×

२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी वाढ

Published On :    29 Jul 2021
साझा करें:

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची कबुली



नवी दिल्ली: २०१९ मध्ये एससी, एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी वाढ झाल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली. तर २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ११.१५ टक्यांनी अत्याचाराची प्रकरणे कमी झाली होती. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही राज्यसभेत माहिती दिली.


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये ४९ हजार ६०८ एससी, एसटींवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली. तर २०१८ आणि २०१७ क्रमश: ४४ हजार ५०५ व ५० हजार ९४ प्रकरणांची नोंद झाली. २०१५ मध्ये ४४ हजार ८३९ आणि २०१६ मध्ये ४७ हजार ३३८ प्रकरणे नोंदली गेली.


२०१९ मध्ये उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक १० हजार १५६ प्रकरणे नोंदली गेली. या यादीत राजस्थान दुसर्‍या स्थानावर आहे, येथे ८ हजार ४१८ प्रकरणे नोंदविण्यात आली. मध्य प्रदेशात ७ हजार २१९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आयपीसी अंतर्गत उत्तर प्रदेशात २०१८ मध्ये सर्वाधिक ९ हजार ४५८ प्रकरणे नोंदली गेली. यानंतर, बिहार दुसर्‍या क्रमांकावर ६ हजार ९२७ प्रकरणे होती. 


या यादीमध्ये मध्य प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर होता, येथे ६ हजार ६०८ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा संबंधित कलमांतर्गत सर्वाधिक ११ हजार ३२० प्रकरणांची नोंद झाली. मध्य प्रदेशात ८ हजार १८१ आणि ६ हजार ८२७ प्रकरणांमध्ये बिहार तिसर्‍या क्रमांकावर आहे.



२०१६ मध्ये उत्तर प्रदेशात १० हजार ४३०, मध्य प्रदेशात ६ हजार ७४५ आणि राजस्थानमध्ये ६ हजार ३२९ प्रकरणे नोंदली गेली. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८ हजार ३६३, राजस्थानमध्ये ७ हजार ३२० आणि बिहारमध्ये ६ हजार २९८ प्रकरणांची नोंद झाली आहे.आकडेवारीवर नजर टाकली तर  २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत उत्तर प्रदेशात एससी, एसटींवरील अत्याचारांचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सामाजिक बांधीलकीतून समजते समाजातील व्यक्तीमत्व
विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !
आरएसएसची तालिबानशी तुलना
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper