×

नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी द्यावे

Published On :    28 Jul 2021
साझा करें:

ओबीसी बांधवाचे नांदेड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन



नांदेड :  एमबीबीएस प्रवेशासाठी नीट परीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांमधून केंद्र शासनाच्या १५ टक्के प्रवेश कोटा राखीव आहे. २०१७ पूर्वी नियमितपणे सेट परीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या जागा केंद्रीय कोट्यातून ओबीसींसाठी राखीव भरल्या जात होत्या, परंतु २०१७ पासून अचानकपणे त्या जागा ओपनसाठी खुल्या करण्यात आल्या. केंद सरकार आर्थिक मागासासाठी १० टक्के जागा रिजर्व ठेवत आहे, पण ओबीसींचा २७ टक्के कोटा समाप्त केला आहे. हा देशभरातील ओबीसी समाजावर केंद्र सरकार जाणून बुजून अन्याय करीत असल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आहे.


२०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. तसेच एमबीबीएस प्रवेशासाठी केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे, यासाठी भारतीय पिछडा शोषित संघटना व ओबीसी समन्वय समितीच्या वतीने ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. २७ ) जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.


यावेळी ओबीसी समाजातील प्रमुख नेते लक्ष्मण क्षीरसागर, नागनाथ देशमुख लोहगावकर, शिवा नरंगले, लक्ष्मण लिंगापुरे, नागनाथ चिटकुलवार, भुमन्ना आक्केमवाड, गोविंद फेसाटे, राजेश चिटकुलवार, ऍड. प्रदीप राठोड, प्रा. दिलीप काठोडे, ऍड. दिलीप गंगातीर, रवी बंडेवार, संदीप जिल्हेवाड, सतीशचंद्र शिंदे, नागनाथ महादापुरे, बालाजी जाधव, आर. जी. जाधव, पवन कोडपाक, सुभाष चिन्नूरकर, चंद्रकला चापलकर, कृष्णा चिंतलवार, श्रीनिवास अटलावार, दत्ता सूर्यवंशी, कुंडलिक मुळे, गोविंद मक्कापल्ले, प्रभाकर सोनटक्के यांची उपस्थिती होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जलद कृती हवी
शेतकर्‍यांचा उद्या भारत बंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper