×

ईव्हीएम घोटाळा करून निवडणूक जिंकणार्‍या नितीन गडकरींनी नाना पटोलेंवर काढला वचपा

Published On :    10 Sep 2021
साझा करें:

पटोले यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर-नागपूर खंडपीठात अर्ज



नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम घोटाळा करून भाजपाचे नितीन गडकरी विजयी झाल्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार नाना पटोले यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.  


गडकरी यांची निवड रद्द करावी यासाठी त्यांनी नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. याचा वचपा नितीन गडकरी यांनी काढला असून त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. पटोले यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात दाखल केला आहे. पहिल्यांदा पटोले यांनी गडकरींविरोधात अर्ज दाखल केला होता. आता गडकरींनी पटोलेंविरोधात अर्ज दाखल केला आहे.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपूरमधून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. 


उत्पन्नान स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले तसेच त्यांनी कायद्यातील विविध तरतूदी व नियमांचे पालन केले नाही. तर मतमोजणी सुरू होती, त्यावेळी ज्या ईव्हीएम काऊंटींगसाठी यायला हव्या होत्या, त्या न आणता वेगळ्याच आणण्यात आल्या असा आरोप करत गडकरी यांची निवड रद्द करुन नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.


या प्रकरणावर गुरुवारी न्या. अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पटोले यांनी या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ ऍड. सुनील मनोहर तर पटोले यांच्यावतीने ऍड सतीश उके यांनी बाजू मांडली.


गडकरींचा अर्ज कशासाठी?

गडकरी यांना ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारिज करुन घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत हा अर्ज दाखल केला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जलद कृती हवी
शेतकर्‍यांचा उद्या भारत बंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper