×

तीन वर्षांत आश्रमशाळेतील ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू

Published On :    11 Sep 2021
साझा करें:

आदिवासी विकास विभागाच्या डोळ्यावर झापडे, सानुग्रह अनुदानाबाबत चालढकल



नाशिक: कुठलेही सरकार असो आदिवासींकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मकच असतो. आजही आदिवासी उपासमारीत जगत असताना त्यांच्या मुलांसमोरही जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल तीन वर्षात आश्रमशाळेतील ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडूनही आदिवासी विकास विभागाच्या डोळ्यावर झापडे आहेत. त्यातच सानुग्रह अनुदानाबाबत चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे आश्रमशाळांसमोरही शाळा चालवण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे.


मागील तीन वर्षात शासकीय आश्रमशाळेतील ३५३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला असला तरी शाळेत असताना झालेल्या मृत्यूबाबत काय कारवाई झाली, हा प्रश्‍नच आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर देण्यात येणार्‍या सानुग्रह अनुदान वाटपातही चालढकल होत आहे.


आदिवासी विकास विभागामार्फत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप केले जाते. बहुतेक पालकांना अनुदान मिळाले असले तरी, सन २०२०-२१ मधील १९ विद्यार्थ्यांचे पालक अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. राज्यात एकू ४९९ शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. ही अनुदान योजना २०१८ पासून राबविली जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तरच, त्याची जबाबदारी शाळांवर असते. सन २०१८ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ३५३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जलद कृती हवी
शेतकर्‍यांचा उद्या भारत बंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper