्यक्ती एखाद्या सरकारी योजनेत किंवा बँकेत पैसे गुंतवतात. मात्र, अकाली मृत्यू झाल्यामुळे या पैशांवर दावा सांगायला कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे हे पैसे असेच पडून राहतात.


केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, ८.१ कोटी खात्यांमध्ये २४ हजार ३५६ कोटी रुपये पडून आहेत. याचा अर्थ सरासरी प्रत्येक खात्यामध्ये ३ हजार  रुपये पडून आहेत. अनेक लोक विमा पॉलिसी सुरु करतात. मात्र, दोन-चार प्रीमियम भरल्यानंतर ते पॉलिसी बंद करतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भरलेले प्रीमियमचे पैसे विमा कंपन्यांकडेच राहतात.


रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, भारतातील बँकांमध्ये आजघडीला २४ हजार ३५२ कोटी रुपये कोणत्याही दाव्याविना पडून आहेत. सध्याच्या घडीला भारतीय स्टेट बँकेत साधारण २ हजार ७१० कोटी रुपये बेवारस स्थितीत आहेत. तर खासगी बँकामधील ९० लाख खात्यांमध्ये सरासरी ३ हजार ३४० रुपये पडून आहेत.


एखाद्या व्यक्तीचे बँक खाते १० वर्षांपेक्षा अधिक काळ वापरात नसेल तर ते पैसे गुंतवणूकदार शिक्षण निधीत वळते केले जातात. देशभरातील बँकांमध्ये बंद पडलेल्या बचत खात्यांमध्ये जवळपास ५ कोटी रुपये पडून आहेत. तर वेगवेगळ्या आर्थिक योजनांमध्ये मॅच्युरिटीचा कालावधी उलटून गेल्यानंतरही दावा न सांगण्यात आलेल्या रक्कमेचा आकडा ४ हजार ८२० कोटी रुपये इतका आहे.

या पैशांचे काय होते?
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बँकांमध्ये अशाप्रकारे बराच काळ पैसे पडून असतील तर त्याची माहिती आरबीआयला देणे बंधनकारक आहे. तुमचेही पैसे एखाद्या जुन्या बँक खात्यात अडकून पडले असतील तर तुम्ही योग्य ती माहिती देऊन हे पैसे परत मिळवू शकता. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार बँक खात्यामधील रक्कमेवर दावा सांगू शकतो. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जलद कृती हवी
शेतकर्‍यांचा उद्या भारत बंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper